तलम साडीतुनी डोकावे, तुझा खांदा गोरापान
पडता नजर त्यावरी होइ ,मन खट्याळ व बेभान
कापलेले रेशमी केस रुळति, तुझ्या गो~या पाठिवर
अवखळ रेशमी बटा येती, तव डोळ्यावर वारंवार
हिरेजडित कर्ण भूषणे डुलती.वा~यासंगे आनंदून
ओशाळला गुलाव.. तव गौर गुलाबी तनू पाहून
मोहक गुलाब लाली, गालावरची लाजविते लज्जेला
रती रूप असे देखणे ,का तू लाजवितेस अप्सरेला
लवता नेत्र पापणी,तेजस्वी नेत्र प्रभा अशी फाके
विलगता अधरपाकळ्या. शुभ्र दंतपंक्तीची रांग झळके
नाजुक सोनसाखळी रुळते ,तव वक्षस्थळांच्या घळी
भाग्यवान धनी,नावाने ज्याच्या कुंकू लावशील भाळी
प्रतिक्रिया
11 Jun 2016 - 2:28 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
पण सावळ्या रंगाच्या मदनिका सुद्धा मादक असतात.