Skip to main content

कर्ज व्यवस्थापन

मयत नातेवाईकाच्या कर्जफेडीची समस्या कशी सोडवावी ?

लेखक माहितगार यांनी बुधवार, 13/04/2016 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
या धागा लेखाचे नाव भविष्यात, वारसदारांकडून कर्ज परतफेडीच्या समस्या असे काही ठेवावे का या विचारात आहे, वारसदारांकडून कर्जपरत फेडी सोबत; दिवाळखोरी जाहीर करण्याच्या अधिकृत पद्धतीची चर्चा सुद्धा तुर्तास याच घाग्यात करुयात. कुणा नवागताने खालील एक समस्या मराठी विकिपीडियाच्या मदतकेंद्रावर मांडली आहे. मराठी विकिपीडियाशी संबंधीत नसलेल्या समस्या विषयक चर्चा मराठी विकिपीडियाच्या कक्षेत येत नाहीत समस्या मिपावर चर्चा करण्यासाठी अधिक सोईची वाटली म्हणून चर्चेस घेण्याचा विचार केला.
माझ्या वडीलांचे १९८८ पासून ट्रक साठी घेतलेले बँकेचे जुने कर्ज थकबाकी आहे.