Skip to main content

जंजिऱ्या

जंजिऱ्या

Published on शनीवार, 26/03/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
जंगली तो सिद्दी , तुझा अधिपति होतो मालक होऊन तुझा , सागरी स्वार होतो माजलेला सिद्दी , जेव्हा किनार्यावर येतो त्रास देऊन जनतेला , सारं लुटुन नेतो याच त्रासातून सूटका व्हावी शिवाजी राजा इर्षा धरतो तेव्हाच सिद्दीला साथ देऊन जंजिऱ्या , अजिंक्यतेचा गर्व तू करतो राजा आमचा चालून येतो , सिद्दी तुझा आसरा घेतो कुशीत तुझ्या शिरून जातो , आक्रमनाने बेजार होतो माघार घेता घेता , मध्येच कुणी पुढे येतो ताब्यात घेऊन तुला , मालिक तुझा होतो हतबल झालेला हां सिद्दी मग बादशहाकडे आर्जव करतो बादशहाचा मांडलिक होऊन जंजिऱ्या , अजिंक्यतेचा गर्व तू करतो शह देण्यासाठी , राजा पदमदुर्ग उभारी राजपुरीच्या उरावर , दुसरी राजपुरी देखता असा दरारा , तोफा तू डागतो हार दिसता पुढे , तू भेकडपणे वागतो म्हणून , राजांच्या ख्यातीपुढे , नेहमीच तू हरतो तरी मान वर करून जंजिऱ्या , अजिंक्यतेचा गर्व तू करतो - अभिषेक पांचाळ
लेखनविषय:

याद्या 826
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया