पाणी अडवा पाणी जिरवा - एक सफल प्रयोग.
मागे एकदा मी माझ्या कोकणातील गावाची काही चित्रे खफ वर डकवली होती. ही चित्रे गावातील पाणी टंचाई बाबत होती. पैसा ताइंनी मला याबद्द्ल लेख लीहीण्यास सुचवले म्हणून हा प्रपंच.
आज काल आपण जलयुक्त शिवार आणि अशाच काही सरकारी योजनांबद्द्ल ऐकतो. नाद खूळा यांची तर लेख मालाच आली होती पाणी नियोजनाबद्दल. अशा योजनांमधे सरकार जीतकी शक्य होइल तेवढी मदत करतच असते. (निदान नवीन सरकार तरी सकारात्मक आहे) बर्याच वेळेला शासकीय यंत्रणा काही कारणास्तव प्रत्येक गावात पोहोचू शकत नाही. पण सरकार काही करत नाही म्हणून बसून रहाण्यापेक्षा आपण जर योजना फक्त समजावून जरी घेतली तरी बरेच फायदे होउ शकतात. आता ते कसे ते पहा.
आमच्या गावातील आमच्या वाडीत घरे १२. बारा घरांसाठी ५ विहीरी. या विहीरी पावसात हाताने पाणी काढता येइल एवढ्या भरलेल्या असतात. पण पावसाचे दीवस संपले की दीवाळी नंतर या विहीरी कोरड्या पडतात. त्यात आजकाल सर्वांनी घरात संडास बांधले आहेत. त्यामुळे मग टाक्या बांधल्या आहेत. एका घरात जेवढ्या चुली तेवढ्या टाक्या. गरज असो नसो सकाळ झाली की पंप लावुन टाक्या भरुन घ्यायच्या. त्यामुळे रात्रभर जे काही पाणी विहीरीमधे जमा झाले असेल त्याचा सकाळी उपसा होतो. यात सर्वात जास्त पाणी लागते ते संडाससाठी. गावात पाण्याचा स्त्रोत एकच - विहीरी. त्यामुळे सर्व कामांसाठी पीण्याचे पाणी वापरले जाते. त्यामुळे गावात गेल्यावर पाण्यासाठी धावपळ करावी लागायची.
पाण्याचे दुर्भिक्ष्य घालवण्यासाठी विचारमंथन चालू झाले. बर्याच लोकांनी बरेच सल्ले दीले. वाडीतुन एक ओढा जातो. हा ओढा पावसाळ्यात दुथडी भरुन वाहतो. पण दीवाळीनंतर कोरडा ठणठणीत. गावातील पाच विहीरी याचा ओढ्याचा आजूबाजूला आहेत. योजना ठरली. या ओढ्यातील गाळ काढायचा पात्र खोल करायचे. थोड्या थोड्या अंतरावर चार ते पाच फुटाचे बांध घालायचे. हे काम श्रमदानाने करता येण्यासारखे होते. पण गावात लोक्स कमी. मग मे महीन्यात जे कोणी गावाला जाणार होते त्यांना ही योजना सांगीतली. योजना ऐकल्यावर एक दोघांनी नाके मुरडली तर काही जणांनी मिळून एक बांध घातला सुद्धा !! पावसाळ्यात पाणी जमा झाले. आजुबाजुच्या विहीरींच्या पाण्याची पातळी वाढली. हे पाहून सर्वांना हुरुप आला. शेवटी आर्थिक परीस्थीती चांगली असणार्या एका काकांनी सरळ बुलडोझर मागवला व ओढ्यातील गाळ काढण्यास सुरवात केली. नुसता गाळ न काढता ओढ्याचे पात्र देखील चार फुटाने खोल केले.
नतीजा आपके सामने है. अजुन काम सुरु आहे. या पावसाळ्यात अजुन पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
थोडक्यात - सरकारी मदत मिळेल कींवा बाकी कोणी काहीतरी करेल या आशेवर न रहाता ज्याला ज्याला जे शक्य आहे ते केल्यास पाणी समस्या सुटू शकते
नतीजा आपके सामने है. अजुन काम सुरु आहे. या पावसाळ्यात अजुन पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
थोडक्यात - सरकारी मदत मिळेल कींवा बाकी कोणी काहीतरी करेल या आशेवर न रहाता ज्याला ज्याला जे शक्य आहे ते केल्यास पाणी समस्या सुटू शकते
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काहीही
महत्त्वाचं काम
फार विधायक काम केलेत तुम्ही.
अभिनंदन!
वाह...!
सर्व प्रतिसादकांचे परत एकदा
साठलेल्या पाण्यात मस्ती
उत्तम काम केले आहे. छान वाटले
धागा मुद्दाम वर काढत आहे.
खटपट्या शेठ, फोटो दिसतील असे
मी फोटो फेसबुकावर अपलोड करुन
आता काय
तात्पुरते बंधारे घातले जातात