अॅबाकस (सोरोबन) शिका, स्मरणशक्ती वाढवा !! (भाग २)
अॅबाकस (जपानी भाषेत सोरोबन)
मागच्या भागात जाण्यासाठी ......
आता सोरोबन वर बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत. आता इथे कॅल्क्युलेटर आणि सोरोबन ची तुलना करू नये. या दोन्ही वस्तू खूप भिन्न आहेत. कॅल्क्युलेटर मुळे बुद्धी ला आराम मिळतो. याउलट सोरोबन मुळे बुद्धीला ताण पडून बुद्धी तल्लख होते. त्यामुळे सोरोबन हे कॅल्क्युलेटर सारखेच आहे या भ्रमात राहू नये. सोरोबन मध्ये सोप्या अंकाची बेरीज होत नाही. कारण त्याचे उत्तर आपल्याला माहित असते. उदाहरणार्थ २+२ याचे उत्तर आपणास सर्वाना माहित आहे ४ आहे. त्यामुळे हे गणित सोरोबन वर सोडवणे मूर्खपणाचे ठरेल. सोरोबन वरती बेरीज करताना एक गोष्ट लक्ष्यात ठेवा कि, एकेरी संख्यांची बेरीज हि मनातल्या मनात करायची आहे आणि उत्तर फक्त सोरोबन वर मांडायचे आहे. उदाहरणार्थ ३५ + ३२ हे गणित सोडवताना एकक स्थानच्या संख्या ५ + २ याची मनातल्या मनात बेरीज करून ७ हि संख्या सोरोबन वर मांडायची आहे. style="margin-center: auto; margin-right: auto; आता आपण ३० + १५ यांची बेरीज सोरोबन वर करणार आहोत. प्रथम "सिम्पल सोरोबन" ऐप ओपन करा. त्यावर "फ्री मोड" वर क्लिक करा. तुम्हाला असं चित्र दिसेल.
![]() |
| ह्या चित्रामध्ये सोरोबन हा "०" स्थिती मध्ये आहे. म्हणजेच जर तुम्हाला कोणी शुन्य संख्या सोरोबन वर मांडायला सांगितली, तर तुम्ही काहीच करायचे नाही. कोणताच मणी हलवायचा नाही. सोरोबन आहे तसेच ठेवायचे. |
आता ३० हि संख्या सोरोबन वर मांडू. प्रथम एकक स्थानी असलेला ० मांडताना कोणताच मणी हलवायचा नाही पण दशक स्थानी असलेला ३ मांडताना सोरोबन वरील उजवीकडून दुसर्या उभ्या मांडणी मध्ये खालून ३ मणी वर सरकवायचे. खालील चित्रात पहा.
![]() |
| ० मांडताना कोणताच मणी हलवायचा नाही पण ३ मांडताना खालून ३ मणी वर सरकवायचे |
आता १५ हि संख्या मिळवताना प्रथम ५ हि संख्या ० मध्ये मिळवू. मग आपल्या डोक्यामध्ये आकडे मोड करा ०+५ = ५ उत्तर ५ आले. म्हणून ५ हि संख्या सोरोबन वर मांडू. आपण एकक स्थानाची बेरीज केली असल्याने उत्तर मांडताना ते उजवीकडून पहिल्या उभ्या मांडणी मध्ये मांडावे. आता ५ हि संख्या मांडायची कशी? मागच्या भागात सांगितल्या प्रमाणे वरचा एक मणी हा ५ मूल्याचा असतो म्हणून वरचा एक मणी खाली सरकवा. खालील चित्रा मध्ये पहा.
![]() |
| वरचा एक मणी हा ५ मूल्याचा असतो म्हणून वरचा एक मणी खाली सरकवा |
पुढे आता १ हि संख्या ३ मध्ये मिळवू. म्हणून डोक्यामध्ये आकडे मोड करा १+३ = ४ उत्तर ४ आले. मग हि ४ संख्या उजवीकडून दुसर्या उभ्या मांडणी मध्ये मांडा. कारण आपण दशक स्थाना वरील संख्येची बेरीज करतोय. आता आपण आधीच ३ मणी सरकवले आहेत त्यामुळे आता फक्त एक मणी वर सरकवा म्हणजे ३ मध्ये १ मिळवले असे होईल. हे आले आपले उत्तर ४५. तुम्हाला दशक स्थानी ४ मणी वरती आणि एकक स्थानी वरून एक मणी खाली म्हणजे तो ५ आहे. खालील चित्रा मध्ये पाहा.
![]() |
| फक्त एक मणी वर सरकवा म्हणजे ३ मध्ये १ मिळवले असे होईल आणि हे आले आपले उत्तर ४५. |
आता २५ + २४ यांची बेरीज करू. मी काही न लिहिता यांची बेरीज चित्रं रूपाने दाखवणार आहे. खालील चित्रा मध्ये पाहा.
![]() |
| सोरोबन ० या स्थिती मध्ये . |
![]() |
| एक मिळवला . |
![]() |
| दोन संख्या मिळवली . |
![]() |
| परत ४ मिळवले. |
![]() |
| परत २ मिळवले आनि हे आले उत्तर ४९. |
निरीक्षण :
आता ज्यांना जास्त डोकं आहे त्यांनी खालील विदिओ पाहून निरीक्षण करा. ह्या विदिओ मध्ये ५२८६ + ३१९७ + ७८२९ ह्या गणिताची बेरीज करताना दाखवली आहे. त्या संख्या मांडल्या कश्या? किती मणी वर सरकवले आणि वरून खाली घेतले? याचे बारकाईने निरीक्षण करा. निरीक्षण हा स्वत शिकण्याचा पाया आहे.
| विदिओ पाहून निरीक्षण करा. |
आज या भागात सोप्या संख्येची बेरीज कशी करायची ते शिकलो आता पुढच्या भागात यापेक्षा थोडी कठीण संख्येची बेरीज कशी करायची ती पाहूया. (क्रमश:)
Book traversal links for अॅबाकस (सोरोबन) शिका, स्मरणशक्ती वाढवा !! (भाग २)
वर्गीकरण









प्रतिक्रिया
पुढील भागाच्या प्रतीक्षेत
मजा येतेय... पुढचा भाग
पुढील भागाची वाट पाहतोय...
.