भंडारदरा ते शिवनेरी: दोन दिवस ढगात.. भाग 1
या वर्षीचा निम्मा पावसाळा सरला तरी एकही मोठी भटकंती झाली नव्हती त्यात नवीन बाईक घेऊन चार महिने झाले तरी घर ते स्टेशन आणि स्टेशन ते घर या पेक्षा जास्त चालवायला चान्स भेटला नसल्यामुळे आतुन चरफडत होतो. आणि अशाच एका दिवशी नशीब माझ्यावर फिदा झालं.
बायको:- माहेरी आईनं बोलावलंय दोन वीक साठी...
(पाच सेकंद शांतता)
बायको:- काय, कुठं हरवला....
आता तिला काय सांगू कि या पाच सेकंदात मी रायगडच्या बाजार पेठेतून फिरून, दिवेआगरच्या समुद्रात अंघोळ करून मुरुड च्या पाटील खानावळीत सुरमई खात होतो.
(कधी कधी मलाच माझ्या मानाचं कौतुक करावंसं वाटत बायको शेजारी असून ते कसलाही विचार करू शकत. थँक गॉड मन हे बुद्दीचा असा कप्पा आहे ज्यावर बायकोच अतिक्रमण नसत.)
मी:-(मनात फुटलेल्या लाडवाला मनातल्या मनात खाऊन, फुलपाखरांना शांत करून आणि आतुन होणाऱ्या गुद्गुल्यानं रिस्पॉन्स न देता) दोन आठवडे??
बायको:-हो. लवकर ट्रेन बुक करा.
दुसऱ्याच दिवशी बायको तिचा भाऊ आणि लहान मुलाचं बुकिंग केलं आणि भटकंती साठी गूगल करायला सुरवात केली.
प्लॅन 1. भंडारदरा आणि परिसर, प्लॅन 2. भीमाशंकर आणि परिसर.प्लॅन 3. प्लॅन 1 + प्लॅन 2
फायनली प्लॅन 3 फायनल केला. आता सर्वात मोठा प्रश्न बरोबर कोण येणार? मला गर्व आहे कि अचानक टांग मारणारे माझे दोस्त नाहीत. सुरवातीलाच जमणार नाही.... असं स्पष्ट आणि सरळ सरळ सांगतात.नेहमीचा साथीदार विशालला विचारल तर तो बिचारा त्याचं दिवशी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जाणार होता. ऑफिस मधल्या दोन तीन दोस्ताना विचारल पण घर ते स्टेशन आणि स्टेशन ते घर असा चार किमीचा प्रवास करणारे माझा साडेपाचशे किमीचा अघोरी प्लॅन ऐकून त्यांनीपण स्पष्ट नकार दिला. त्यातल्या त्यात नितेश विचारून सांगतो म्हणाला. मी पण मग इमोशन अपील, फियर अपील ची अस्त्र सोडली पण त्याच्या बायकोने टाकलेल्या चक्रविव्हा पुढे माझी अस्त्र बेकार गेली आणि त्याचपण नकार आला. मग वाट पाहीन नाहीतर एकटा जाईन अशी धमकी देऊन कामाला लागलो.
प्लॅन ठरवला. दिवस 1 भंडारदरा- भंडारदरा बॅकवॉटर - कोकणकडा - संधान दरी - अमृतेश्वर मंदिर - रंधा फॉल - ओझर मुक्काम
दिवस 2:- ओझर दर्शन - लेण्याद्री- शिवनेरी किल्ला - भीमाशंकर- बॅक टू पॅव्हिलिओन.
एव्हाना मी एकटा 550 ते 600 किमी च्या राईड वर निगालोय हे दोस्ताना समजल्यावर त्यांनी मला प्रोसाहन(??) द्यायला सुरवात केली, जणू काई मी अशांत बलुचिस्तान मध्ये शांतता प्रस्तापित करायला निगालोय अशा नजरेन मंडळी माझ्याकडे पाहू लागली. काय वेड लागलाय का...डोक्यावर पडलाय का... गाडी बंद पडली तर...पंचर झाली तर.... वाघ आडवा आला तर...आशा संभव आणि असंभव गोष्टींचा मारा माझ्यावर चालू झाला. पण आता माघार नाही... ठरलं आणि बॅग भरायला घेतली.
मिपाकर प्रचेतस, संदीप डांगे यांचा सल्ला आणि थोडं गुगल करून प्लॅन केला. एकटा आसल्यामुळे कुठेही भटकायचं कुठंही राहायचे ठरवलं. अंघोळीची कपडे आणि रेनकोट बॅगेमध्ये खुपसला. एकचं गोष्ठ सत्तावीत होती ती म्हणजे दोन दिवस भरपूर देवं दर्शन होणार त्यामुळे शनिवार रविवार असून नॉनव्हेज नाय खाऊ शकणार. मग जास्त विचार न करता लगेच फेमस दम बिर्याणीला गेलो आणि तंदूर चिकन आणि चिकन बिर्याणी गळ्यापर्यंत येईस्तोवर खाल्ली. गळ्यात थोडी जागा होती ती पण रेशमी कबाब नी भरून घेतली. येताना लागलीच माझ्या D.S.(वाळवंट वादळाची) टाकी पण फुल्ल करून घेतली.
पहाटे लवकर बाहेर पडायचा विचार करून पाचचा गझर लावून झोपी जायचा प्रयत्न करू लागलो. एरवी खुर्ची, सोफा, पायरी, बस, लोकल या मध्ये डुलकी घेणाऱ्या( लिफ्ट मध्ये सुद्धा डुलकी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या) मला का कोणास ठाऊक झोपचं येईना. तसाच तास दोन तास पडून राहिलो आणि नंतर झोपी गेलो...
वाचने
11230
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
गुड..!! येउद्या पुढचे भाग
In reply to गुड..!! येउद्या पुढचे भाग by संदीप डांगे
नंतर खूप बिझी झालो. गडबडीत
ओ पीके काका, फोटो नसेल तर
In reply to ओ पीके काका, फोटो नसेल तर by खटपट्या
खटपट्या दादा पुढच्या भागात
रांगेत उभा आहे तिरुपतिच्या
येऊ द्या पुढचा भाग.
हायला 500 किमीला अघोरी
In reply to हायला 500 किमीला अघोरी by अभ्या..
सलाम तुम्हाला.. तुमचे लेख खूप
In reply to सलाम तुम्हाला.. तुमचे लेख खूप by पी. के.
इश्श लाजलो मी लाजलो,
रूट सांगाल का ? जमलंच नकाशा
In reply to रूट सांगाल का ? जमलंच नकाशा by महासंग्राम
सविस्तर येईलचं पुढच्या भागात.
मस्त सुरुवात. पुभाप्र.
पाचशे असेना का पाच हजार.
मस्त मस्त
नवीन एक सफर मालिका
प्लॅन 1 नंबर ....
संधान दरी - हे कुठेशीक आलं?
In reply to संधान दरी - हे कुठेशीक आलं? by सूड
त्या दरीत ते साधतात...
सुरुवात मस्त
जबरा प्लॅन