या धागा लेखाचे नाव भविष्यात, वारसदारांकडून कर्ज परतफेडीच्या समस्या असे काही ठेवावे का या विचारात आहे, वारसदारांकडून कर्जपरत फेडी सोबत; दिवाळखोरी जाहीर करण्याच्या अधिकृत पद्धतीची चर्चा सुद्धा तुर्तास याच घाग्यात करुयात.
कुणा नवागताने खालील एक समस्या मराठी विकिपीडियाच्या मदतकेंद्रावर मांडली आहे. मराठी विकिपीडियाशी संबंधीत नसलेल्या समस्या विषयक चर्चा मराठी विकिपीडियाच्या कक्षेत येत नाहीत समस्या मिपावर चर्चा करण्यासाठी अधिक सोईची वाटली म्हणून चर्चेस घेण्याचा विचार केला.
माझ्या वडीलांचे १९८८ पासून ट्रक साठी घेतलेले बँकेचे जुने कर्ज थकबाकी आहे. वडील आता मयत झाले असुन माझी कर्ज फेडण्याची क्षमता नाही मग मी काय करावे? संदर्भइंटरनेटवर अद्यापही मार्गदर्शक वकील मंडळींची आणि पुरेशा विश्वासार्ह माहितीची कमतरता आहे तेव्हा मार्गदर्शन हवे असणार्यांनी वकीलांना/ तज्ञांना भेटून मार्गदर्शन घेतले पाहीजे, पण माझ्या सहित बहुतेकांना अशा समस्यांचे विषय नवखे असतात. संभाव्य तोडगे काय असू शकतात हे नेमकेपणाने सांगणे कठीण असले तरी माहितीची अल्पप्रमाणात का होईना देवाण घेवाण होते. हा विषय मला स्वतःसही आणि चर्चेत सहभागी इतरांनाही नेमकेपणाने ठाऊक नसण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) नमुद/लागू करत आहे. माझ्या अंदाजानुसार काही किमान स्वरुपाची माहिती असावी १) कर्ज थकीत आहे म्हणुन व्यक्तींकडून गुलामी, वेठबिगारी किंवा कर्जबाजारी व्यक्तींची खरेदी विक्री करता येत नाही, शिवाय व्यवसाय स्वातंत्र्य हा मुलभूत अधिकार आहे. ह्या संबंधाने किमान मानवाधिकारांची माहिती खासकरुन ग्रामीण, आदीवासी आणि गरीबांना असावयास हवी २) प्रायव्हेट लिमिटेड/लिमिटेड कंपनी असेल तर कंपनीचा तोटा नुकसानामुळे व्यक्तीगत मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता कमी असते. अर्थात भागीदारी अथवा व्यक्तिगत प्रोप्रायटरी व्यवसाय करणार्यांना याचा फायदा होत नाही त्यांच्या तारण आणि व्यक्तिगत मालमत्तातून देणी भागवावी लागू शकतात ३) मयत (मृत) व्यक्तीच्या नावाने कर्जाचा दावा आला तर वारसदारांनी ३.१) मृत व्यक्तिच्या नावाने असलेले कर्ज -तो जर गॅरंटर/हमीदार नसेल तर- वारसदाराच्या व्यक्तिगत उत्पन्नातून/ त्याच्या स्वतःच्या व्यक्तिगत कमाईवर घेतलेल्या मालमत्तेतून वळते करता येत नसावे (चुभूदेघे) समजा उपरोक्त मुलगा कुठे नौकरी करतो आहे आणि त्याने स्व कमाईतून प्रॉपर्टी घेतली आहे अथवा वडीलांनी सुद्धा गिफ्ट म्हणुन दिलेली प्रॉपर्टी आहे तर तांत्रिक दृष्ट्या अशा उत्पन्न अथवा प्रॉपर्टीवर टाच येणे कठीण असावे, किंवा मयत व्यक्तीची जोडीदार पत्नी अथवा पती यांची व्यक्तिगत नावावरची मालमत्ता सुद्धा स्वतंत्र असावी त्यातून कर्जाची रक्कम परस्पर वळती करणे शक्य नसावे. ३.२) मृत व्यक्तीची त्याच्या वाट्यास आलेली अथवा मृत व्यक्तीच्या कमाईतून झालेली मालमत्तेतून मात्र वारसदारांना देणी भागवावी लागू शकतात, देणि देऊन उरलेली मालमत्ताच केवळ वारसदारांना घेता येत असावी. (हिंदू एकत्रकुटूंब पद्धतीतील (मयत झालेल्या) कर्त्याने केलेल्या कर्जाबाबत काय होते यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा -इथे केवळ कायदे विषयक बाजूवर चर्चा करावी- अस्मीतांच्या विषयावर अवांतर नको) ३.३) मृतव्यक्तिच्या मालमत्तेतून देणी भागवण्यापुर्वी कर्ज खरोखर अस्तीत्वात आहे का याची खात्री करण्याच्या दृष्टीने सविस्तर कागदपत्रे मागून घेऊन अभ्यासून कर्जाऊ देणे खरोखर अस्तीत्वात आहे याची खात्री करावी. ३.४) मृतव्यक्तिच्या मालमत्तेतून देणी भागवण्यापुर्वी कर्ज झालेल्या व्यवसायात अजून कुणि भागीदार नव्हता याची खात्री करावी तसा भागीदार असल्यास मृतव्यक्तीच्या नावाने खरोखरच किति देणे होते याची स्वतंत्र वकीलांकडून स्वतंत्र खात्री करुन घ्यावी. ३.५) मृतव्यक्तिच्या मालमत्तेतून देणी भागवण्यापुर्वी वारसदारांनी आपण खरोखरच वारसदार आहोत आणि मृताची मालमत्ता मृत्यूपत्राने किंवा इतर कारणाने इतर कुणाच्या नावाने होणार नाही याची खात्री करुन घ्यावी. ३.६) मयत नातेवाईकाचे कर्जाबद्दल त्याची राहती जागा अथवा उत्पन्नाचा मुख्यस्रोत गहाण असून त्यावर टाच येत असेल व राहणे आणि उदर निर्वाहावर बाधीत होत असेल तर मयताच्या वारसदारांनी खडबडून जागे होऊन आर्थीकबाजूची गणिते खडबडून जागे होऊन समजून घेण्याची गरज असू शकते. मुख्य म्हणजे अनावश्यक घरगुती खर्चांवर कठोरपणे कात्री लावणे आणि खेळत्या भांडवलाचे कठोर व्यवस्थापन महत्वाचे ठरु शकते. ३.७.१) मयताचे कर्ज व्यावसायिक असेल आणि व्यवसाय पुढे चालू ठेवायचा असल्यास कोणते पर्याय उपलब्ध आहेत कर्जाची पुर्नरचना करण्याची विनंती करता येऊ शकते पण त्या कर्जाची मग कदाचित जबाबदारीही स्विकारावी लागेल आणि मग तसे असेल तर चालू व्यवसायावरील कर्ज खरेच फिटले जाणे शक्य आहे का ? व्यवसाय सांभाळण्यात साहाय्य करणारी मुख्य कारभारी (मुख्यत्वे उत्पादन, अकाऊंट आणि विक्री ) मंडळींची वेव्हलेंथ किती जमते आहे ते सहकार्यपुर्ण आणि विश्वासार्ह आहेत का? या मंडळीत नाते संबंध आहेत का आणि त्या नाते संबंधाचे मयताच्या मृत्यूत्तर रोल कसा राहण्याची शक्यता आहे ? ३.७.२) या बाबत त्या व्यवसाय क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिक, आणि केवळ व्यावसायिकांच्या सल्ल्यावरही अवलंबून राहू नये, चार्टर्ड अकांउंटंटचा सल्ला, मार्केटींगंच्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिंचा सल्ला, वकीलाचा सल्ला, कर्जदात्यांचे सहकार्य असे विवीध ठिकाणचे सल्ले घेऊन विचार पुर्वक निर्णय घ्यावेत, यातील केवळ कोणत्याही एकाच सल्लागारावर अवलंबून राहू नये ३.८.१) मयताचे कर्ज व्यावसायिक असेल आणि व्यवसाय पुढे चालू ठेवायचा नसल्यास सुद्धा वरील व्यक्तींचा सल्ला तर लागेल पण कर्जदाते कर्जखाते बंद करण्यासाठी किती रकमेची आणि परतफेडीच्या कोणत्या पद्धतीची अपेक्षा करतात. ३.८.२) -तुम्ही व्यवसाय पुढे चालू ठेवण्याचा आणि कर्ज स्व नावावर घेण्याचा जाणीवपुर्वक निर्णय घेतला नसेल तर- सरते शेवटी काहीही झालेतरीही वारसदार म्हणून मयताच्या नावे असलेल्या मालमत्ते पेक्षा कर्ज+व्याज जबाबदारी अधिक असली तरी त्याची अधिकतम परतफेड मयताच्या नावे असलेल्या मालमत्ते एवढीच असू शकेल त्या पेक्षा अधिक नव्हे पण ही प्रक्रीया विश्वासार्हपणे कशी पुर्ण करुन घ्यावी ह्याची जाणकारांकडून माहिती हवी आहे. खालील एका प्रतिसादात "वारस फक्त मालमत्ता वगैरेंचे असतात. कर्जाचे नाही!" अशीही काँमेट आलेली आहे याचाही अधिक उहापोह जाणकारांकडून करुन हवा आहे. मुख्य म्हणजे ज्यांना महत्वपुर्ण निर्णय घ्यायचे आहेत त्यांनी त्याक्षेत्रातील विश्वासार्ह तज्ञांचा सल्ला घ्यावा. आंतरजालीय चर्चा उपयूक्त असल्यातरी त्यांना मर्यादाही आहेत. उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) नमुद/लागू करत आहे. * दिवाळखोरी जाहीर करण्याचा मयतांच्या वारसदारांशी सरळ संबंध नसावा पण मयताने आधीच दिवाळखोरी जाहीर केली असेल तर उपरोक्त चर्चा विषयावर काय परिणाम होऊ शकतात याची एक माहिती हवी आहे. शिवाय दिवाळखोरी जाहीर करण्याच्या अधिकृत पद्धतीची सुद्धा या धाग्यातून अथवा स्वतंत्र धाग्यातून माहिती हवी आहे. चर्चा सहभागासाठी आभार.
वर्गीकरण
वाचन संख्या
7382
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरोखर माहिती पाहिजे आहे
काही शंका
In reply to खरोखर माहिती पाहिजे आहे by पैसा
भागीदाराची जबाबदारी आधी
In reply to काही शंका by माहितगार
वारस फक्त मालमत्ता वगैरेंचे
वारस फक्त मालमत्ता वगैरेंचे
In reply to वारस फक्त मालमत्ता वगैरेंचे by एस
प्रत्येक कायदेशीररीत्या सज्ञान व्यक्ती ही केलेल्या व्यवहाराला
त्याची वैयक्तिक मालमत्ता
In reply to प्रत्येक कायदेशीररीत्या सज्ञान व्यक्ती ही केलेल्या व्यवहाराला by बोका-ए-आझम
माझ्या माहितीनुसार
In reply to त्याची वैयक्तिक मालमत्ता by माहितगार
एक शंका
१९८८ साले घेतलेले कर्ज थकित
In reply to एक शंका by पैसा
बहुतांश करारांमध्ये दोन
असते
In reply to बहुतांश करारांमध्ये दोन by नितिन थत्ते
पण त्यासाठी वारसदारांची संमती लागते
In reply to बहुतांश करारांमध्ये दोन by नितिन थत्ते
परिच्छेद पुर्ण वाचता येतील
In reply to बहुतांश करारांमध्ये दोन by नितिन थत्ते
कर्ज घेतले तेंव्हा ज्या
'' कर्जदाराला सोडूनही
In reply to कर्ज घेतले तेंव्हा ज्या by देशपांडे विनायक
' असे का होत असावे ?''
In reply to '' कर्जदाराला सोडूनही by माहितगार
' असे का होत असावे ?''
In reply to '' कर्जदाराला सोडूनही by माहितगार
असाच अनुभव माझ्या वडिलाना आला
In reply to कर्ज घेतले तेंव्हा ज्या by देशपांडे विनायक
दुर्दैवी आहे
In reply to असाच अनुभव माझ्या वडिलाना आला by विजुभाऊ
कर्जदाराकडून अथवा त्याच्या
In reply to दुर्दैवी आहे by पैसा
५० रुपये देऊन मदत करावी पण ५
नॅशनलाईझ बॅक असेल तर