हत्यार( कथा)
लेखनविषय (Tags)
अभिमन्यू राजाचा दरबार भरलेला आहे.शेजारच्या आदित्यराज्यासोबत होणारया संभाव्य युदधाची छाया सगळया दरबारावर पडली आहे..
राजा अभिमन्यू - सेनापती आपली योजना जाहिर करण्याची वेळ आली आहे. वेळ न दडवता त्या योजनेची माहिती दरबारास दया
सेनापती - राजाधिराज अभिमन्यूंच्या योजनेप्रमाणे आपण लहान असुनही मोठ्या पल्लांच्या तोफा तयार करण्याची महत्वकांशी योजना हाती घेतली होती. अरबी धातुतज्ञ्ांच्या मदतीने कैक सालांपासुन यावर गुप्त पद्धतीने काम चालू होते. या तोफा आता वापरण्यासाठी तयार आहेत. केवळ दोन माणसे एक तोफ वाहून नेऊन , वापरुही शकतात..
प्रधान - केवळ दोन माणसे ? असंभवही अरबी कारागिरांनी करुन दाखवले म्हणायाचे ! आदित्यराज्याच्या विनाशाची सुरवात झाली आहे.
सेनापती - त्यासाठीच आजचा दरबार भरलेला आहे
आपले राजज्योतिषी जी शुभ तिथी सांगतील त्या दिवसापासुन संपूर्ण भारतवर्षात आपल्या शौर्याची चर्चा होणे अटळ आहे. .ज्योतिषी ती तिथी एकण्यासाठी संपुर्ण दरबार उत्सूक झाला आहे
राजज्योतिषी - सेनापती माफी असावी. येणारया दोन सप्ताहापर्यंत कोणतीही शुभ तिथी नाही. आपणास थांबणे भाग आहे
( संपुर्ण दरबारात स्मशानशांतता पसरते..)
राजाअभिमन्यू - युदधाची व्यूहरचना लवकरच ठरवली जाईल. त्या अगोदर संपुर्ण राज्याचा दौरा करणे मला आवश्यक वाटते. शत्र्ुराष्ट्र्ाआधी आपल्या राज्याचा सद्यस्थितीचा अंदाज घेणे हा युद्धनितीचा मी प्रथम पाठ मानतो. यासाठी मी स्वताः सेनापतींसोबत वेष बदलून राज्यात फिरणार आहे. प्रत्येक दरबारीने हा दौरा करणे आवश्यक आहे. या सप्ताहाच्या अखेरीस दौरयातील अनुभवानुसार आपली मते दरबारात मांडावी..हा दरबार इथे बरखास्त होत आहे..
( तीन दिवसांपासुन रात्र्ीच्या वेळी अभिमन्यु आणि सेनापती वेषांतर करुन गावात फिरत आहेत. आज मात्र ते एका झोपडी समोर थबकतात. आतुन एका तरूण मुलाचा मोठ्याने रडणारा आवाज येत असतो )
अभिमन्यू - कोण आहे आत ? बाहेर या.
(रडुनरडून डोळे सुजवून घेतलेला एक तरूण बाहेर येतो. )
बाळा काय झाले ? का रडतो आहेस ?
तरूण - त्या अभिमन्यूला काय हाय का अक्कल ! ते बेन बगाव तवा युदधाचीच भाषा करतयं .. माजा बा राऊत हाय नव्ह त्याच्या सैन्यात ..त्यामुळ मला कळाल की आता लवकरच युद्ध करनार ह्यो
सेनापती - ( रागाने )झोपडीत राहणारा पोरका तू ! तुला काय कळणार आहे रे युदधातल! तुजा बाप सैन्यात आहे याचा तुला अभिमान पाहिजे. अरे युद्धात जीव दयायला नशीब लागत !
( तो पोरगा जोरजोरात हसु लागतो )
तरूण - तुम्ही अगदी त्या सेनापतीवानी बोलता बगा ! अहो युद्ध हाईच कुठ ? आपण ते सुरू करायच आणि आपण आपली माणसं हकनाक मारायची.? इथ खायला अन्न नाई आणि लडाईला कुठन आनाव बळ ? त्या राजान चार चांगली काम केली तर लोक दुवा देतील . आनि त्या आदित्यराज्याबरोबर हयानच शांतता करार केला होता..आता त्या अरबांनी कान फुंकले त्याचे आनि निघाला युद्ध करायला ! ते अरबी तर लय भारी. इथ आपला माल खपवला आता आज आदित्यराज्यात बी गेल्ते !
सेनापती - काय सांगतोस ? खरे आहे हे ?
( अभिमन्यू राजा अजुनही काहीशा विचारात आहे. ते त्या मुलाला निरखतो आणि क्षण्ात सगळे प्रश्न सूटतात )
राजा - शांतता करार झाल्याचे तुला कसे ठाऊक ? हा करार पुर्ण गुप्तपद्धतीत झाला होता..( सेनापतीकडे बघत ) सेनापती झाला उलघडा ? अहो हा मुलगा कोणी साधासुधा नाहि. हे आदित्यराज्यचे युवराज आहेत. आपले युदधापासुन मन वळवण्यासाठी त्यांनी ही खेळी खेळली ! पण त्या कराराच्या उल्लेखातुन मी याला अोळखले.
( सेनापती अजुन धक्यात आहेत..स्वताला सावरत ) महाराज पण हे युवराज खरे बोलत आहे कशावरून ? अरब त्यांना सामिल आहेत याचा काय पुरावा ?
( तो तरूण आतून काहि दस्तएवज आणतो. ते आदित्यराज्याचे अरबांच्या तोफांचे खरेदीपत्र असते. सेनापतींचा आता विश्वास बसु लागतो. युद्ध जरी झाले तरी त्याची परिणीती विनाशात होणार ह आता उमगलेले असते )
सेनापती - महाराज आत काय करायचे ?
अभिमन्यू - आधी त्या राजज्योतिषाला पकडा. त्याने मुद्दामुन तिथीच्या नावाखाली २ आठवडे युद्ध पुढे ढकलले. यामुळे अरबांना या तोफा गेल्या तीन दिवसात आदित्यराज्यात नेऊन विकता आल्या.
सेनापती - ( आश्चर्याने )जशी आज्ञ्ा ..
अभिमन्यू - आणि या युवराजांच्या सुरक्षततेचि जबाबदारी तुमची. स्वताःचा जीव धोक्यात घालवून ते आले आहेत. जरी आपण त्यांना पकडले तरी त्याचे कौतुक व्हायला हवे. जर त्यांनी ह्या भेटीचे नियोजन केले नसते तर कित्येकांच्या हत्येचे पातक आपल्या माथी लागले असते.आपले हत्यार जरी तोफा होत्या तरी यांची बुद्धी हेच आदित्यराज्याचे हत्यार आहे.
( समाप्त)
प्रतिक्रिया
राज ज्योतिषी ह्यांनी तिथी
कथा फार आवडली.
शैली चांगली आहे. बाकी कथाबीज
पन..
भारी आहे! पण संवादी नको होती!
येग्झॅटली!
हम्म
मस्त कथा...