Skip to main content

आचरट प्रोपोगंडा

Published on गुरुवार, 12/05/2016
९२.७ एफेम वर हल्ली बरेच दिवस एक आचरट प्रोपोगंडा चालू आहे लखनौ ते आग्रा हायवे .....होणार आहे पोलिसांचे आधुनिकीकरण ....होत आहे आणि म्हणून भरपूर नोकर्या ....येणार आहेत ह्या मध्ये तिथले गुन्हे एरवी आवरता येणारच नाहीत अशी स्पष्ट कबुली पर्यटनाची अद्ययावत सुखसोयी ... झालच आहे जवळपास ह्याचे कारण युवा नेतृत्व वगैरे वगैरे .....सगळीकडची भाषा कसलीही ठोस सत्य नं सांगणारी पण वस्तुस्थिती काय कुणास ठौक निलेश मिस्रा ह्यांच्या एरवी अतिशय हळव्या सोप्या आणि तरल कथांमध्ये सुद्धा अलीकडे - अमुक एक नंबर आणि त्यावर online रक्त मिळाले आणि कुणाचासा जीव वाचला - तमुक एक नंबर आणि त्यावर कुणाला स्त्री मुक्ती साठी मदत मिळाली अशा तद्दन प्रचारकी कथा अतिशय दर्जेदार कार्यक्रम देणाऱ्या ह्या रेडियो स्टेशनवर चा हा बदल केवळ व्यथित करणारा आहे त्या निमित्त हे अरण्यरुदन

वाचन संख्या 1978
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

लखनौ-आग्रा एक्ष्प्रेसमार्ग हा भारतातील सर्वात वेगाने बांधला जाणारा मार्ग आहे. याच वर्षी कदाचित पूर्णपण होईल. प्रचंड वेगात बांधला जात आहे. भूमी अधिग्रहणाचे वापरलेले मॉडेल सुद्धा कौतुकाचा विषय ठरले आहे. किमान मी या एक्सप्रेसमार्गासाठी अखलेस चे कौतुक नक्कीच करणार. सविस्तर माहिती हवी असल्यास मी उद्या लिहू शकेन यावर. आता लै रात्र झाली.

९२.७ एफ एम हे अनिल अंबानींचं चॅनेल. ते समाजवादी पक्षाच्या तिकिटावर राज्यसभेत निवडून गेले होते. नंतर त्यांना office for profit च्या वादावरुन राजीनामा द्यावा लागला होता. ही जाहिरात पण अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाबद्दल आहे आणि तेही सपाचे आहेत. संबंध सरळ आहे.