Skip to main content

कविता

लेखक आ युष्कामी यांनी रविवार, 12/06/2016 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
कविता करणे माझा छंद आहे आपणही काहीतरी करतो इतरांपेक्षा वेगळं साहजिकच झुंडीपेक्षा वेगळा मी भलताच देऊन जातो आत्मसन्मान शब्दाला शब्द अन यमकांचा खेळ लहानपणी वाचलेलं सुभाषित लख्ख आठवतं काव्य, शास्त्र , विनोद यांत रस नसलेला माणूस शेपूट, शिंग नसलेला पशु आहे मीही सरसावतो घेऊन पेन , ओढून पुढ्यात कागद वगैरे फर्रकन मीही गलबलतो शेतकरयांचे, कष्टकरयांचे दु:ख ऐकून , पाहून कधी कधी विषण्ण सुद्धा होतो drawingroom मधल्या खुर्चीत सैलावत माझेही अश्रू ओघळतात महागड्या कार्पेटवर हिंदकळतो हातातला ग्लास मीही शोक व्यक्त करतो बलात्काराच्या घृणास्पद घटनांवर अन् विचार करतो आज interview ला आलेली पोरगी एकदम मस्त होती try करायला पाहिजे डोळे जडावतात आणि पापण्या दिवसभराच्या श्रमाने विसावतात पडदे ओढून घेतल्यावर काळ्याकुटट भिंतीवर चित्रे उमटू लागतात माझ्यातला मर्द, interview आलेली पोरगी, बाजूच्या डेस्कवरची hot बेब काहीसा नवा , काहीसा जुना खेळ मीही करतो कविता कधी मधी
लेखनविषय:

वाचने 505
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया