✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फुलपाखरू

प
पथिक यांनी
Tue, 05/17/2016 - 12:45  ·  लेख
लेख
दिवाळीच्या सुटीत मुर्तीजापुरला (माझं सासर) गेलो होतो. एक दिवस एकटाच गावाबाहेरच्या पुंडलिक बाबांच्या मठाकडे चालत निघालो. गावाबाहेर पडलो तोच मागनं एक अनोळखी आवाज आला, "काका, मी सोबत येऊ का ?" बघितलं तर ८-९ वर्षांचा, मळके कपडे घातलेला, स्वत्तःहि धुळीने माखलेला एक मुलगा होता. त्यालाही त्या मठात जायचं होतं आणि त्या १० मिनिटांच्या वाटेतही त्याला सोबत हवी होती; मग ती माझ्यासारख्या अनोळखी, पस्तिशीतल्या माणसाची का असेना ! वाटेत त्याची सारखी बडबड सुरु होती. नाव देवा. आई मजुरी करते. वडील नाही. भाऊ नाही. शाळेत जातो. त्याने मला वाटेत कितीतरी गोष्टी मी न विचारताच सांगितल्या. कितीतरी प्रश्न विचारले. मग चालता चालता अचानक रस्त्यात पडलेलं एक फुलपाखरू त्याला दिसलं. तो थांबला. ते फुलपाखरू त्याने हळुवारपणे चिमटीत उचललं आणि रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी ठेवून दिलं. आणि म्हणाला - गाडीखाली आलं असतं ना ! मला वाटलं - हा हळवा, गरीब, बोलका मुलगा, ज्याला वडील नाहीत, ज्याची आई मजुरी करते, हा सुद्धा त्या फुलपाखराच सारखाच सुंदर,निष्पाप, पण दुबळा आहे. पण याला मात्र परिस्थितीच्या निर्दयी चाकांखाली येण्यापासून कोणी वाचवील याची शक्यता मात्र फार फार कमी आहे ...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
समाज
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
1557 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

तुम्ही वाचवायचा

कपिलमुनी
Tue, 05/17/2016 - 14:08 नवीन
त्याला तुम्ही वाचवायचा ना !
  • Log in or register to post comments

आमच्या भागातील वातावरण, त्या

पथिक
Tue, 05/17/2016 - 15:06 नवीन
आमच्या भागातील वातावरण, त्या मुलाची आर्थिक सामाजिक परिस्थिती, हे सगळं पाहता तो एक सुशिक्षित, सुसंस्कृत जीवन जगू शकेल असं वाटत नाही असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. तुम्हाला काही वेगळं सांगायचं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा