✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कवितेपलिकडील कविता

आ
आनन्दा यांनी
Sun, 07/10/2016 - 20:36  ·  लेख
लेख
आत्ता एका धाग्यावर हा उल्लेख वाचला
हा मोगाखान निदान जसा आहे तसा दाखवतो. त्याच्यापेक्षा मुंह में राम बगल में छुरी असले लोक जास्त डेंजरस. वरनं संभावितपणाचा आव आणतात आणि आपणच मिपाचे हितकर्ते म्हणून बोंबा मारतात. स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत. ते सुद्धा डुप्लिकेट आयडींच्या नावाने शिमगा करतात. ही मोठी गंमत आहे. कुठे सगळ्यांना तुम्ही पुरे पडणार आहात की प्रशांत/नीलकांत पुरे पडणार आहेत?
हे वाचले आणि प्रसून जोशी चे भाग मिल्खा भाग मधले "जिंदा है तो" गाणे आठवले - कोयला काला है, चट्टानोंने पाला है| अंदर काला बाहर काला पर सच्चा है साला.!! हे गाणे ऐकल्यापासूनच वरील ओळ मनात घर करून बसली होती. काही गाण्यांमध्ये अश्या काही गाण्यापलिकडील कविता असते. उदा. प्र. के अत्रे यांची स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी किंवा आता आता चींटू मध्ये संदीप खरेने लिहिलेले मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही यातीलच काही. मी याला कवितेपलिकडील कविता म्हणतो. मूळ कविता कितीही मोठी, किंवा छान असली, तरी या अश्या एक एक ओळी त्या कवितेपलिकडे जातात. मग म्हणले मिपाकरांना विचारूया त्यांना अश्या कोणत्या कविता आठवतात, की त्या ज्या कवितेमधून आल्या आहेत, त्या कवितेच्या पलिकडे कधीच पोचल्या आहेत. अट एकच आहे, की तुम्हाला कवितेमधील एकच ओळ सांगता येईल, जिने मूळ कवितेची सीमारेषा कधीच ओलांडली आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
14039 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

अदम गोंडवी यांची 'आप केहते है

पुंबा
Wed, 07/13/2016 - 17:30 नवीन
अदम गोंडवी यांची 'आप केहते है सरापा, गुलमहर है जिंदगी' या कवितेतील खालील ओळ... चार दिन फूटपाथ के सांये मे रहकर देखीये डूबना आसान है आंखो के सागर मे जनाब..
  • Log in or register to post comments

कवितेपलिकडील कविता

जयन्त बा शिम्पि
गुरुवार, 07/14/2016 - 14:26 नवीन
अछ्छा , असे आहे तर ? जावू द्या , शेवटी " पसंद अपनी अपनी , खयाल अपना अपना " विषय संपला.
  • Log in or register to post comments

..कुछ रीत जगतकी ऐसी है, हर एक

सस्नेह
Mon, 07/18/2016 - 21:08 नवीन
..कुछ रीत जगतकी ऐसी है, हर एक सुबहकी शाम हुई तू कौन है क्या है नाम तेरा, सीताभी यहाँ बदनाम हुई..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा