Skip to main content

ही कोंबड्याची'चव'हा,वेड लावी जिह्वा

लेखक खालीमुंडी पाताळधुंडी यांनी गुरुवार, 10/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.

ही कोंबड्याची'चव'हा,वेड लावी जिह्वा(जिभ)

(टीप : सदर गाणे "ही गुलाबी हवा"च्या चालीत म्हणावे. आरवा=कोंबड्याचे आरवणे या अर्थाने घ्यावे) ही कोंबड्याची 'चव'हा, वेड लावी जिह्वा(जिभ) हाय रश्श्यातही,ऐकू ये आरवा...... तंगडी फोडी कुणी,कड्डकडाडूनी सुख प्रकटले,आज माझ्या मनी पांढर्या रश्श्यातही,गंध दाटे नवा ऐकू ये आरवा....... का किती पेग हे,रिचवले(पचवले) उदरा भान हरपून मी,हावराबावरा का कळेना तरी,जाणवतो गारवा ऐकू ये आरवा....... - - - खाली मुंडी कोंबडी धुंडी
लेखनविषय:

वाचने 3216
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

अगागा ;-)

हुर्रेरेर्रेर्रेर्रे!!! धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड!!! ;) स्वारी! (माझ्या आयडीनावात बदल झालाय त्याच्या आनंदात कुठे जाऊ तेच कळेना! ;) ) बाकी, लिहिलेय चान! Sandy

In reply to by श्री गावसेना प्रमुख

आव येक नवीच आलीय. 'इंग्लीश गावठी' म्हणून इकत्यात. दिसाया एकदम गावठी सारखीच. आमी फसलो येकदा! :-(

फोड्ड तू भावा!

चाल: दिवस तुझे हे फुलायचे दिवस तुझे हे हादडायचे रोजच चिकन ओरपायचे! रश्शास शोधत जाणे वाटेत सुकेही खाणे पीसेसनी ताट भरायचे रोजच चिकन ओरपायचे! माझ्या या किचनपाशी खाच तू कलेजी जराशी तांबडे पांढरे रेमटायचे रोजच चिकन ओरपायचे!