Skip to main content

'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी '

लेखक भम्पक
Published on मंगळवार, 16/08/2016
महाड मध्ये सावित्री नदीवरचा ब्रिटिश कालीन पूल वाहून गेला.मोठी जीवित हानी झाली. ह्या आणि अश्याच कित्येक ब्रिटिशकालीन पुलांचे , शासनास वय झाले म्हणून पत्रं आली होती म्हणे. किती खरे किती खोटे देव जाणे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की , आपण अश्या पुलांचे म्हणा अगर कोण्या बांधकामाचे म्हणा , परीक्षण करण्यास नालायकच ठरलो आहोत. याला कारण काहीही असून द्या , पण हे मान्य करावे लागेल कि ब्रिटिशांची पुण्याई आता संपत चालली आहे आणि आपण वेळीच सावरलो नाही तर अवघड आहे. 'ब्रिटिशांची पुण्याई' शब्द ऐकल्यावर बऱ्याच जणांची अस्मिता दुखावली जाईल.किंबहुना मलाच तो शब्द जड वाटतो आहे परंतु वास्तव आहे. बघाना, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण काय केले. आणि असेही नाही कि अमेरिकेसारखे आपल्याला अति लवकर स्वातंत्र्य मिळाले आणि त्यांनी सर्व क्षेत्रात नवे शोध, असलेल्या शोधात नवीन भर , नुसते शास्त्र च नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही प्रचंड प्रगती जशी केली तसे आपण उपलब्ध गोष्टीतही किमान केली नाही. आज काहीही नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे येते ते बाहेर घासून , गुळगुळीत झालेले असते , आपणास ते नवीन असते.स्वातंत्र्यानंतर आपणास तसा वेळच लागला. असो आजचा तो विषय चर्चेचा नाही. मला म्हणायचेय आपण कधी स्वावलंबी होणार. बघाना , आता एकीकडे वाहनांची संख्या अफाट वाढते आहे , त्या पटीत रस्ते आणि मूलभूत सुविधा जश्या तश्याच आहेत आणि लक्षणीय तोकड्या पडताहेत. यावर आपले धोरण काय आहे हे संशोधनीय आहे.पुढील 10 वर्षात भारतासमोर ट्रॅफिक जॅम हि मोठी समस्या असणार आहे. उदा. पुण्यात वाकड या ठिकाणी महापालिकेने एक पूल बांधला , त्यामुळे पुणे-बेंगलोर महामार्गाला सिग्नल आणि शहरी रस्त्यासाठी उड्डाणपूल...म्हणजे आपण इतका पैसे, वेळ खर्चून मूर्खपणाच करीत आहोत. थोडक्यात काय तर आपण एखादी गोष्ट झाल्यावरच तिच्यावर उपाय योजना करतो , पण आधी पूर्व परीक्षण करून तिच्या वर काहीही करीत नाही. अशीच गोष्ट सामाजिक तेचि. स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली , आता स्वातंत्र्यपूर्वीचे माहित असलेला माणूस कमीत कमी 88 वर्षांचा असेल .म्हणजे आताची मोठी लोकसंख्या हि स्वातंत्र्यानंतरचीच आहे , म्हणजे त्यांना पारतंत्र्याचे वातावरण माहित नसणार. मग जी लोकशाही आपण स्वीकारली आहे , तिची तरी आपण कुठे व्यवस्थित निगराणी ठेवतो आहे. आज लोकशाहीचा अर्थच बदललेला आहे. मला भीती वाटते कि अजून 20 - 25 वर्षांनी परत संस्थानिक पद्धती येते कि काय? थोडक्यात काय तर आपण भारतीय चमत्कारांची अपेक्षा ठेवणारे आहोत आणि काहीही योजना न आखता 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ' या विचारसरणीचे आहोत. (या विषयाचा आवाका तसा खूप मोठा आहे , परंतु यथामती जेव्हढा शक्य आहे तेवढा टंकला.)

वाचन संख्या 3467
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आपल्याला आधी मानसिकता बदलावी लागेल. आपण अजून जेत्याची, शासकाची मानसिकता अवलंबू शकलो नाही. एकमेकाशी भांडायला थकत नाही पण ऑलिंपिक मधे घंटा.

तळमळ पोहोचली. यात बदल होण्यासाठी आपण कायकाय करूशकतो यावर चर्चा व्हावी. राज्यकर्त्यांवर दबाव वगैरे येत नसतो. बाकी वाकड पुलाचं म्हणाल तर तो पास झालेला नकाशा आडवा धरल्यामुळे झांलंय म्हणतात. बाकी काहीच चुकलं नाहीय! त्यापेक्षा स्वारगेट पुलाचे उद्घाटनापूर्वी तुकडे पडणे आणि खांबांशी मिस अलाईनमेंट जास्त काळजी वाटण्याजोगी आहे.

आजकाल जो उठतो तो चारचाकी घेतोय मला वाटतय रोड टॅक्स जबरी वाढवावा म्हणजे प्रायव्हेट कार्स ना कारच्या किमतीच्या २००% रोड टॅक्स लावा आणि त्या पैशातून नवीन मोठे रोड्स बांधा

In reply to by झपाटलेला फिलॉसॉफर

हावो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पार्कींगची जागा असल्याशिवाय कार देउच नका. रस्त्यावर लावली की उचलून दुसर्‍या दिवशी लिलाव करावी.

ठाणे खाडी वरचा, ठाणे व कळव्याला जोडणारा १५० जुना ब्रिटीश कालीन पूल 'सर्व' प्रकारच्या वाहतुकीसाठी महाड दुर्घटने नंतर बंद केला. यावरुन एकादी दुर्घटना घडल्यावरच शासन जागे होते हे लक्षात येते.