पुणे परिसरातील चित्रपट रसिकांसाठी महत्त्वाचे..!!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
पुणे परिसरातील चित्रपट रसिकांसाठी महत्त्वाचे..!!
पुण्याच्या 'राष्ट्रीय फिल्म संग्रहालयातर्फे देशोदेशीचे उत्तम चित्रपट दाखवणारा फिल्म क्लब चालवला जातो. दर शनिवारी संध्याकाळी सहा वाजता संग्रहालयाच्या प्रभात रोड येथील इमारतीमधील थिएटरमधे हे चित्रपट दाखवले जातात. या फिल्म क्लबची वार्षिक वर्गणी रु. १,५००/- आहे. हा खर्च आपल्या मल्टिप्लेक्स संस्कृतीत सुमारे तीन ते चार चित्रपट पाहण्याइतका आहे. यात वर्षभरात देशोदेशीचे निवडक असे किमान ५२ चित्रपट पाहता येतात. याशिवाय जानेवारीमधे पुण्यात होणार्या इंटरनॅशनल फेस्टिवलच्या पासाच्या किंमतीत सवलत मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध देशांच्या वकिलाती, सांस्कृतिक संस्थांतर्फे वेळोवेळी भरवल्या जाणार्या चित्रपट महोत्सवांची माहिती इमेलद्वारे घरबसल्या मिळते. हे महोत्सवही बहुधा विनामूल्य असल्याने आणखी चित्रपट पाहता येतात. इतकेच नव्हे तर उपयुक्त पुस्तकांनी भरलेल्या त्यांच्या ग्रंथालयालाही अॅक्सेस मिळतो.

दरवर्षी मार्चमधे मी हे आवाहन करत असतो. चित्रपटांबद्दल बरेच बोलणारे अनेक लोक माझ्या आसपास मला दिसतात. तरीही गेल्या चार वर्षांत एकच नवा सदस्य नोंदवू शकलो हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
सौजन्य : मंदार काळे

गेली काही वर्षे या फिल्म क्लबची सदस्य संख्या सातत्याने घटते आहे. इतका चांगला उपक्रम पुरेशा सहभागाविना बंद होईल का अशी भीती उत्पन्न झाली आहे. (अधूनमधून त्याला पुष्टी मिळेल असे काही घडताना दिसते.)
तेव्हा पुणे परिसरातील सर्व चित्रपटप्रेमींना कळकळीची विनंती की या वर्षी चार बॉलिवूड चित्रपट पाहू नका, त्याऐवजी निदान एक वर्ष या फिल्म क्लबला येऊन पहा. आपल्या सर्व चित्रपटप्रेमी मित्रांनाही सदस्य होण्यासाठी उद्युक्त करा. नाहीच रुचले तर मग पुढच्या वर्षीपासून पुन्हा बाहुबली नि दबंग आहेतच.
सदस्यता घेण्यासाठी खालील लिंकवरून फॉर्म डाउनलोड करा. आवश्यक ती सर्व माहिती त्यात दिलेली आहे.
दरवर्षी मार्चमधे मी हे आवाहन करत असतो. चित्रपटांबद्दल बरेच बोलणारे अनेक लोक माझ्या आसपास मला दिसतात. तरीही गेल्या चार वर्षांत एकच नवा सदस्य नोंदवू शकलो हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
सौजन्य : मंदार काळे
(कृपया हा संदेश फेसबुक, Whats App आणी इतरही माध्यमांद्वारे पुढे पाठवा)
प्रतिक्रिया
सवलत
कल्पना नाही, याबाबत तेच अधिक माहिती देऊ शकतील
आपले म्हणणे
+१
+१ सहमत
यशॊधनजी,
होईल
मागील वर्षी
हेच म्हणतो.
यदी
कॉलेजमध्ये असताना यासंबंधी
एकंदर अनुभव युजरफ्रेंडली
२० एप्रिल ते २० मार्च
English सोडून इतर भाषेतील
अधिक माहितीसाठी
ऑनलाइन सोय
आजकाल जगभरातले अनेक उत्तम
शुभेच्छा.