✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पंचा, बनियन आणि रास्बेरी पाय विकत घ्यायचे आहेत सल्ला द्या.

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Mon, 05/09/2016 - 20:13  ·  लेख
लेख
लेखनविषयः पंचा, बनियन आणि रास्बेरी पाय विकत घ्यायचे आहेत सल्ला द्या. कित्येक लोकांना हे विडंबन वाटेल पण हे विडंबन नसुन वस्तुस्थिती आहे हे कृपया लक्षात घेऊन मौल्यवान मार्गदर्शन करावे. एप्रिल संपला. एप्रिलच्या अगदी पहिल्या दिवशी नाही पण शेवटच्या आठवड्या अ‍ॅप्रायजल आणि गोल सेटिंग नामक शिनेमा दाखवुन कंपनीनी एप्रिल फुल (खरं तर ** बनवलयं, पण संपादकिय धोरणं, असांसदिय शब्दांचा वापर वगैरे कारणाने धागा उडु नये म्हणुन सोयीसाठी आपण मुर्ख असा द्वयाक्षरी शब्द चांदण्यांमधे टाकु) केलं. गोल सेटिंगमधे आत्ताच्या जबाबदार्‍या गुणिले ३० आणि अ‍ॅप्रायजलचा आकडा ०.०००००००१२००००१२००००२३१२% अ‍ॅप्रायजलचा आकडा ऐकुन श्रावणमाशी हर्शमाणषी हिरकळ दाटे चोहिकडे ह्या अजरामर गाण्यावर एचार कमुणिकेशन्स कम पेरोल पेशालिस्ट नामक चिंधीचोर व्यक्तीच्या केबिन नामक तुरुंगामधे नाचायची इच्छा झालेली. ह्या इसमास लाज, लज्जा, शरम इत्यादी गोष्टी अजिबात म्हणजे अजिबात नसल्याने ते कष्ट आवरले. मात्र जाता जाता थँक्यु सर, अता पुढच्या पगारापासुन नवे बनियन विकत घेउ शकिन म्हणुन शाब्दिक थोबाड फोडुन बाहेर पडलो. आता फार अवांतर करत नाही. तर अतिभव्य प-गार वाढ झाल्याने यंदा बन्यन, पंचे, लेंग्याच्या नाड्या आणि रास्बेरी पाय घ्यायचा विचार आहे. माझ्या अपेक्षा वगैरे मी सांगतोचं पण मिपाकरांनी आपला काही मिलियन तासांचा अनुभव इथे सांगुन एक नमुना निवडायला मदत करावी अशी विनंती. तर आता हे प्रश्ण पंचापासुन सोडवायला सुरुवात करु (प्रश्ण सोडवायचा आहे पंचा नव्हे). पंचा रंगीबेरंगी पाहिजे आणि त्यातला मुख्य रंग लाल हवा. शक्यतो गोळ्या-गोळ्यांचं डिझाईन असणारा पंचा/ टॉवेल वगैरे मिळाला तर उत्तम. टॉवेल/ पंचा जो काय असेल तो वर्साटाईल असावा अशी एक माफक अपेक्षा आहे. एकंदर उन्हाळी परिस्थिती लक्षात घेता "चला हवा येउ द्या" लुंगी म्हणुन वापरता यायला हवा. झालचं तर अम्हाला उंचं उंचं पर्वतांवर ट्रेकिंग करायची लैचं हौस असल्याने वं कित्येक वेळा ह्या उंच कड्यावरुन उडी मारुन पॅराग्लायडींग करत करत खाली उतरता आलं तर काय बहार येईल वगैरे विचार डोक्यामधे येतं असल्याने पॅराशुट किंवा अनफ्रेम ग्लायडर म्हणुन वापरता येणारा पंचा उत्तम. टर्किश टॉवेल नकोत. नाजुक असतात ते. बर्‍याचं मिपाकरांनी वैयक्तिक व्यनिंमधुन, कायप्पावरुन गेंड्याची कातडी वगैरे गौरवास्पद उद्गार काढलेले असल्याने गेंड्याची डेड स्किन निघुन जायचं जे काय मटेरिअल असेल ते मिळालं तर अतिउत्तम. काही मिपाकरांना अश्या मटेरिअलचे पंचे वापरायची सवय आहेचं त्यांनी आपलं मत नक्की सांगावं. आता बनियनला हात घालु. बनियन म्हणजे बनियनचं हवा आहे. बंडी, उन्हाळी पातळ सदरे वगैरे नको आहेत. बनियनविषयीच्या अमच्या अपेक्षा फार म्हणजे फारचं माफक आहेत. बनियनचं कापड सफेदचं हवं. उगीचं हिरवे-पिवळे, पोपटी, सप्तरंगी रंगाचे वगैरे अजिबात नको. बनियन विकत घेताना जाळीदार नको. सदर बनियन अंगावर घालायचा असुन मासे पकडायला वापरायची इच्छा नाही. बनियन घालुन रस्त्यावर मारामार्‍या करताना किमान ४ आणि कमाल कितीही सुंदर्‍या येउन चिकटायला हव्या असा बनियन सुचवणार्‍याला अर्धा रुमाल (नाक नं शिंकरलेला, फक्तं हात आणि चेहेरा पुसण्यासाठी वापरलेला) बक्षिस देण्यात येईल. बनियन हाप शर्टाच्या बाहिमधुन बाहेर यायला नको वगैरे अपेक्षा पुर्ण झाल्यास कोळश्याहुन काळं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रास्बेरी पाय नामक तळहात संगणक विकत घेणे आहेत. ह्याच्या कैक वर्जन्स असल्याने आणि लिनक्षीचा वापर करायची "अभिनव" अक्कल अमच्याकडे नसल्याने कंचा घ्यावा हा प्रश्ण आहे. शक्यतो टॉप स्पीड आणि र्‍याम १ जीबी वालं पाय ३ नामक इ-फळकुट विकत घ्यायचा विचार आहे. आधी एका मिपाकर मित्राकडुन निराधारको उधार बेसिस वर आणुन प्रोग्रामिंग शिकायला सुरुवात करायचा विचार आहे. तर सल्ला द्या ब्रे. GTIO/ COM port साठी काही ब्रेडबोर्ड्स, जंपरतारा, रिले वगैरेही सुचवावेत. तर धागा उडायच्या आत सल्ले द्या ब्रे. कळावे. आ.न. कॅ.जॅ.स्पॅ.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17088 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

सत्कार

पैसा
Sat, 05/14/2016 - 20:28 नवीन
शंभरीनिमित्त चिमणरावाचा सत्कार एक दणकट पंचा, जाळीचा पिवळ्या रंगाचा बनियन आणि स्ट्रॉबेरी क्रीम देऊन करण्यात येत आहे. रास्पबेरी पाय देत नाही कारण पाय त्यानेच बेक केला पाहिजे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा