जॉर्ज कार्लीन - अधिभौतीकवाद, राष्ट्रीय गर्व, व्यंजना, गर्भपात.
जॉर्ज कार्लीन हे अमेरिकन स्टेन्डअप कोमेडीअन, लेखक व नट होते. न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि आंतरजाल चित्रपट माहितीकोश (IMDB) येथे त्यांचा उल्लेख शतकातील सर्वोत्कृष्ट कोमेडीअन असा केलेला आढळतो.१९५६ ते २००८ पर्यंत तब्बल चोपन्न वर्षांच्या कारकिर्दीत ते त्यांच्या स्फोटक व विवादात्मक विधानांसाठी नेहमी चर्चेत असायचे. विविध संवेदनशील विषयांवर कार्लीन यांनी केलेले वक्तव्य हे जितके विनोदी होते तितकेच ते विचार करायला लावणारे आणि स्फोटक होते.
इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व व मानवी स्वभावाचे अत्यंत बारकाईने केलेले निरीक्षण हे त्यांचा प्रत्येक कृतीमध्ये प्रखरपणे दिसायचे. मिपाकरांना कार्लीन माहिती असतील, परंतु जास्तीत जास्त मिपाकारांपर्यंत हे व्यक्तिमत्व पोहोचावे म्हणून हि खटपट.
त्यांच्या तूनळीवर (या शब्दाचा शोध लावणाऱ्या महाशयांना दंडवत) उपलब्ध असलेल्या चित्रफितींचे काही दुवे व संदर्भ खाली दिले आहेत. कार्लीन हे काही तत्ववेते नव्हते त्यामुळे त्यांची विधाने हि शंभर टक्के तार्किक असतीलच असे नाही तसेच बऱ्याच लोकांना ते 'foul mouthed' व अश्लील बोलणारे वाटायचे, या दोन गोष्टींकडे थोडेसे दुर्लक्ष करून जर पाहिलेत तर नक्कीच विचार करायला लावणारे मुद्दे सापडतील.
अधिभौतीकवाद (Materialism)
हि चित्रफित कार्लीनबुवांच्या १९८१ साली आलेल्या 'Place for my stuff' या अल्बम मधून आहे.खूप प्रयत्न केला; पूर्ण दीड तासाचे भाषण काही सापडलेच नाही आंतरजालावर परंतु अमेझॉन डॉट कॉम वर डीवीडी उपलब्ध आहे. या चित्रफितीचे लिखित वर्जन येथे मिळेल.राष्ट्रीय गर्व (National pride)
हि फीत 2007 च्या 'Life is worth losing...' या अल्बम मधले आहे. राष्ट्रीय आणि सांस्कुतिक गर्वाविषयी त्यांनी केलेल्या या भाषणामुळे बरेच वादळ उठले होते. लिखित वर्जन येथे आहे.व्यंजना (Euphemisms)
'These poor people have been bullshitted by the system into believing that if you change the name of the condition, somehow you'll change the condition' हे कार्लीन यांचे गाजलेले वाक्य या चित्रफितीत आले आहे. 'Complaints and Grievances' या अल्बम मधला हा एक तुकडा आहे.लिखित वर्जन येथे आहेजिवनाचे पावित्र्य आणि गर्भपात (Sanctity of life and abortion)
बरेच वर्ष अमेरिकेत चर्चेत असलेल्या 'Pro-Life' किंवा 'Anti-Abortion' Movement च्या पार्श्वभूमीवर कार्लीन यांनी केलेले हे भाष्य 'Complaints and Grievances' या अल्बम मधला हा एक तुकडा आहे.लिखित वर्जन येथे आहे --------------------------------------------------------------- On a lighter note,कार्लीन बुवांची काही मला आवडलेली वाक्ये
- Intelligence tests are biased toward the literates
- Property is theft. Nobody “owns” anything. When you die, it all stays here.
- “When Will Jesus Bring the Pork Chops?” This title offends all three major religions, and even vegetarians!
- Thou shalt keep thy religion to thyself.
- What exactly is viewer discretion? If viewers had discretion most television shows would not be on the air.
- Never underestimate the power of stupid people in large groups.
- Religion is like a pair of shoes.....Find one that fits for you, but don't make me wear your shoes.
- Scratch any cynic and you will find a disappointed idealist.
- Never argue with an idiot. They will only bring you down to their level and beat you with experience
- There's no present. There's only the immediate future and the recent past
कार्लीन बुवांना पडलेले काही प्रश्न.
- Isn’t it a bit unnerving that doctors call what they do “practice”?
- If 4 out of 5 people SUFFER from diarrhea…does that mean that 1 enjoys it?
- If no one knows when a person is going to die, how can we say he died prematurely?
- What year did Jesus think it was?
- If all the world is a stage, where is the audience sitting?
- If a turtle doesn't have a shell, is he homeless or naked?
वर्गीकरण
खाडे सर, जॉर्ज कार्लिनवर लेख
In reply to खाडे सर, जॉर्ज कार्लिनवर लेख by तर्राट जोकर
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by निशांत_खाडे
नै हो. ऑरवेल, बर्नाड शॉ,
धन्यवाद
धन्यवाद दादा.
समाजात ढोंगीपणा जेवढा अधिक
Never underestimate the power
हा पण सुंदर आहे.... माझी आणि
In reply to हा पण सुंदर आहे.... माझी आणि by Anand More
हो आहेच..
In reply to हो आहेच.. by निशांत_खाडे
अजून एक
In reply to अजून एक by स्वधर्म
हे वाक्य ते..
In reply to हे वाक्य ते.. by निशांत_खाडे
बरोबर
In reply to हे वाक्य ते.. by निशांत_खाडे
मस्तच की!!
In reply to हे वाक्य ते.. by निशांत_खाडे
येस्स
In reply to हे वाक्य ते.. by निशांत_खाडे
:)
छान लेख,
जॉर्ज कार्लीन
In reply to जॉर्ज कार्लीन by सुमीत भातखंडे
डेव अॅलन हि आवडतो..
लेख आवडला !
In reply to लेख आवडला ! by रातराणी
धन्यवाद