✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कॉम्प्युटर/ व्हिडीओ गेम्स.....भाग १ (मारीयो)

उ
उगा काहितरीच यांनी
गुरुवार, 04/07/2016 - 13:08  ·  लेख
लेख
१९९० च्या दशकात जन्म झालेल्या लोकांना मी नशीबवान समजतो. कारण या अगोदरच्या पिढीतल्या लोकांना मोबाईल, काँप्युटर थोडेसे उशीरा मिळाले. त्यामुळे ते लोक मोबाईल, संगणक( हाच शब्द सोपा आहे टाईप करायला ;) ) वगैरे वापरायला तितकेसे उत्साही नसतात. २००० नंतरच्या पिढीला जन्मापासुनच मोबाईल वगैरे वापरायला मिळतो त्यामुळे इतर मैदानी खेळाला वगैरे ही पिढी तितकीसी उत्साही नसते. पण ही जी ९० च्या दशकातली पिढी आहे ना त्यांनी शिवणा-पाणी , विष-अम्रुत, लपंडाव हे ज्या उत्साहाने खेळले त्याच उत्साहाने मारीयो, कॉन्ट्रा , SD fighter , vice city खेळले. चला तर मग आमच्या पिढीने खेळलेले काही क्लासीक गेम्स पाहुया... इतर बर्‍याच लोकांसारखीच माझी पण गेम खेळन्याची सुरुवात "मारीयो" नी झाली. बहुतेक चौथी - पाचवीच्या उन्हाळी सुट्ट्या असाव्यात दिवसभर उन्हात गोट्या नाहीतर क्रिकेट खेळत होतो. मग एक दिवस मोठा मावसभाऊ बोलला, माझ्या मित्राने कुठलातरी गेम आणलाय रे , जा पाहुन ये. त्या मित्राकडे काहीसा असा गेम होता टिव्हीला जोडलेला... video_game व त्यावर मारीयो चालू होता तेच त्याचे झालेले पहिले दर्शन ! बटण दाबलं की मारीयो पळतो, उड्या मारतो हीच मुळात गंमतच होती त्या वेळी. मग काय ? दुपारचे क्रिकेट बंद अन् मित्राकडे पडिक! पण मित्राकडे किती खेळणार ना ?म्हणुन मग स्वतःचा गेम घेण्याची खटपट चालु झाली . मग रितसर त्याने कसा मानसीक विकास होतो ? शैक्षणीक प्रगतीच्या आड कसा येत नाही ? हे आई-वडीलांना समजाऊन झाले. नंतरचा अध्याय म्हणुन रडणे , मार खाणे वगैरे साग्रसंगीत कार्यक्रम पार पडल्यावर एकदाचा स्वतःचा गेम मिळाला. आणी एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केला. तसा मारीयो हा काही अगदिच नविन नाही . मारीयो पहिल्यांदा दिसला तो Donkey Kong या गेम मध्ये . तेही १९८१ ला. मारीयोचे पप्पा (designer) आहेत Shigeru Miyamoto आणी याचा जन्म झाला Nintendo या कंपनीत. या मारीयोचे "मारीयो" असे बारसे होण्याच्या अगोदर Mr. video, jumpman असे काही नावं होती. तसे मारीयोचे बरेच गेम्स आले. मारीयो वेगवेगळ्या गेम्समध्ये दिसला . पण मारीयोला प्रसिद्धी मिळाली ती Super Mario Bros.या गेम मुळे. या गेम मध्ये "किंग कूपा" नावाचा व्हिलन "राजकुमारी पीचला" त्याच्या "मशरूम किंग्डम" मध्ये डांबुन ठेवतो . व मारीयोला तिला सोडवायचे असते . या प्रवासात त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. या गेम मध्ये एकुण ८ राउंड होते प्रत्येक राउंड मधे ४ स्टेजेस. सुरुवातीला ३ चान्सेस असतात . पण नंतर ते वाढू शकतात. जशी जशी गेम मध्ये प्रगती करणार तशी संकटे कठिण होत जाणार पण वेगवेगळे सिक्रेट मार्ग , बोनस, १ अप , इत्यादी गोष्टींमुळे रोचक पण होत जातो. मारीयो... mario सुपर मारीयो ब्रॉस गेमची काहि द्रुश्ये... १) mario 1 २)mario 2 सुपर मारीयो ब्रॉस गेमप्ले... (या सिरीज मध्ये मुख्यतः संगणकावरील गेम्स बद्दल लिहिण्याचा विचार आहे. जसेकी vice city, tod, nfs, EA चे काही गेम्स, far cry इत्यादी. अर्थात तुम्हाला आवडेल तरच...काही सुचना असतील तर जरुर सांगाव्यात.) (सर्व चित्रे जालावरुन साभार... संदर्भ: १) https://en.wikipedia.org/wiki/Mario २) https://en.wikipedia.org/wiki/Mushroom_Kingdom ३) https://en.wikipedia.org/wiki/Shigeru_Miyamoto ४) https://en.wikipedia.org/wiki/Nintendo )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
13488 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

हे वेड कधीच नव्हते, एकदाच

नाना स्कॉच
Sat, 04/09/2016 - 10:18 नवीन
हे वेड कधीच नव्हते, एकदाच हट्ट केलेला बापाकडे ह्याच्यासाठी पण नंतर भोकं पडलेली बनियान पाहून त्याची त्या बालवयात सुद्धा घसा कोरडा पडला होता, ते असो गरीबी होती अन गेमची मालकी नव्हती म्हणून गेम्स वर हतखंडा नव्हता उन्हाळ्यात एखाद दिवस पाच रु/तास भावाने सेगा गेम पार्लर मधे खेळत असे मी, त्यातले आवडते म्हणजे मोर्टल कॉम्बेट अन सनसेट राइडर्स होते. बाकी पारंगत असलेले मित्र सफाईदारपणे एक एक लेवल पार करत तेव्हा टक लावुन टीवी कड़े बघत बसणे अन लेवल सर झाल्यावर त्यांच्यासोबत जल्लोष करणे ही आवडती कामे होती.
  • Log in or register to post comments

उक्या भावा...

विजय पुरोहित
Sat, 04/30/2016 - 22:13 नवीन
उक्या भावा... डायेब्लोवर पण लेख लिही की... मला अतिशय आवडते...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा