पाणी-प (गद्यविडंबन)
लेखनविषय (Tags)
(काही दिवसांपूर्वी मी सुभाष अवचटांचं "खिडकी" या नावाचं पुस्तक वाचलं. त्यातिल काही कथा मला आवडल्या. पैकी 'बर्फ-ब' या कथेचे हे विडंबन.)
हे पाणी आहे:
हजारो मैल पसरलेलं.
या प्रचंड पाण्यातून वाट काढत माझी कार धवतेय.
या पाण्यातच जन्मलो; पाण्यातच मरणार.
मेल्यावर देहाचं पाणी होणार.
तोवर मी हा असा; पाण्याने भरलेला.
थोडंसं काहीतरी खरचटलं:
थेंबभर लाल पाणी हातावर उमटलं:
रुमालाने पुसलं:
रुमाल खिशात ठेवला.
खिशातून लाल पाण्याचा समुद्र फवा-याने बाहेर पडला.
मी आणखी चिंब झालो.
घर आलं:
कार थांबवली:
दार खोललं.
कारमधील पाणी खाली ओसंडलं:
मी ही पाण्यासोबतच जमिनीवर आदळलो.
सावरून उठलो:
पॅंट झाड़ली.
पॅंटवरचे पाण्याचे थेंब उडून बाजूच्या पाण्यात मिसळले.
मी खूश होवून शिट्टी मारली:
तोंडातून पाण्याचा फवारा बाहेर पडला:
मी बावरलो.
पाणी तुडवीत चालू लागलो.
दरवाजा उघडला:
पाण्याचा मोठा लोट मला भिजवित बाहेर पडला.
मी अचल: गोठलेला:
खिशातला लायटर पेटवून बर्फ वितळवलं.
पण......पाणी फार गरम झालं: उकळलं.
फ्रिज उघडून आत बसलो: गोठून.
बर्फ फोडून बाहेर पडलो.
किचनच्या दारात गीता उभी होती:
गोठलेली:
मी हातोडीने बर्फ फोडला.
तिच्याकडे झेपावलो:
ती वितळून, फरशीवरून वाहत घराबाहेर पडू लागली.
एका भांड्यात तिला जमा केलं:
भिंतीवरल्या फ्रेमवर फेकून दिलं.
फ्रेममध्ये तिची पाणावलेली आकृती उमटली.
मी स्वतःशिच हसलो.
वॉशबेसिनकडे तोंड धुवायला गेलो:
वॉशबेसिनच्या कडेवर बसलेल्या संजूने एकदम पाण्यात उडी मारली.
मी चपळाईने त्याची तंगड़ी धरून त्याला दुस-या फ्रेममध्ये थापलं:
त्याचीही छबी उमटली.
मी हसतच सिगरेट पेटवली.
एक झुरका मारला:
तोंडातून धूर सोडला:
पांढरट पाण्याची वर्तुळे आकाशात भिरकावली गेली.
समाधानाने गीता आणि संजूच्या छब्यांकडे पाहिलं:
त्यांच्या स्मितातून पाणी ओसंडत होतं.
मी बादली लावली:
दूसरी.....तिसरी.....
पिंपे भरली....
तरीही पाणी ओसंडतयंच.
हळूहळू रूम पाण्याने भरतेय.
मी गुदमरतोय:
पाणी ओसंडतयंच.
प्रतिक्रिया
असा सगळा प्रकार झाला तर
ओ आय सी
समाधानाने गीता आणि संजूच्या
व्हाय नॉट! FB वर शोधा आणि संपर्क करा!
अरे वा!! भन्नाटच !!!
खिड़की (१९८९)- सुभाष अवचट, प्रकाशक-सुरेश एजन्सी
गीता आणि संजू?
संजय चोप्रा आणि गीता चोप्रा यांचा संदर्भ आहे का हा?
संजय चोप्रा आणि गीता चोप्रा
द्या पाठवून .