सैराट...
लेखनविषय (Tags)
चित्रपट बघणं हा आमचा सगळ्यात आवडता उद्योग त्यामुळे असे फार कमी चित्रपट असतात जे आमच्या तावडीतुन सुटतात. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात तो पाहिला नाही असं फार कमी होतं. दुर्दैवांन हा योग सैराटच्या बाबतिही जुळुन आला. सैराट्बद्दल बर्याच जनांकडुन ऐकत होतो. वाचत होतो. 'सैराट' नाव फारच कॅची होतं त्यामुळे उत्सुकता होतीच पण अजुन एक कारण होतं ते म्हणजे नागराज मंजुळे. फँड्री पाहील्यानंतर या माणसाकडुन अपेक्षा वाढल्या.पहिल्याच बॉलवर सेहवागने जर छक्का मारला तर आपोआपच त्याच्या पुढच्या खेळीविषयी एक वेगळीच अपेक्षा निर्माण होते तसचं काहीसं नागराजच्या बाबतित झालं. फँड्रीनं एक वलय केलं त्याच्याभोवती, त्याच्या क्षमतेचं, त्याच्या कामाचं, त्याच्या कॅलीबरचं. त्याची एक विशिष्ट काल्पनीक आक्रुतीअ घेउन आपण चित्रपटग्रुहात जातो. त्याचबरोबर झी सारख्या मराठीतल्या बड्या प्रॉडक्शन हाउसकडुन जाहीरातींद्वारे ज्या पद्धतीनं एक माहौल तयार केला गेला त्याचा एक प्रभाव मात्र आपल्यावर ताबा घेतो. या सगळ्या गोष्टी मनात घेउन आपण चित्रपट बघायला सुरुवात करतो.
परश्याच्या एन्ट्रीच्या सीनपासुन एक गोष्ट मनापासुन जाणवतं राहते ति म्हणजे फँड्रीमुळे वाढलेल्या अपेक्षांवर सैराट खरा उतरत नाही. ज्या नागराजच्या खास पद्धतीतला फँड्री मनाला भिडतो ती जादु इथे जाणवत नाही. कुठेतरी आपला अपेक्षाभंग होतो. जसाजसा चित्रपट पुढे सरकतो तसं हे अजुन प्रकर्षानं जाणवतं राहतं. चित्रपटातले काही प्रसंग अजुन खुलवता आले असते असं वाटतं. म्हणजे जेव्हा मास्तरानं ' झोपलायसं ना मग दे सोडून' नंतरचा कट्ट्यावरचा परश्या आणि सल्याचा प्रसंग अजुन खुलवता आला असता. ज्या वेगानं कथा पहिल्या भागात उलगडत जाते त्याच वेगानं ती दुसर्या भागात संथ होते. दिग्दर्शक हाच पटकथाकार असल्याचा फायद इथं व्हायला हवा होता पण तो तसा होताना दिसतं नाही. परिणामी पहिला भाग जेवढा उत्सुकता पकडुन ठेवतो तेवढाचं दुसर्या भागात कंटाळा येतो. उत्तरार्धात प्रसंग अजुन खुलवता आले असते हे सारखं जाणवतं.
कथा-पटकथा,अभिनय्,संगीत आणि दिग्दर्शन अशा चार गोष्टिंवर चित्रपट बेतलेला असतो. सैराटची कथा बर्याच प्रमाणात २००४ चा तेलुगु ब्लॉकब्लस्टर प्रेमीस्ते सारखी वाटते. कथेचा गाभा दोन्हिकडे सारखाचं. मात्र प्रेमिस्ते बघताना जी जादु जाणवते ति इथे तेवढ्या प्रमाणात जाणवतं नाही. दोन्हिकडे कथेत गाभा जरी सारखा असला तरी शेवट मात्र भिन्न आहेत. प्रेमीस्ते मध्ये नायक हा मानसिकद्रुष्ट्या आजारी पडतो आणि नायिका त्याला सांभळते. इथे मात्र नागराज शेवट हा अनपेक्षीत करतो. त्यामुळे चित्रपटग्रुहातुन बाहेर पड्ताना तो प्रसंग तसाच मनात साचुन राहतो. इथे दिग्दर्शक आपला प्रभाव टाकण्यात यशस्वी झालाय. कॅमेर्याचे काही अँगल्स तर अप्रतीम. विशेषतः जो सीन टीझरमध्येही वापरला होता तो विहीरीवरचा 'सैराट झालं जी' गाण्यात येणारा शॉट मनाला स्पर्श करुन जातो.
अभिनयाच्या बाबतीत परश्यापेक्षा आर्चिच जास्त उठुन दिसते. तिच्या बोलण्याची ढब बुलेटच्या सीन मधे दिसनारा तिचा अंदाज सहज वाटतो. सल्या आणि प्रदीप दोघही काही ठिकाणी भाव खाउन जातात. उत्तरार्धात नायिकेला वाचवणारी ति बाइसुद्धा स्वतःची दखल घ्यायला भाग पाडते. अगदी थोड का असेना पण नागराजचा अभिनय सुद्धा सुंदर झालाय.
संगीताच्या बाबतित अजय-अतुल च्या चाली मनात गुंजत राहतात यातच सगळ काही आलं. कथेच्या योग्य ठिकाणी गाणी आल्यानं त्यांची मजा अजुन वाढते.
चित्रपट संपल्यानंतर मनात फँड्रीमधुन जे काहुर माजवण्यात नागराज यशस्वी झालाय ते यश इथे जाणवत नाही. एक चांगली कथा एक चांगला चित्रपट होता होता राहीली अस राहुन राहुन वाटत राहतं. झी सारखं मातब्बर प्रॉडक्शन हाउसकडुन, निखिल साने आणि नितीन केणी या द्वायींनी आपला अनुभव पणाला लावून ज्या पद्धतीनं मार्केटिंग केलं त्याचा फायदा त्यांना होताना दिसतोय.
एकंदर हा चित्रपट वन टाइम वंडर ठरतो. सगळ्यात महत्वाचं नागराजची जी प्रतीमा आपल्या मनात असते त्याला मात्र छेद जातो हे नक्की.
प्रतिक्रिया
व्वा !
मस्त
तुम्हाला
थेटराच्या बाहेर फिरत असतेत
जगप्रसिद्ध
हो हो. तीच ती जगप्रसिद्ध
बर्याच दिवसांनी निलायम थिएटरबाहेर काळाबाजार पहायला मिळाला.
नीलायमला जाणं होईल का सांगता
नो नाय नेव्हर
बालेकिल्ल्यावर थेट नेम धरुन
=))
प्रभु देवा अवांताराबद्दल एक डाव माफ़ी असू द्या.
=))
प्रचेतस भाउ....
या आधी अजूनही बऱ्याच ठिकाणी
युटुबवर पूर्ण चित्रपट आहे? ही
मी 'प्रेमिस्ते' बद्दल लिहिले
ओह, जरा कन्फुझन झालं. सोरे.
व्वा !
अहो त्यांनी प्रेमिस्तेची
असंय का ?
:)
@पूर्वाविवेक
तेलगु तुम्हाला कळले नसेल
धन्यवाद महाराष्ट्राचे आणि
मराठी प्रेक्षक मराठी
चित्रपटाच्या श्रेयनामावलीत
=)) तुम्ही चित्रपट पाहिला
25 कोटि म्हणजे हयात साध्या
४०० थेटरचे मिळून. जेव्हा कमाई
जाऊ द्या हो. कधी नाही ते
शेवट खासच.
@प्रसाद१९८२, धन्यवाद. लगे हाथ