दिनांक ३ एप्रील ला चिंचवड विभागात वीज पुरवठा भर दुपारी खंडीत झाला. सुमारे पाच तास चिंचवड विभागातले ग्राहक हाश्य - हुश करत राहिले.
अनेकांनी फोन करुन वीज महावितरण कंपनीकडे किती वेळ लागेल इ. विचारणा केली पण वीज वितरणाचे अधिकारी फोनवर उपलब्ध नव्हते. याची नोंद दि. ४ एप्रीलच्या दैनीक सकाळच्या पिंपरी चिंचवड अवृतीतही घेतली गेली.
सामन्यपणे आपला ( ग्राहकाचा ) आवाज वर्तमान पत्रात दिसला या नादात ग्राहक खुष झाले असतील. जर सप्लायचा फ्युज गेला असेल आणि शहरात ४ तासांपेक्षा जास्त काळ वीज बंद असेल तर दर तासाला पन्नास रुपये पेनल्टी ग्राहक मागु शकतो या बाबत मात्र ग्राहक जागरुक नाहीत. संदर्भ - २० मे २०१४ चे शासनाचा जी आर.
या शासनाच्या आदेशात कोणत्या प्रकारच्या तक्रारीसाठी कोणत्या भागात ( शहरी/ग्रामीण ) जास्तीत जास्त वेळ वीजपुरवठा बंद पडल्यास ग्राहक पेनल्टी मागु शकतो याचा उल्लेख आहे पण ही पेनल्टी कशी मागायची या बाबत उल्लेख नाही.
अश्या पेनल्टी मागण्याचा उद्देश इतकाच की वीज महावितरणाच्या कारवाईत जर दिरंगाई झाली असेल तर संबंधीतांना याची जाणिव व्हावी इतकाच आहे.
पेनल्टी मागण्याची काल मर्यादा साठ दिवसांची आहे. मला अद्याप ३ एप्रीलला हा विद्युत पुरवठा नेमक्या कोणत्या कारणासाठी बंद आहे हे समजले नाही. हे कसे समजेल याबाबत महा वितरण कंपनीच्या वेब साईटवर माहिती नाही.
जर माहितीच्या अधिकारात अर्ज केला तर ६० दिवसात उत्तर येईल अशी अपेक्षा ठेवता येत नाही आणि माहिती जरी मिळाली तरी नेमकी कोणत्या ऑफीसमधे अशी पेनल्टी मागावी या बाबतही माहिती वेब साईट वर उपलब्ध नाही.
याबाबत मिपाकरांनी कधी अशी पेनल्टी वसुल केली आहे का ? जर असेल तर माहिती द्यावी.
वर्गीकरण
वाचन संख्या
7497
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
ग्राहक न्यायलयात चौकशी करावी
ग्राहक न्यायलयात चौकशी करावी
सदर कंपनीच्या संपर्क अधिकार्
कृपया
ही लिंक माझ्याकडे आहे पण हे
तुमच्या बिलावर संबंधित
In reply to ही लिंक माझ्याकडे आहे पण हे by नितीनचंद्र
जोडप्रश्न
पुरवठा होत असलेल्या
In reply to जोडप्रश्न by अन्या दातार
कंपनी अथवा तक्रारदार विद्युत पुरवठा
प्रयास
पुणे मुंग्रापं