माझी खाद्यशैली योग्य आहे का?
माझे वय पन्नास.अद्याप तरी किडनी, हृदय, रक्तदाब, मधूमेह नाही.
रक्तातील आणि लघवीतील साखरेचे प्रमाण योग्य आहे.हिमोग्लोबिन साधारणपणे १२.० च्या आसपास (प्लस-मायनस १) घोटाळत असते.
दर ६ महिन्यातून एकदा मधूमेहाची तपासणी करतो.बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते.
सध्याची माझी जीवनशैली आणि खाद्यशैली देत आहे.काही कारणांमुळे ती अधुन-मधून बदलत असते.पण डोंबिवलीला आलो की परत नेहमीच्या मार्गावर येते.
उठ्णे ==> झोप पुर्ण झाली की, पण जास्तीत जास्त ७:०० वाजता.कधी-कधी पहाटे ५:००ला पण जाग येते.पण मग न झोपता वाचन करत बसतो किंवा फिरायला जातो किंवा एखादा हलका-फुलका सिनेमा बघत बसतो.
नाश्त्यापुर्वी अर्धा ते पाऊण तास फिरणे.
सकाळचा नाश्ता ===> ८:०० ते ८:१० पर्यंत नाश्ता कारायला बसतो.
नेहमीच्या खाण्यातील नाश्त्यातील पदार्थ ===>
१. थालीतीठ+लोणी*दही+लोणचे
२. इडली+सांभार+चटणी
३. बटाटे-पोहे
४. उपमा
५. मेतकूट+तूप्+भात
६. आमलेट पोळी किंवा आमलेट्+ब्रेड
७. डोसे+सांभार+चटणी
८. उत्तप्पा+सांभार+चटणी.
नाश्ता झाला की वाचनालयात पुस्तक बदलायला जाणे आणि भाजी बाजार.
जेवणाची वेळ आणि खाद्यपदार्थ
जेवणाची वेळ ===> १२:०० ते १२:१५ च्या दरम्यान जेवायला बसतो.
खाद्यपदार्थ =====>
वरण्+भात+तूप+लिंबू जवळपस रोज.
२ भाकर्या , ज्वारीच्या किंवा तांदूळाच्या.कधी-कधी पोळ्या.पण पोळ्या मात्र आठवड्यातून एक ते दोन वेळाच.
एक वाटी कोशिंबीर, काकडी किंवा बीट किंवा कोबी. कोशिंबीर कुठलेही असो, बीट मात्र जेवणात असतेच असते.
१ उकडलेले अंडे. सकाळी आमलेटचा नाश्ता झाला असेल तर अंडे कटाप.
एक ते दोन वाटी पालेभाजी ===> मेथी,पालक,करडई,पातीचा कांदा,चुका,चाकवत,अळू किंवा माठ.
एक वाटी उसळ ===> चवळी,मटकी,वाटाणे,हरभरा.
(कधी-कधी मटकी-तोंडली, वांगी-हरबरे किंवा पडवळ-वाल अशी उसळ+फळभाजी करतो.अशावेळी मग अजून एखादी उसळ किंवा फळभाजी करत नाही.)
एक ते दोन वाटी फळभाजी ===> बटाटा, सुरण, फ्लॉवर, कोबी, ढेमसे, वांगी,दुधी भोपळा, लाल भोपळा (लाल भोपळा महिन्यातून एकदा.लाल भोपळा आणि कोहळा सांभारात जास्त वापरतो.)
एक ग्लास ताक.
जेवण झाले की एखादी खोबर्याची वडी, सोनपापडी किंवा गुळाचा खडा.
दुपारी जेवण झाले की घरात थोडी शत-पावली आणि वाचन.
दुपारी २ ते ३:३० झोप. (ह्याला वामकुक्षी काय म्हणणार्?मस्त झोरत पडलेला असतो.)
४:०० ते ५:०० वाचन
५:०० ते ५:३० नाश्ता. जास्त करून पोहे किंवा उपमा,दुपारची उसळ उरली असेल तर मिसळ-पाव, कधी-कधी सुरळीच्या वड्या, मेदूवडे-सांभार, बटाटे-वडे (वड्यांच्या बरोबर लसूण चटणी हवीच.)
६:०० ते ८:०० फिरणे किंवा कामानिमित्ताने इतरांकडे जाणे.
८:०० ते ८:३० पर्यंत जेवण.
सध्या रात्रीचे जेवण जरा हलकेच घेतो.खिचडी-कढी, आमटी-भात किंवा बटाट्याचे परोठे किंवा पिठले-भाकरी.
महिन्यातून एकदा, घरी केलेली आणि फक्त बटर मध्ये बनवलेली पाव-भाजी. (साधारण १५० ग्रॅम बटर लागते आणि ६-७ जणांना पुरते.)
९:०० ते १०:०० वाचन आणि जास्तीत जास्त १०:३० पर्यंत झोपायला जाणे.
आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.
==========================================
आता माझे प्रश्र्न....
१. मी सकाळ आणि संध्याकाळ शांत वातावरणात फिरण्याशिवाय इतर कुठलाही व्यायाम करत नाही किंवा योगासने पण करत नाही.वजन अद्याप तरी आटोक्यात आहे. उंची १५५ सेमी आणि वजन ६० किलो (अधिक-उणे २ किलो.)
२, सध्या मी दर ६ महिन्यांनी रक्तदाब आणि मधूमेह व हिमोग्लोबिन ह्याची तपासणी एकाच डॉ,कडून आणि एकाच ठिकाणी करून घेतो.
ह्या व्यतिरिक्त अजून काही तपासण्या आवश्यक आहेत का? आणि असल्यास किती महिन्यांनी?
३. जीवनसत्वांची तपासणी करणे आवश्यक आहे का? आणि असल्यास किती महिन्यांनी?
४. स्ट्रेस टेस्ट ऑगस्ट-२०१५ मध्ये करून घेतली होती.ती नॉर्मल आली.आता परत दुसरी टेस्ट करणे आवश्यक आहे का?
५. माझ्या खाण्यात जास्त प्रमाणात तेल किंवा तूप किंवा लोणी आहे का?
६. ६० नंतर माझ्या खाण्यात कुठले पदार्थ कमी करू आणि कुठले वाढवू?
देव=दयेने अद्याप तरी, हृदयाचे किंवा किडनीचे दुखणे नाही.ते पुढेही होऊ नये ही देवाचरणी प्रार्थना आणि मिपावरील डॉ.ना नम्र विनंती, की कृपया मला मार्गदर्शन करावे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
=))
तुमच्या आहारातल्या
जिलबी टाकली आहे का ? ;)
सुखी माणूस :)
खाद्यजीवन
सुखी माणुस...
;)
आठवड्यातून एकदा, जास्त करून
आठवड्यातून एकदा, जास्त करून
सन्माननीय रा रा
कोलेस्टीरॉल तपासून घेत जा
पन्नाशीलाच सेवानिवृत्ती
तुमची खाद्यशैली जाऊदे, ही
सध्या वामकुक्षी कशासोबत खायची
+१
+२
...
हेवा वाटावा अशी जेवणशैली
धन्यवाद...
टच वूड
मासाहार आणि अल्कोहोल वयाबरोबर जितकं कमी तितकं चांगलं
मुवि थापा मारत आहेत असा संशय.
मुवि थापा मारत आहेत असा संशय.
इकडे येताय का?
क्या बात हैं...
ह्या भानगडीत....
सर्व प्रतिसादकांचे आभार....
...
बाहेरच्या देशांत काम करत
अरेच्चा!!!!!!!!!!!!!
पुरावा नाहिसा केला आहे :)
का नष्ट केलास तो पुरावा?
हा तुम्ही संपादकांच्या
मुघल सैन्य झालंय तुझं, जिथे
याला
लोल..
अर्रे ...शेवटीची स्माईलीपण
तु माझ्या दोस्ती कंपुतला
तुम्ही मच्छी खूप कमी खाता असे
मच्छी खावा जास्त.....
कोळंबी,
रिकामे मन , सैतानाचे घर...
झकास!
नवीन बाळ????
नवीन बाळ
जळजळ झाली आहे,
काही बदल
+1
मस्तच!
मुवि, तुमच्या सोलापूरच्या