✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझा बगिचा!

ज
जव्हेरगंज यांनी
Sat, 06/04/2016 - 19:51  ·  लेख
लेख
माझ्या घराशेजारीज मी एक बाग लावली आहे. बागेत भरपूर झाडं आहेत. त्यांना मी रोज पाणी घालतो. एकदाच फुल लागलेलं गलाबाचं रोपटं वर्षानुवर्ष जागा अडवून बसलंय. कधीतरी फुलेलंच या आशेनं मी त्याला शेण लावून कलम करत राहतो. एकदातर त्याच्या बुंध्यालाच कात्री लावली होती. पण पुन्हा तरारुन उगवलं. फुले मात्र त्याला कधीच लागली नाहीत. कर्दळीची झाडे अमाप आहेत. आता कर्दळंच का लावली? असे विचारणाऱ्यांचा मला विशेष राग येतो. फारफार तर त्याच्या पुंगळ्या काढून मला वाजवायला आवडतात हे ही कारण असू शकेल. पण तेच असेल असंही नाही. 'कर्दळ' हे नावंच कसं ऐकायला भारदस्त वाटतं. 'कर्दळीच्या वनात' वगैरे असं लोकांनी लिहून ठेवले आहे. आमच्या शेतातपण बोरीच्या झाडाखाली कर्दळंच उगवलीय. शेवटी कर्दळंच ती. त्याच कसली आलीय आवड निवड. पण मला आवडते. तिची लाल लाल फुलं बघायला मजा येते. कोरफड सदृश्य एक झाडं आहे. लांब पाकळ्यांच पांढरं फुल त्याला लागतं. त्याचा मधला तुरा खायला पण मस्त लागतो. एकदा त्याचा सुवास घेतला की तासभर तरी नाकातून जात नाही. पण त्या झाडाखाली साप येतो म्हणून म्हातारीनं उपटून टाकलं. एकच झाड होतं. पुन्हा कुठे मिळालंही नाही. एकदा मी ज्वारी, बाजरी, गहू, शेंगदाणे, वाटाणे, अगदी तांदूळसुध्दा एकमेकांत मिसळून एका चौकोनी जागेत लावले. खत वगैरे टाकून पाणी शिंपडलं. मग रानच करायचं ठरवलं. बारक्या काटकीनं सऱ्या पाडल्या. आडव्या मारुन वाफंबी तयार केलं. बांधावर आख्खी कैरीच पुरुन टाकली. हाताशी घावले म्हणून कडंनं चिंचोकेपण पेरले. मग रोज उठून बारक्या शेताची प्रगती तपासणे हा माझा आवडता खेळच होऊन गेला. तांब्याभर पाणी शेताला पुरुन उरायचं. तिसऱ्या चौथ्या दिवशी बारीक बारीक कोंब मातीतून बाहेर डोकावू लागले.('जमलं की!' काळ्या काळ्या मातीत लपलंय कोण?) मन या कोंबावरून त्या कोंबावर उडत गेले. पण ह्यातली ज्वारी कुठली अन बाजरी कुठली? कशाचाच मेळ लागेना. बांधावरचा आंबा मात्र लगेचच ओळखू आला. वाघ पाठीमागं लागल्यासारखी रोपं तरारुन वरती आली. गावात गच चिच्चा असताना बारक्या चिच्चंचा पाला एकदा खाऊन बघितलाच. अवर्णनीय. आंब्याचा कोवळा पाला हातावर चोळून वास घेतला. आहाहा! कैरीचीच आठवण आली. एवढी, की थोडासा पाला खाऊनच टाकला. (बापरे, पुन्हा त्या वाटेला गेलो नाही ) भुईमूग तर एवढा वाढला उपटूनच टाकावा की काय असं वाटून गेलं. बारक्या चिल्यापिल्यांत थोराड टग्यासारखा तो पसरला होता. शेंगातरी मिळतील म्हणून शेवटी उपटूनच टाकला. एक मोठ्ठी शेंग वगळता हाताशी काय लागलं नाही. फोडून मग तिच्यातले शेंगदाणेही खाऊन टाकले. मग गव्हाला लोंब्या लागतील, ज्वारी बाजरीला कणसं लागतील म्हणून वाट बघत राहिलो. पण रोपं तेवढीच राहिली. का राहिली? त्यांनी माझ्या इवल्याश्या शेतालाच जग समजलं की काय! बारक्या रानात बारकंच राहायचं असं त्यांनी ठरवलं असावं. नाहीतर माझ्या घराभोवती एव्हाना जंगल तयार झालं असतं. पिकलेले आंबे आणि गाभुळलेल्या चिंचा अंगणात सडा टाकत राहिल्या असत्या. पण तसं काही झालं नाही. पुढे बऱ्याच दिवसांनी ते शेत जळून गेलं. सध्या बगिच्यात एक बटाट्याचं रोप लावलयं. बघूया कसं जमतयं ते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6735 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

काय गोड लिहिलंय!

यशोधरा
Sat, 06/04/2016 - 20:03 नवीन
काय गोड लिहिलंय!
  • Log in or register to post comments

छानच

सौन्दर्य
Sat, 06/04/2016 - 21:56 नवीन
शाळेत असताना (बहुतेक दुसरीत) गुरुजींनी एक-एक रोप आणायला सांगितले होते. काही वाटाणे पेरले होते व त्याची वाढ रोजच बघत होतो, त्याची आठवण झाली. मी देखील ज्या काही बिया हाताशी येतील त्या घरा मागच्या छोट्या बागेत टाकतो व पुढे काय होईल त्याची वाट बघतो. लहानपणी वाचलेली 'जॅक अँड द बिन स्टॉक' ही गोष्ट आठवली. जव्हेरगंज, छान लिहिलत.
  • Log in or register to post comments

किती सुरेख लिहीलंय. तुमच्या

स्रुजा
Sat, 06/04/2016 - 22:10 नवीन
किती सुरेख लिहीलंय. तुमच्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळं आणि सुंदर लिहिलंय.
  • Log in or register to post comments

काय धमाल चाललीय!तुम्ही लखनउचे

कंजूस
Sat, 06/04/2016 - 22:22 नवीन
काय धमाल चाललीय!तुम्ही लखनउचे नवाब.तुमच्या बागेत माणिकमोतीच पिकतात जव्हेरगंज.
  • Log in or register to post comments

मस्त

कविता१९७८
Sat, 06/04/2016 - 23:42 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

मस्त

कविता१९७८
Sat, 06/04/2016 - 23:42 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

छानच लिहिलंय.

पद्मावति
Sun, 06/05/2016 - 01:48 नवीन
छानच लिहिलंय.
  • Log in or register to post comments

मस्त मस्त...

खेडूत
Sun, 06/05/2016 - 07:08 नवीन
मस्त मस्त... अगदी माझं बालपणीचं बारकंसं शेत आठवलं.
  • Log in or register to post comments

भारी लिहिलंय.

प्रचेतस
Sun, 06/05/2016 - 09:58 नवीन
भारी लिहिलंय.
  • Log in or register to post comments

लय भारी.

भरत्_पलुसकर
Sun, 06/05/2016 - 11:16 नवीन
लय भारी.
  • Log in or register to post comments

चांगलय..

जेपी
Sun, 06/05/2016 - 14:54 नवीन
चांगलय..
  • Log in or register to post comments

मस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/05/2016 - 15:45 नवीन
बगीचा आवडला. भारी वाटत होतं वाचतांना. लेखन आवडलं. फक्त, गव्हाच्या ओंब्या ना ? की आणखी कुठे लोंब्या म्हणतात ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मी तरी लोंब्याच ऐकलंय

जव्हेरगंज
Sun, 06/05/2016 - 21:41 नवीन
मी तरी लोंब्याच ऐकलंय पहिल्यापासून! ओंब्या ही असू शकेल म्हणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाताचे दाणे भरू लागले की तुरा

कंजूस
Mon, 06/06/2016 - 07:40 नवीन
भाताचे दाणे भरू लागले की तुरा वजनाने लोंबतो - लोंब्या.गव्हाचे तसे नसते ते ताठच राहाते - ओंब्या.ज्वारी बाजरीची तर जाडजूड कणसंच लोंबण्याचा प्रश्नच येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

हो..

सरल मान
Wed, 06/08/2016 - 14:23 नवीन
आमच्याकडे पण लोंब्याच म्हणतात आणि हो, खुप आवडल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

कलादालनात टाकलाय म्हणुन

कानडाऊ योगेशु
Sun, 06/05/2016 - 15:55 नवीन
कलादालनात टाकलाय म्हणुन चित्रे असतील अश्या विचाराने हा धागा उघडला. चित्रे काही दिसली नाहीत.मात्र ओघवत्या शैली मुळे लेख वाचनीय झाला आहे.
  • Log in or register to post comments

कलादालनात काहीतरी टाकायची

जव्हेरगंज
Sun, 06/05/2016 - 21:43 नवीन
कलादालनात काहीतरी टाकायची इच्छा होती! म्हणून आपलं हे असलं काहीतरी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

:) :(

चांदणे संदीप
Sun, 06/05/2016 - 18:13 नवीन
कुठल्याही नॉस्टॅल्जिक लेखापेक्षा हा लेख सुंदर आहे! इतका, की लहाणपणीचा बगीचा, रोपे, वाफे आठवून भरून आलं मला! किध्र्से लाते मियां ऐसे लेखां? Sandy
  • Log in or register to post comments

सुंदर!

किसन शिंदे
Sun, 06/05/2016 - 19:17 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

अनेक आभार मंडळी !!

जव्हेरगंज
Sun, 06/05/2016 - 21:44 नवीन
अनेक आभार मंडळी !!
  • Log in or register to post comments

:)

पैसा
Sun, 06/05/2016 - 21:48 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मस्त मस्त!

अजया
Sun, 06/05/2016 - 21:57 नवीन
मस्त मस्त!
  • Log in or register to post comments

पालकांना

नाखु
Mon, 06/06/2016 - 09:01 नवीन
बालपण आठवणारं मुक्तक आम्ची दाद स्वीकार करा. बागवान नाखु
  • Log in or register to post comments

एकदम भारी लिहिलय

स्पा
Mon, 06/06/2016 - 09:04 नवीन
एकदम भारी लिहिलय
  • Log in or register to post comments

मस्तच...

ब़जरबट्टू
Mon, 06/06/2016 - 09:53 नवीन
आवडले.. गुलाबाला एकदा फुलं आले, तुम्ही परत कात्री लावली, यावरुन तुम्ही डोळा असलेली कलम उडवली असून आता फक्त मुळ जंगली गुलाब वाढवताय, हे नमुद करतो.. :)
  • Log in or register to post comments

खूप संदर!

समीरसूर
Mon, 06/06/2016 - 10:10 नवीन
खूप संदर!
  • Log in or register to post comments

अगदी माझ्या मनातलच, मेथिचि

पियुशा
Mon, 06/06/2016 - 10:47 नवीन
अगदी माझ्या मनातलच, मेथिचि शेति केलिय उलुशिच, मिरच्यना चा एक हफ्ता होउन गेलाय परत फुल आलिअयेत , पुदिअना माजलाय सगळिकडे ;)वा ग्याला फुल आली होति प्न वान्ग नाही आले अजुन. पानपन कुरडतल्यासार्खी झालिय , वाटाणावाळुण गेला :( जमल तर फोटु टाकते उद्या माझ्या पण उलुश्या शेतीचे :)
  • Log in or register to post comments

टाका ना फोटोज,

जव्हेरगंज
Wed, 06/08/2016 - 09:19 नवीन
टाका ना फोटोज, उत्सुकता आहे बघण्याची!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

लिहीलंय छान!! पण आयडी बघता

सूड
Mon, 06/06/2016 - 16:27 नवीन
लिहीलंय छान!! पण आयडी बघता काही रुपककथा असावी का काय असं वाटून गेलं.
  • Log in or register to post comments

छान लिहीलंय

राघवेंद्र
Mon, 06/06/2016 - 23:03 नवीन
छान लिहीलंय !!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा