✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अर्जुन आणि कर्ण

स
साहना यांनी
Fri, 04/01/2016 - 05:47  ·  लेख
लेख
महाभारताच्या युद्धात सूतपुत्र कर्णाचा आरामात वध केल्याने युद्धानंतर अर्जुनाला खूप गर्व झाला. त्याने ही गोष्ट कृष्णासमोर बोलून दाखवली तेव्हा कृष्ण हसू लागला. काही वेळाने कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की युद्धात जे झालं ते तुला समजलेलं दिसत नाही. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की : कर्णाने आपले अपराजित कवच आणि कुंडले, जी जन्मजात त्याच्या शरीराला जोडलेली होती, ते ब्राम्हणाच्या रूपातील इंद्राला देऊन टाकले, कारण इंद्राला माहिती होते की असे केल्याशिवाय कर्णाला पराभूत करणे अशक्य आहे. त्यामुळे आपला पुत्र अर्जुन याच्या सुरक्षे साठी इंद्राने कर्णाकडून कवच - कुंडले मागून घेतली आणि महारथी कर्ण दानशूर होता, त्यामुळे त्याने काही विचार न करता त्या गोष्टी इंद्राला दिल्या. इंद्राने त्याला विचारलं की, "मी इंद्र आहे हे माहीत असूनही तू मला कवच कुंडले का दिलीस? " यावर कर्णाने उत्तर दिले की सूर्य पूजेच्या वेळी जर तुम्ही माझे प्राणही मागितले असते तर मी तेही दिले असते." या उत्तराने इंद्र खजील झाला आणि त्याने कर्णाला अमोघ शक्ती दिली ज्यामुळे तो कोणा एका व्यक्तीला असफल न होता मारू शकेल. परंतु त्यानंतर ती शक्ती इंद्राकडे परत येईल. ही शक्ती तीच होती जी कृष्णाने घटोत्कचावर वापरायला भाग पाडले, ज्यामुळे कर्णाच्या विजयाची शेवटची अशाही संपुष्टात आली. या परिस्थितीत कर्णाचा सामना अर्जुनाशी झाला. याशिवाय कर्णावर काही शापही होते. पाहिला शाप त्याचे गुरु परशुरामांनी दिला होता कारण त्याने त्यांच्याकडून हे सांगून शिक्षण घेतले की तो एक ब्राम्हण आहे. त्यामुळे जेव्हा भगवान परशुरामांना या खोट्या बद्दल माहिती पडले तेव्हा त्यांनी कर्णाला शाप दिला की जेव्हा तू आपल्या सर्वात कठीण युद्धात असशील, आणि जेव्हा तुला या ज्ञानाची सर्वाधिक गरज असेल, तेव्हा तुला या ज्ञानातील काहीच आठवणार नाही. त्यामुळेच कर्ण आपल्या मृत्यू च्या दिवशी ब्रम्हास्त्र आणि इतर अस्त्रांच्या वापराचा विधी विसरून गेला. दुसरा शाप होता: एकदा कर्ण शिकार करत होता आणि चुकून त्याने एका ब्राम्हणाची गाय आणि तिचं वासरू मारलं. त्या ब्राम्हणाने शाप दिला की युद्धात कठीण वेळी त्याच्या रथाचं चाक धसेल (जमिनीत रुतेल) आणि त्याची आवक देखील बंद होईल. त्याचा सारथी शल्य त्याच वेळी तिथून निघून गेला आणि त्याच्या रथाचं चाक जमिनीत धसले होते तेव्हाच, कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कर्ण दानशूर होता. त्याच्या सवयी सभ्यता, सज्जनता आणि दयेने एवढ्या परिपूर्ण होत्या की मृत्यू त्याच्या आसपास फिरकू शकला नसता. परंतु कृष्णाने पुन्हा खेळी खेळली. एका गरीब ब्राम्हणाचा वेश घेऊन त्याने युद्धभूमीवर जखमी कर्णाकडून त्याच्या सर्व चांगल्या कर्मांचे फळ दान म्हणून मागून घेतले. दानशूर असल्यामुळे कर्णाने त्याची ही मागणी चटकन पूर्ण केली. त्याच्या पुण्याचं सुरक्षाकवच त्याच्यापासून दूर झालं आणि अर्जुनाला त्याला मारण्यात अडचण आली नाही. शेवटी कृष्ण म्हणाला : तूच विचार कर आणि निर्णय घे की तुमच्या दोघात श्रेष्ठ योद्धा कोण आहे, तू - अर्जुन - जो माझ्या संरक्षणात आणि माझ्या सल्ल्याने युद्ध खेळत होता की तो कर्ण - जो आपलं फुटकं नशीब घेऊन युद्धात सामील झाला होता. हे ऐकून अर्जुनाला आपली चूक उमगली आणि त्याने मान्य केलं की कर्ण आपल्यापेक्षा महान योद्धा होता.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21922 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

मी तशी बरीच व्हर्जन्स वाचली

मृत्युन्जय
Tue, 04/05/2016 - 19:34 नवीन
मी तशी बरीच व्हर्जन्स वाचली आहेत. पण हे विधान करण्यापुरते मी किसारी मोहन गांगुली भाषांतरित महाभारताचा आधार घेतला आहे. गांगुलींचे भाषांतर हे मूळ महाभारताचे भाषांतर मानले जाते. त्या भाषांतरातील खालील उतारा वाचा:
When Drona failed to gain any ascendency over the son of Pandu, the son of Bharadwaja, that warrior acquainted with the course of all weapons, invoked into existence the Aindra, the Pasupata, the Tvashtra, the Vayavya, and the Yamya weapons.
यात द्रोणाचार्यांनी शेवटचा उपाय म्हणुन पाशुपत अस्त्र वापरल्याचा उल्लेख आहे. अर्जुनाने अर्थात त्याच्याकडच्या पाशुपताने त्याचे निवारण केले. मला संस्कृत येत नसल्याने मूळ संस्कृत प्रतीत काय लिहिले आहे मला माहिती नाही. पण इथे तरी पाशुपत अस्त्र असा स्पष्ट उल्लेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कर्णाकडे देखील पाशुपत अस्त्र होते त्याचा पुरावा

मृत्युन्जय
Tue, 04/05/2016 - 19:43 नवीन
Yonder Karna urges forward the mighty car-warriors of the Dhartarashtras towards the son of Pritha with the weapons called Sthunakarna, Indrasjaha and Pasupata, and with clubs and other weapons. The king, O Bharata, must be deeply afflicted and exceedingly weakened, because the Pancalas and the Pandavas, those foremost of all wielders of weapons, are seen to proceed with great speed towards him at a time when speed is of the highest moment like strong men rushing to the rescue of a person sinking in a bottomless sea. The king's standard is no longer visible. It has probably been struck down by Karna with his shafts.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कुठल्या काळात जगताय महाराजा?

विजय पुरोहित
Sat, 04/02/2016 - 21:44 नवीन
कुठल्या काळात जगताय महाराजा? 2016 भावा... पशुपतास्त्र आणि नारायणास्त्र अशी अस्त्रे होती तर??? असतीलही!!! कृष्ण भगवान होते??? कवच कुंडले?????? यू मीन बुलेटप्रूफ जॅकेट!! असतीलही. आदित्य हृदय स्तोत्र वाचून अनुभव घ्या. आपला तो बाब्या!!! म्हणजे आपल्या त्या रासलीला अन् दुसर्याच्या त्या कामलीला! तुम्हाला दुर्योधन आवडतो का? तर घ्या आवडून. मूळ महाभारत म्हणजे कोणाचे हो? ते शंभर टक्के सत्य आहे का? आणि कर्णाचे उदात्तीकरण केल्यावर तुमच्या पोटात का दुखते? तुम्ही तरी त्या काळात होता का हो? तुम्हाला पण कुणी संजय भेटला काय?
  • Log in or register to post comments

तुम्ही तरी त्या काळात होता का

खालीमुंडी पाताळधुंडी
Sat, 04/02/2016 - 22:32 नवीन
तुम्ही तरी त्या काळात होता का हो? तुम्हाला पण कुणी संजय भेटला काय?
संजय कशाला भेटायला हवा? मेंदू आणि त्यातून निघणारा तर्क वापरणे गरजेचे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

लोलवा

स्पा
Sat, 04/02/2016 - 21:45 नवीन
वरची चर्चा वाचून असे वाटून राहिले कि हि मंडळी संजयसोबत बसून महाभारत बघत होती =))
  • Log in or register to post comments

डिसक्लेमर

झेन
Tue, 04/05/2016 - 17:35 नवीन
डिसक्लेमर टाकायचे राहीले ना "केवळ कथा आहे. काथ्याकुट करायची गरज नाही"
  • Log in or register to post comments

अहो मग संपादकांनी विनंती करून

आनंदी गोपाळ
गुरुवार, 04/07/2016 - 13:56 नवीन
काथ्याकूट सदरातून काढून जनातले मनात घेऊन जावे की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन

..

mugdhagode
Tue, 04/12/2016 - 08:32 नवीन
छान कर्मणूक झाली ! कर्म !
  • Log in or register to post comments

हाय मुग्धे... कशी आहेस?

प्रचेतस
Tue, 04/12/2016 - 09:04 नवीन
हाय मुग्धे... कशी आहेस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

मजेत एकदम. आपण कसे आहात ?

गणामास्तर
Tue, 04/12/2016 - 09:30 नवीन
मजेत एकदम. आपण कसे आहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी पण मजेत.

प्रचेतस
Tue, 04/12/2016 - 09:42 नवीन
मी पण मजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

आयडी चुकला वो :)

टवाळ कार्टा
Tue, 04/12/2016 - 11:04 नवीन
आयडी चुकला वो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

खरेच की! गोड्यांच्या मुग्धाला

विजय पुरोहित
Tue, 04/12/2016 - 11:06 नवीन
खरेच की! गोड्यांच्या मुग्धाला विचारलेला प्रश्न आणि गणामास्तर कसे काय उत्तर देताहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मुग्धा

नाखु
Tue, 04/12/2016 - 16:46 नवीन
(धाग्यावरच फक्त) लाजते त्या मुळे गणामास्तरांना मध्यस्थी करावी लागली. अवांतरः गणामास्तर कसे आहात. सध्या गावात की गावा बाहेर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

..

mugdhagode
Tue, 04/12/2016 - 17:05 नवीन
छान. संध्याकाळ होइल. संध्याकाळ झाली की युद्धविराम ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

नमस्कार मुग्धा ताई!

विजय पुरोहित
Tue, 04/12/2016 - 17:06 नवीन
नमस्कार मुग्धा ताई!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

का गो?

प्रचेतस
Tue, 04/12/2016 - 17:07 नवीन
का गो? तुमच्यात रात्रीयुद्ध नसतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

=))

विजय पुरोहित
Tue, 04/12/2016 - 17:08 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काय हे ? मुग्धा 'गोडे' हे

सस्नेह
Tue, 04/12/2016 - 10:57 नवीन
काय हे ? मुग्धा 'गोडे' हे वाचलं नाय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हा विचार पटला.

गॅरी शोमन
Wed, 04/13/2016 - 09:18 नवीन
तू - अर्जुन - जो माझ्या संरक्षणात आणि माझ्या सल्ल्याने युद्ध खेळत होता की तो कर्ण - जो आपलं फुटकं नशीब घेऊन युद्धात सामील झाला होता. हा विचार देवत्वाच्या अस्तित्वाला मान्य करायला लावणारा आहे त्यामुळे अनेकांना तो अप्रस्तुत वाटला का ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा