Skip to main content

Archery शिकायची आहे

लेखक कल्पतरू
Published on बुधवार, 10/08/2016
मी सध्या डोंबिवलीमध्ये राहतो आहे. मला Archery शिकायची आहे. मी नोकरी करतो ऑफिस वेळ सकाळी 9-6 आहे. डोंबिवलीमधेच ऑफिस आहे. जवळपास कुठले archery क्लासेस आहेत का? सावरकर अकॅडमीबद्दल मित्र सांगत होता. पण तिथे फक्त रविवार जायला मिळेल. जवळपास एखादा पर्याय आहे का?

याद्या 5137
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

शेल्फ श्टडी करा कि एकलव्या सारखी..... जमतय असं वाटलं कि लावा मग शीकवणी कुठल्यातरी द्रोणाचार्यांकडे.

मागे एकदा पेंढरकर कॉलेजच्या बाहेर बहुदा रायफल शुटिंगचा बोर्ड पाहिला होता. तिथे कदाचित असु शकेल. विचारून पहा.

मला सरकाळाच्या काड्या व छत्री च्या तारेचे धनुष्य यांच्या सहाय्याने केल्या जाणार्या आर्चरीचा खुप वर्षांचा अणुभव आहे, मेडल म्हणुन भरपुर धम्मकलाडु सुद्धा मिळालेत, कोणाला शिकायचे असेल तर इथेच सांगीतले तरी चालेल

तीनोळी धागा ! मुक्त ब्यॅटिंग ला मोकळे मैदान !! __________________________________________________ |||अथ धनुष्य उपाख्यानः || शाळेला सुट्टी असताना , एखाद्या उनाड शनिवार रविवारी ओढ्या पलिकडच्या रानातुन निरगुडीच्या झाडाचा एक मस्त कोवळा फोक तोडुन आणा , जास्त जाड नको अन जास्त बारीकही नको . अंगणातल्या एखाद्या तुटक्या फरशीच्या तुकड्याने मस्तपैकी त्याची साल सोडुन काढा , आणि वरच्या व खालच्या बाजुला धागा घट्ट बसेल अशा हिशेबाने खाचा करा. आता आपण मांजा करायला जो धागा वापरतो ना त्याचे लांबच्या लांब ३ ४ भाग करुन ते एकत्र विणुन जाडसर धागा तयार करा की जो प्रत्यंचा म्हणुन वापरता येईल. आता ही प्रत्यंच्या व्यवस्थित धनुष्यावर बसवा , धनुश्याचे शिवधनुष्य होणार नाही ह्याची काळजी घ्या . एकदा का ताणुन प्रत्यंचा बसली की अर्धे काम झाले ! आता दुपारच्या वेळेला घरातले झोपले असतील तेव्हा आंगण झाडायच्या खराट्यातील पाच दहा काड्या काढुन घ्या. खराट्याच्या काडी सारखा भारी बाण नाही ! अर्थात दोन चार दिवसात खराटा खिळखिळित झाल्याचे आजीला लक्षात आले की " कारट्यांनी एक गोष्ठ धड ठेवली तर नशीब ! मुळ नक्षत्र पडलंय हातावर मुळ नक्षत्र " असे ऐकत त्याच खराट्याने मनसोक्त चोप खा . थोड्याफार प्रयत्नाने मस्त कोडगेपणा शिकता येतो मग अख्खा खराटा आपलाच की ! एकदम अक्षय भाताच ! हां तर 'आपण इतके भारी धनुष्य बनवले आहे आणि आपण कसे अख्ख्या जगात लय भारी तिरंदाजी करतो' हे सार्‍या धाकट्या भावंडांना ऐकवा ते ही अगदी दशरथाचा किंव्वा पांडुचा (/इंद्राचा) आव आणुन ! मग त्यातील कोणाशी तरी भांडण होईलच , मग त्याला "दुष्टा, राक्षसा, आता तुझा अंतकाळ समीप आलेला आहे , तयार हो मरायला " असा महाभारतीय डायलॉग मारुन खराट्याची काडी निरगुडीच्या धनुष्यावर लय अगदी ब्रह्मास्त्र चढवल्याचा आव आणुन तणुन धरा ! दुदैवाने धाकट्या भावाला त्याच वेळी मस्ती करायची दुर्बुधी येईल अन तो राक्षसासारखा हसेल हा हा हा ! मग सोडा बाण !!!! धाकट्या भावाकडे धनुष्य नसल्याने महाभारत स्टाईल बाणा ला किस करायला दुसरा बाण तो सोडु शकणार नाही आणि कधी नव्हे ते आज आपण आज का अर्जुन व्हाल अन खप्प दिशी बाण घुसेल धाकट्या व्हावाच्या शरीरात ! मग तो बोंबलेल जीवाच्या आकंताने ! मग आजी धावपळ करेल डॉक्टर दवाखाना वगैरे वगैरे ! संध्याकाळी घरी आल्यावर नाना धनुष्याचे २ तुकडे करतील अन पार्श्वभागावर हाग्या मार देतील , ते म्हणन्तात ना की रामाने हात फिरवला म्हणुन खारीच्या पाठीवर तीन बोटे उमटली तसे आपल्या पार्श्वभागावर निरगुडीची बोटे उमटतील! आरशात पहायचा प्रयत्न करु नका , नीट दिसत नाहीत ! धाकट्याभावला रात्री झोपायच्या आधी, तिथे कोणी नसताना हळुच चड्डी खाली करुन ढुंगण दाखवुन विचारा ! तीन पेक्षा कमी असतील तर आपण जिंकलो , जास्त असतील तर तो जिंकला ! दुसर्‍या दिवशी आजी सोबत उभे राहुन आपले धनुष्य बंबात जाळा. आज्जी म्हणत असेल की हां 'आता कशी नानांनी अद्दल घडवली' वगैरे वगैरे ...तेव्हा निरगुडीच्या रानात परवा पाहिलेल्या फाट्याची लगोर करायला रबर अन चामडे कोठुन मिळवायचे ह्याचे प्लॅनिंग करा ! || इतिश्री बालकांडे सप्तम वर्शे धनुष्यउपाख्यान: संपुर्णः ||

In reply to by प्रसाद गोडबोले

जबराट!!! कार्टी भलतीच उपद्व्यापी आहेत......इति आजी/आजोबा!!! आताच्या जमान्यात पोरं ए के 47 पासून सुरुवात करतात (खेळण्यातल्या), धनुष्य वगरे फार दुर्मिळ आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

लहानपण आठवले...आपण सुतळी वापरायच आणि एखादी काठी घेऊन तिचा बाण बनवायचे आणि त्या बाणाला रेनाॅल्ड पेनचे टोपण लावायचो ...मला तर वाटले माझाच अनुभव लिहला...

:)