Skip to main content

नेमबाजी

Archery शिकायची आहे

लेखक कल्पतरू यांनी बुधवार, 10/08/2016 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्या डोंबिवलीमध्ये राहतो आहे. मला Archery शिकायची आहे. मी नोकरी करतो ऑफिस वेळ सकाळी 9-6 आहे. डोंबिवलीमधेच ऑफिस आहे. जवळपास कुठले archery क्लासेस आहेत का? सावरकर अकॅडमीबद्दल मित्र सांगत होता. पण तिथे फक्त रविवार जायला मिळेल. जवळपास एखादा पर्याय आहे का?

क्रिडाजगतातील कुंभमेळा... रिओ ऑलिंपिक..आणि घडामोडी ..

लेखक shawshanky यांनी शुक्रवार, 05/08/2016 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून रिओ ऑलिम्पिक २०१६ ची दमदार सुरूवात होणार असून क्रीडा ज्योत महान फुटबॉलपटू पेले यांच्या हस्ते प्रज्वलित होईल अन् आकाश उजळून सोडणाऱ्या आतशबाजीने खेळाडूंच्या स्पर्धेला प्रारंभ होईल. या ऑलिम्पिक महाकुंभाची ओपनिंग सेरमनी रिओतील माराकाना स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंकडून साऱ्यांनाच अपेक्षा आहेत. शनिवारी पहाटे उद्घाटन सोहळ्याद्वारे सुरू होत असलेल्या ३१व्या ऑलिम्पिक क्रीडा महाकुंभात सर्वांत मोठ्या भारतीय पथकाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीसह अधिकाधिक पदकांच्या अपेक्षा सव्वाशे कोटी भारतीय बाळगून आहेत.

कूट-मिपा

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 14/03/2016 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, हे शब्दकोडं म्हणजे एक किंचित गंमत. बरेचदा आंतर्जालावर, पण त्यातल्या त्यात मिपावर, काही अफलातून तर काही टंकनकष्ट वाचवणारी लघुरुपं किंवा काही शब्दसमूह वापरले जातात. त्यांचा वापर करून हे कोडं जन्माला आलेलं आहे. तुलनेने नंतर आलेल्या वाचकांनी सहभाग घेतला तर १०-१२ प्रतिक्रियांत, अन्यथा मुरलेल्या मिपाकरांनी भाग घेतला तर २-३ च प्रतिसादांत या कोड्याचा फडशा पडेल अशी अपेक्षा आहे. पण यानिमित्ताने (सर्वच शब्द सामावून घेणं जमलेलं नाहीच, तरीही) बऱ्याचश्या मिपा-शब्दांची एकाच ठिकाणी गाठ पडावी हा या संकलनामागचा हेतू. म्हंटलं शहाणे करून सोडावे सकल मिपाजन! तर हे घ्या, कूट-मिपा!