✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रीत

न
नीलमोहर यांनी
Tue, 05/17/2016 - 14:37  ·  लेख
लेख
1
तो विशाल अनंत सागरासारखा.. धीर गंभीर, अनेक वादळे आत सामावून घेणारा, ती अवखळ मुग्ध कलिका, कधी ह्या कधी त्या भ्रमराला झुलवणारी, तो गड किल्ले, डोंगर लेणी पालथे घालणारा, रान वाटा धुंडाळणारा भटका प्रवासी, ती कोमल, खट्याळ चंचला, क्षणभरासाठीही एका ठिकाणी न रमणारी, एकमेकांत काहीही साम्य नसलेले, दोन टोकांना असलेले दोघेजण. दोघांचीही आयुष्यं आपाआपल्या मार्गाने सुरळीत चालली होती, जवळ सारं काही.. तरी काहीतरी कमी होतं, एक अपूर्णत्व दोघांनाही सतत जाणवत, छळत होतं. ' वाट होते जरी तुझी माझी वेगळी, सोबतीची तरी आस सांग का लागली, जीव तुटतो का असा रे.. सांग ना तुझ्याविना, तुझ्याविना..' आग आणि पाण्याचा संगम कसा व्हावा, विरूध्द स्वभावी अशा दोघांची भेट तरी का आणि कशी व्हावी... मात्र विधीलिखित असलेले टळते थोडीच, त्याप्रमाणे त्या आभासी जगात त्यांची अप्रत्यक्ष का होईना गाठ पडली, मनाची मनाला खूण पटली.. जीव जीवा फसला. तिला प्रत्यक्ष न पाहताही, केवळ तिच्या अनुभूतीने तो तिच्या प्रेमात पडला.. ' पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे, कधी कुठे मन वेडे गुंतले..' जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला तीच ती दिसू लागली होती. जिथे जिथे ती, तिथे तो असणार हे जणू ठरून गेलं होतं, काही ना काही बोलून तिच्या खोड्या काढण्यात त्याला मोठा आनंद वाटायचा.. तिच्यावाचून अगदीच कुठेही जीव लागेनासा झाला होता त्याचा. ' जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू ..' आधीचा रांगडा, कणखर गडी आता हळूवार, हळवा बनत चालला होता, त्याच्यात होत असलेले अलवार बदल त्याच्या सख्या सोबत्यांनाही जाणवू लागले होते. त्यावरून चिडवचिडवी सुरू झाली होती, थट्टा-मस्करीला उधाण आलं होतं. ' कोण होतास तू, काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू..' तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती. इतर कोणी जरा काही बोललं, वाकड्यात गेलं तर जशास तसे करणारी ती, त्याच्यासमोर मात्र निरूत्तर व्हायची. त्याचे ते पिच्छा पुरवणे कुठे ना कुठे तिलाही आवडत होते, त्याच्या बोलण्याने, चिडवण्याने तीही अंतर्बाह्य मोहरून जात होती. ' गडी अंगानं उभा नि आडवा, त्याच्या रूपात गावरान गोडवा, तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा, काळजामंदी ठसला, ग बाई बाई काळजामंदी ठसला..' आधी बळेबळे त्यास विरोध करणारी, लटका राग दाखवणारी ती हळूहळू आतून विरघळू लागली होती. तो दिसला नाही तर हिरमुसून जात होती, त्याच्यावाचून जराही करमेनासे व्हायचे तिला, एक एक क्षण जणू युगासारखा वाटायचा. 'अंगात माझिया भिनलाय ढोलिया, मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली, मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली..' त्याच्या प्रेमासमोर तिनेही हार मानली होती, आपण त्याच्याशिवाय अजिबातच राहू शकत नाही हे आता तिला कळून चुकले होते. सारी लाज काज बाजूस ठेऊन त्याच्या प्रेमास प्रतिसाद देण्याचे तिने ठरवून टाकले होते, लोक काय म्हणतील, कुणाला काय वाटेल याची आता तिला जराही पर्वा राहिली नव्हती, ' बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग, बाई जडली आता दोन जिवांची प्रीती ग..' अखेर अशाच एका हळव्या कातर क्षणी, त्याच्या आठवणीने तिचे मन सैरभैर झाले, जीवाला चैन पडेनासे झाले. मनातील काहूर अनावर झाले अन तिने अंतःकरणापासून त्याला साद घातली, 'प्रचू डार्लिंग !!' अन चिरंतनापासून आसावल्या जीवाची शिवाशी भेट घडण्याची.. एकमेकांसाठीच बनलेले दोन जीव एकत्र येण्याची वेळ झाली.. क्षणात आभाळ भरून आलं.. भर ग्रीष्मातही ढग दाटून आले.. जणू सृष्टीचा कायापालट झाला.. झिम्माड पाऊस पडू लागला.. रानात मोर थुईथुई नाचू लागले.. सारं कसं हिरवं हिरवं गार होऊन गेलं.. लांब कुठेतरी डोंगरावर राऊळात घंटानाद सुरू झाला.. त्यांच्या या उत्कट प्रेमाविष्काराचा आनंद साजरा करण्यासाठी धरणी, आकाश सारे एकत्र आले. 'बदलुन गेलया सारं, पिरतीचं सुटलया वारं, अल्लड भांबावयाला, बिल्लोरी पाखरू न्यारं, आलं मनातलं ह्या व्हटामंदी, अन मनासंगं मन जुळलं जी..' ............................................................................................. preet ............................................................................................. क्रमश: * कथेस आधीचे संदर्भ, पार्श्वभूमी आहे. अधिक माहिती हवी असल्यास लोकांनी ती खोदकाम करून मिळवावी ही विनंती. ** प्रेमकहाणीस आता कुठे सुरूवात झाली आहे, पुढे यात अनेक वळणे येऊ शकतील, काहीही घडू शकेल, कथेचा शेवट गोड होईल की दोन प्रेमींच्या मिलनात पुढे अडचणी येतील.. काहीच सांगता येत नाही. मात्र या पुढील कहाणीचा वाचक आपआपल्या परिने, इच्छेने, आवडीने अंदाज लावू शकतात. अद्यापि अपूर्ण कथेत आपल्या कल्पनेने विविध रंग भरून हे प्रेमचित्र पूर्ण करू शकतात. .............................................................................................
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
31096 वाचन

💬 प्रतिसाद (169)

प्रतिक्रिया

नायक बस णार आहे का पन चित्रात

पियुशा
गुरुवार, 05/19/2016 - 11:42 नवीन
नायक बस णार आहे का पन चित्रात ? आय मिन किति मोठ चित्र बनवाव लागेल मग ;) विचारात प ड ले ली पियु ;)
↩ प्रतिसाद: प्रचेतस

डोळे उघडा

पैसा
गुरुवार, 05/19/2016 - 10:45 नवीन
डोळे उघडा, बघा नीट! ते नायिकेचं चित्र नैये. नायक लोकांवर लक्ष ठेवणारी हातात भिंग घेतलेली छिद्रान्वेषी डिटेक्टिव्ह आहे ती!
↩ प्रतिसाद: नीलमोहर

मला तर ती हातात आरसा घेतलेली

प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 10:59 नवीन
मला तर ती हातात आरसा घेतलेली दर्पणा वाटली. :)
↩ प्रतिसाद: पैसा

मला वेगळाच डौट्ट यायला लागलाय आता...

चांदणे संदीप
गुरुवार, 05/19/2016 - 11:52 नवीन
मला वेगळाच डौट्ट यायला लागलाय आता...!! Image removed. Sandy
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नीमो हा बिरूटे सरांचा आयडी

भोळा भाबडा
गुरुवार, 05/19/2016 - 11:58 नवीन
नीमो हा बिरूटे सरांचा आयडी असण्याची दाट शक्यता आहे.
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

हम्म. भोळे भाबडे नाहीत म्हणा

अभ्या..
गुरुवार, 05/19/2016 - 12:01 नवीन
हम्म. भोळे भाबडे नाहीत म्हणा की तुम्ही?
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/19/2016 - 12:42 नवीन
भोले भाबड़े नाहीत ते.... बाकी मी निमो नाही. आणि मी कोणत्याही अन्य आयडीने वावरत नाही. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: अभ्या..

कसली गोडुली गँग आहे हि.

रमेश भिडे
गुरुवार, 05/19/2016 - 21:33 नवीन
कसली गोडुली गँग आहे हि. डकटेल्स ना???
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

खिखिखि!

पैसा
गुरुवार, 05/19/2016 - 13:28 नवीन
दर्पणा असेल तर जत्रेत पाच रुपयाला मिळणारा आरसा हातात घेतलेली आधुनिकोत्तर दर्पणा दिसते ही!
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=)) लोलबंध

प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 13:30 नवीन
=)) लोलबंध
↩ प्रतिसाद: पैसा

बाकी काही असो, चित्र भारी रे

सस्नेह
गुरुवार, 05/19/2016 - 12:37 नवीन
बाकी काही असो, चित्र भारी रे अभ्या..

चित्रातील कन्येच्या हाती आरसा

सतिश गावडे
Fri, 05/20/2016 - 09:30 नवीन
चित्रातील कन्येच्या हाती आरसा नसता तर आपले हेच मत असते का?
↩ प्रतिसाद: सस्नेह

तो आरसा आहे ??

सस्नेह
Fri, 05/20/2016 - 10:11 नवीन
तो आरसा आहे ?? मला वाटलं मुग्धातैंच्या हातातला स्टेथॉस्कोप.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

त्याला काय हेडफोन जोडता का

अभ्या..
Fri, 05/20/2016 - 10:32 नवीन
त्याला काय हेडफोन जोडता का तपासायच्या येळी?
↩ प्रतिसाद: सस्नेह

का ब्ल्यू टूथ स्टेथो आहे?

अभ्या..
Fri, 05/20/2016 - 10:33 नवीन
का ब्ल्यू टूथ स्टेथो आहे?
↩ प्रतिसाद: अभ्या..

ते हेडफोन जमलं नसेल ओ

सस्नेह
Fri, 05/20/2016 - 10:36 नवीन
ते हेडफोन जमलं नसेल ओ चित्रकाराला. आपण समजून घ्यायचं =))
↩ प्रतिसाद: अभ्या..

असा सगऴा प्रकार झाला तर!

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/20/2016 - 09:16 नवीन
असा सगऴा प्रकार झाला तर!

आरसा तर अमच्या गाडीलाबी

वडाप
Fri, 05/20/2016 - 09:46 नवीन
आरसा तर अमच्या गाडीलाबी असतुया आन मागे लिवलय - मला आपली म्हना आन सुट्टे पैसे द्या

2000 करायचे आता. थांबू नका.

रमेश भिडे
Fri, 05/20/2016 - 11:51 नवीन
2000 करायचे आता. थांबू नका. मिपा चे झेंडे अटकेपार लावा.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा