✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भारतीय डावे आणि भारतीय उच्च मध्यमवर्ग

स
स्वामी संकेतानंद यांनी
गुरुवार, 03/03/2016 - 17:09  ·  लेख
लेख
कायप्पावर आमच्या एका ग्रुप मध्ये एका डाव्या काकांनी उच्च मध्यमवर्गीयांवर ताशेरे ओढले. ते उजवे असतात आणि आता खूप खूप बोलू लागले आहेत, निव्वळ जोक्स फॉर्‍वर्ड करतात हा त्यांच्या आक्षेप होता. त्यावर तिथे मी दिलेले उत्तर इथेही द्यावेसे वाटले. तिकडची धुणी इकडे धुवायची नसल्याने मी नामोल्लेख खोडले आहेत. मुद्दे स्वतंत्र आहेत, व्यक्तिगत काही नाही. तरी संपादक मंडळ धागा उडवायला स्वतंत्र आहे. >>>>>> 'अबक'च्या लेखातील एक बाब खटकली होती ती म्हणजे त्यांनी उच्च मध्यमवर्गीय म्हणजे सरसकट उजवे, मोदीसमर्थक, वाचनशून्य, उठवळ, फालतू जोक्स फॉरवर्ड करणारी, गुडी गुडी आयुष्य जगणारी जमात असे एक gross generalisation केले आहे. त्यात त्यांनी 'उच्च मध्यमवर्गीय उजवे' हा शब्द वापरलेला नाही तर 'उच्च मध्यमवर्गीय लोक' हा प्रयोग केला आहे. सरसकट generalisation कधीही चूकच! त्यांचा दुसरा आक्षेप आहे उच्च मध्यमवर्ग खूप खूप बोलतात('त्यांच्या त्यांच्या' व्हाट्सअप्प, फेसबुक खासगी कट्टे) ह्यावर! ह्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे कळत नाही! त्यांनी 'त्यांच्या त्यांच्या गटात' का बोलू नये? बाहेरसुद्धा का बोलू नये? त्यांना ते स्वातंत्र्य का नाही? किंवा त्यांनी प्रत्येक वेळी विद्वत्तापूर्ण चर्चाच करावी का? खासगी कट्टयांवर त्यांना हव्या त्या भाषेत हवे ते बोलायचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. सार्वजनिक नियम नक्कीच वेगळे असू शकतात. मुळात आपण उच्च मध्यमवर्गीय म्हणजे 'नवश्रीमंत' म्हणजे 'इतरांचे शोषण करून वर आलेले' किंवा 'नवशोषक वर्ग' असा काहीसा समज करून घेतला आहे. त्यामुळे सतत त्यांना अपराधीपणाची जाणीव करुन देत असतो. they are less equal अशी आपली समजूत असते.त्यांची वैचारिक चर्चा करण्याची बौद्धिक क्षमता किंवा अभ्यास नसतो असा आपला समज असतो. याच गैरसमाजातून मग आपण सरसकट या वर्गाला 'उजव्या'चा शिक्का मारून मोकळे होतो. एकदा का आपण त्यांच्यावर आपल्याला सोयीस्कर असा शिक्का मारला की मग आपण आपल्या जबाबदारीतून मोकळे होतो! त्याने विरोध व्यक्त केला तर ' तू उजवा, तू शोषक, तुला काय कळणार गरिबांच्या व्यथा, तुझा अभ्यास काय? तुला बोलायचा अधिकार काय? तुझी लायकी काय? तू फक्त संता बंता जोक्स फॉरवर्ड करू शकतोस' असे म्हणून आपण मोकळे व्हायचे!! मग हा वर्ग, जो आधी उजवा नसेलही, पण तो निव्वळ उच्च मध्यमवर्गीय असल्याने अशी वागणूक मिळताना पाहून उजवीकडे वळला तर त्यात त्याची काय चूक? अतिडाव्यांच्या 'आम्हालाच सर्वकाही कळते' ह्या अहंगंडाचाच ह्या वर्गाला जास्त राग आहे. इतकी वर्षे बोलायला व्यासपीठच मिळाले नाही या वर्गाला, कारण व्यासपीठावर बोलायची ह्यांची लायकी नाही, हे आपणच ठरवले होते. हे दाबले गेलेले आवाज आता उफाळून बाहेर पडत आहेत असे वाटते. त्यांना सार्वजनिक व्यासपीठ आधी मिळू दिले नाही, ते आता सोशल मीडियावर व्यक्त होताहेत. हे सर्व उजवे आहेत असा फार मोठ्ठा गैरसमज अबकचा झाला आहे. शिव्याशाप, फोटोशॉप मला सोशल मीडियावर सगळीकडून मिळताहेत. हे 'खूप खूप बोलणारे' सगळ्याच विचारधारांचे आहेत, कसलीही विचारधारा नसलेलेही आहेत. प्रत्येकाने व्यासंगी असावे, निश्चित विचारधारा असलेले असावे, उच्च अभिरुचीसंपन्न असावे वगैरे आपले गैरसमज आहेत, ते चूक आहेत. त्यांना चारचौघांसारखे, मौजमजेत जगावेसे वाटत असेल तर जगू द्यावे. ते त्यांचे आयुष्य आहे. डावी भूमिका जगणे म्हणजेच उत्तम आयुष्य असे का असावे? तसेच, उजवी राजकीय भूमिका वाईट्ट आणि डावी उत्तम असे का मनाशी गच्च बांधून ठेवावे? कारण जर हिटलर आणि मुसोलिनी उजवे असतील तर स्टालिन आणि पॉल पॉट डावे होते, अमेरिका भांडवलवादी क्रुरकर्मा असेल तर उत्तर कोरिया साम्यवादी क्रुरकर्मा आहे. म्हणजे कोणतीही विचारधारा, जर ताणून धरली तर वाईटच! अती तिथे माती. पण आपण, भारतात मात्र सातत्याने उजव्यांनाच vilify, victimize केले आहे असे नाही वाटत का? मी स्वतः उच्च मध्यमवर्गीय आहे( नव्वदोत्तर उदारीकरणानंतर उदयाला आलेला) आणि तरीही मी डावीकडे झुकलेला आहे, माझा व्यासंग कदाचित एवढा नसेल, पण मी वाचनशून्य नक्कीच नाही, मी विचार करतो आणि भरपूर विचार करूनच मी extreme left आणि extreme right ह्या दोन्ही विचारधारा नाकारून किंचित डावीकडे झुकलेली centre leftist विचारधारा स्वीकारलेली आहे, right of the centre नाही. पण जेव्हा डावे माझ्या सांपत्तिक आणि सामाजिक स्थितीकडे पाहून माझ्यावर थेट उजवा, संघी असे शिक्के लावतात तेव्हा मला वेदना होतात. हे एकदाच झालेले नाही तर सातत्याने होत असते. मी कधीही संघसमर्थक नव्हतो, कधीही नरेंद्र मोदी as a PM candidate मी समर्थन केले नव्हते ,तरीही मला न पटलेल्या डाव्यांच्या एखाद्या गोष्टीविषयी बोललो तर लगेच लेबल लावले जाते. एवढ्या victimizationनंतरही मी अजूनही माझ्या centre leftist भूमिकेशी चिकटून आहे, कारण त्याला विचारांचे अधिष्ठान आहे, पण सगळेच चिकटून राहत नाहीत. ते अखेर उजवीकडे वळतात. थोडक्यात काय तर डावे उजव्यांपेक्षा फार वेगळे नाहीत. डावेसुद्धा उजव्यांप्रमाणेच generalisation करतात, शिक्के मारून मोकळे होतात, इतरांना बोलू देत नाहीत, त्यांचा व्यक्त होण्याचा अधिकार नाकारतात, त्यांचे मनोबल खच्ची करतात; फरक हाच की डाव्यांची भाषा संयमित असते 'बरेचदा', 'well articulated rant' असे म्हणेन मी. उजव्यांची भाषा अनेकदा gross आणि आक्रमक असते. (पण उजव्यांची भाषा gross आणि आक्रमकच असते असे generalisation मी करणार नाही. अतिशय संयमित भाषेत, मुद्देसूद प्रतिवाद करणारे उजवे माझे मित्र आहेत.) मुद्दा हाच की सातत्याने एकाच गटाला vilify करू नये, कमअस्सल म्हणून हिणवू नये. दुसरी बाजू ऐकून न घेणारा अतिडावा 'विचारवंत' आणि दुसरी बाजू ऐकूण न घेणारा अतिउजवा 'uncivilized raccoon' कसा?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध

प्रतिक्रिया द्या
32334 वाचन

💬 प्रतिसाद (137)

प्रतिक्रिया

सोबर्स आणि लिली...

मुक्त विहारि
Sat, 03/05/2016 - 08:39 नवीन
आमने-सामने आले असतील किंवा नसतील... एकदा कोण डावे आणि कोण उजवे? हे नक्की झाले की, डाव्या-उजव्यांची आपापसात, तुलना करून टाकायची, असा आमचा स्वभाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

आमच्या काळात फेडरर आणि नदाल :

sagarpdy
Fri, 03/04/2016 - 11:47 नवीन
आमच्या काळात फेडरर आणि नदाल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

उजवं असणं चुकीचं नाही, डावं असणंही चुकीचं नाही

बोका-ए-आझम
गुरुवार, 03/03/2016 - 23:38 नवीन
पण आपली विचारसरणी हीच काय ती अंतिम आणि दुसरी विचारसरणी ही कःपदार्थ अशी धारणा चुकीची आहे. जगात जेव्हा अर्थशास्त्राचा उदय झाला तेव्हापासून उजवा विचार होता. पुढे समाजवाद्यांना त्यातल्या त्रुटी आणि त्यांचा शोषणासाठी होणारा वापर जाणवला. त्यातून डावा विचार उदयाला आला. म्हणजे दोन्हीही विचार हे माणसांनी केलेले आहेत. त्यामुळे दोन्हीही perfect असणं अशक्य आहे. पण हे दोन्हीही विचारसरणींवर टोकाचा विश्वास ठेवणारे मान्य करत नाहीत. आणि ही अशी rigidity उजव्यांपेक्षा डाव्यांमध्ये जास्त आढळते असा अनुभव आहे. Rigid उजवेही आहेत, नाही असं नाही पण त्यांचं प्रमाण डाव्यांच्या तुलनेत कमी आहे. १९९१ नंतर या देशात आर्थिक सुधारणा सुरु झाल्या. त्या काँग्रेसने आणल्यामुळे त्यांचं देशात स्वागत झालं असं माझं आधीही मत होतं आणि आत्ताही आहे. तेव्हा भाजप उदारीकरणाच्या विरोधात आणि उदारीकरणाला IMF Sellout वगैरे शब्द वापरणारा आणि स्वदेशीचा पुरस्कार करणारा पक्ष होता. नंतर सत्तेवर आल्यावर (१९९९-२००४) भाजपची आर्थिक धोरणं वेगळी होती. निर्गुंतवणूक; आर्थिक शिथिलीकरण; आयुर्विमा, दूरसंचार, वीजपुरवठा यासारख्या अनेक क्षेत्रांत खाजगी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली. २००४ मध्ये जेव्हा हे सरकार बदललं तेव्हा आलेल्या युपीए सरकारला प्रथम डाव्या पक्षांचा पाठिंबा होता आणि या डाव्या पक्षांनी अमेरिकेबरोबर होऊ घातलेला अणुकरार होऊ नये म्हणून कसोशीने प्रयत्न केले. पण त्याचं कारण काय होतं? त्यांना आपण तसाच करार चीनबरोबर केला असता तर काहीही फरक पडत नव्हता. पण ते अमेरिकेचं नावही ऐकायला तयार नव्हते. ही ideological rigidity डाव्यांमध्ये जास्त दिसून येते. २००४ मध्ये डाव्यांना लोकसभेत ६१ जागा मिळाल्या होत्या. सरकारच्या अनेक धोरणांवर त्यांचा प्रभाव होता. पण सरकारचा पाठिंबा काढून त्यांनी एक मोठी संधी गमावली - ideological rigidity मुळे.
  • Log in or register to post comments

प्रत्यक्ष व्यवहारात उजवे,

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 03/04/2016 - 00:40 नवीन
प्रत्यक्ष व्यवहारात उजवे, डावे, मध्यमार्गी, वगैरे वगैरे फक्त बोलबच्चन लेबले आहेत, माणसे बहुदा "यात मला काय मिळणार ?" या प्रश्नाचे फायदेशीर / सोईचे उत्तर ज्या बाजूने आहे त्या बाजूने बोलतात... आणि असा फायदा-तोटा न बघता बोलणार्‍यांची दोन्ही बाजूचे लोक, स्वतःची सोय पाहून, भलावण करतात अथवा त्यांच्यावर तुटून पडतात. स्वार्थ आणि भिती यावर केवळ समभाग बाजारच नाही तर बहुतेक सर्व मानवांच्या कृती चालतात.
  • Log in or register to post comments

:)

अर्धवटराव
Fri, 03/04/2016 - 00:59 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मूळ समस्या कुठली विचारधारा चांगली हा नाहि

अर्धवटराव
Fri, 03/04/2016 - 00:57 नवीन
एखाद्या विचारधारेत समाजाच्या तत्कालीन आणि सर्वकालीन समस्या सोडवण्याचं पोटेन्शीअल किती हाच क्रायटेरीया महत्वाचा आहे. धर्म/भांडवलशाही या मानवनिर्मीत व्यवस्था असल्यामुळे त्यात मानवी गुणदोष असणाअरच. त्यातल्या दोषांवर डाव्यांचा विशेष रोश असतो. पण त्याचवेळी साम्यवाद देखील मानवनिर्मीत व्यवस्था आहे व त्यात गुणदोषांचा तेव्हढाच स्कोप आहे हे डाव्यांना मान्यच नसतं. पोथीनिष्ठेबाबत सगळ्या विचारसरणी एकसारख्याच तीव्र असतात... अगदी 'आम' नव-विचारवादी सुद्धा. लेखात जे डावे/उजवे मंडळं दाखवली आहेत ति तत्वतः डावे किंवा उजवे नाहित. डावी विचारसरणी ज्या परिस्थीतीत उगम पावली व फोफावली तशी परिस्थीती आज अस्तित्वात नाहि. त्यामुळे सद्यःच्या डाव्या विचारांच्या गाभ्यातच पोकळी आहे. उजवे देखील फार वेगळे नाहित. त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आयतं मिळालं असल्यामुळे (त्यात काहि प्रॉब्लेम नाहि), व्यक्तीस्वातंत्र्याला समष्टीशी जोडण्याचं तंत्र अजुन डेव्हलप करता आलेलं नाहि. त्यामुळे डावे जसं एका केंद्रीय व्यवस्थेवर अवलंबुन असतात तसच उजवेदेखील. आधुनीक काळाने माणसाला जे बळ दिलं आहे त्याचा वापर करणारी विचारधारा सर्वोत्तम आहे, म्हणुनच लोकशाही इज बेस्ट.
  • Log in or register to post comments

भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस

जयंत कुलकर्णी
Fri, 03/04/2016 - 09:13 नवीन
भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस तरुणपणी डाव्या विचारसरणीकडे झुकलेला असतो. त्या काळात तो दाढी खाजवत हॉटेलमधे बसून भांडवलशाहीवर ताशेरे झाडत असतो. क्रांतीच्या गप्पा मारतो, चे गवेराबद्दल बोलतो. त्यावेळी बिअर पीत असेल तर मग त्याला खूपच चेव चढतो..(अर्थात काही जण बंदुक हातात घेतातही..नाही असे नाही.) नोकरीला लागल्यावर, हाताखाली माणसे आल्यावर, कामगार संघटनांशी, सरकारी नोकरांशी संबंध आल्यावर तो डावा किनारा सोडू लागतो. यावेळी त्याचा उजव्या किनार्‍याच्या दिशेने प्रवास सुरु होतो असे समजण्यास हरकत नाही. हळू हळू संसारात पडल्यावर तो उजव्या किनार्‍याजवळ येऊ लागतो व शेवटी त्यावर पाय ठेवतो.... ही प्रक्रिया अत्यंत नैसर्गिक आहे. तारुण्यात अन्यायाविरुद्ध लढण्याची खुमखुमी असते, तोच नंतर असहाय्य होतो व शेवटी परिस्थितीशी जुळवून घेतो....त्यात स्वतःचा फायदा बघतो.. असा तो प्रवास आहे....या प्रवासात मधे बरेच टप्पे आहेत ते लिहिण्यास प्रतिक्रियेची जागा कमी पडेल.... //तुम्ही विशीत असताना डाव्या विचाराचे नसाल तर तुम्हाला संवेदना नाहीत आणि तुम्ही चाळिशी उलटल्यावर उजव्या विचारांचे नसाल तर तुम्हाला मेंदू नाही असा काहीसा वाक्प्रचार इंग्रजीत आहे///// वर श्री. हुप्प्या यांनी म्हटलेले मला वाटते अगदी बरोबर आहे...
  • Log in or register to post comments

भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस

मोदक
Fri, 03/04/2016 - 11:18 नवीन
भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस तरुणपणी डाव्या विचारसरणीकडे झुकलेला असतो. त्या काळात तो दाढी खाजवत हॉटेलमधे बसून भांडवलशाहीवर ताशेरे झाडत असतो. क्रांतीच्या गप्पा मारतो, चे गवेराबद्दल बोलतो. बालशाखेपासून संघात जाणारे सुद्धा? ;) बाकी चे गवेराचे टीशर्ट घालणार्‍यांना "चे चा इतिहास माहिती आहे का?" असे दर वेळी विचारावेसे वाटते. (हलके घ्यावे. सरसकटीकरण वाटते आहे म्हणून असा प्रतिसाद दिला आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

डावी विचारसरणी म्हणजे केवळ

आनन्दा
Fri, 03/04/2016 - 11:26 नवीन
डावी विचारसरणी म्हणजे केवळ कम्युनिस्ट विचार किंवा डाव्या पक्षाचे काम नव्हे.. सर्वांना समान संपत्ती वाटप असावे, कोणी उच्च नीच नसावा वगैरे स्वप्नाळू विचार त्या वयात असतात.. अपवाद असतात, नाही असे नाही. पण वर म्हटल्याप्रमाणे तरूण वयात तुम्ही डावे नसाल तर तुम्हाला हृदय नाही. एखादा माणून पूर्णपणे डावा नसेल्, पण वयाच्या विशीपेक्षा वयाच्या चाळीशीत तो नक्कीच जास्त उजवा असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

विशीत तुम्ही पैसा म्हणजे

आनन्दा
Fri, 03/04/2016 - 11:30 नवीन
विशीत तुम्ही पैसा म्हणजे सबकुछ नव्हे असा विचार करता.. खिशात पैसा नसतो, पण छातीत धमक असते, मनगटात ताकद असते, काहीतरी करून दाखवण्याची खुमखुमी असते.. चाळेशीत खिशात पैसा असतो, ह्रुदयात असंख्य टेंशन असतात, मनगटातला जोर हळूहळू उतरायला लागलेला असतो, आणि मुख्य म्हणजे मी काहीही करू शकत नाही, हे आहे हे असेच चालणार ही भावना हळूहळू जोर धरायला असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

एखादा माणून पूर्णपणे डावा

मोदक
Fri, 03/04/2016 - 11:33 नवीन
एखादा माणून पूर्णपणे डावा नसेल्, पण वयाच्या विशीपेक्षा वयाच्या चाळीशीत तो नक्कीच जास्त उजवा असेल. सहमत. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

चाळिशीत डावे

पैसा
Fri, 03/04/2016 - 12:03 नवीन
चाळिशीत डावे राहिलेले लोक, त्यांना काय म्हणावे? स्वप्नात जगणारे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

विचारवंत.

गणामास्तर
Fri, 03/04/2016 - 12:20 नवीन
विचारवंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चाळिशीत डावे राहिलेले लोक,

मोदक
Fri, 03/04/2016 - 13:29 नवीन
चाळिशीत डावे राहिलेले लोक, त्यांना काय म्हणावे? स्वप्नात जगणारे? ह्म्म.. विचार करण्यासारखा प्रश्न आहे. माझ्यामते चाळीशीमध्ये डावे राहणार्‍यांमध्ये तीन प्रकार असतात. एक डाव्या चळवळीमध्ये आत्तापर्यंत पूर्ण आयुष्य घालवल्याने (नाईलाजाने) डावे राहिलेले लोक. विचार बदलणे म्हणजे चळवळीशी प्रतारणा किंवा आत्तापर्यंत घेतलेली भुमिका कशी बदलायची असे विचार असलेले "गोंधळलेले" लोक्स. दुसरे म्हणजे कोणताही एक विशिष्ट विचार किंवा चळवळ किंवा भुमिका यांच्याशी एकनिष्ठ न राहता केवळ प्रसिद्धीसाठी डावे राहिल्याचा ढोल पिटणारे लोक्स. "प्रसिद्धीलोलूप" यातलेच काही लोक्स उजव्यांचा तिरस्कार करणारे म्हणून "डावे" असेही असतात. राहिलेले खरेखुरे डावे लोक. त्यांना बरेच काही बदलायचे असते परंतु फारसा पाठिंबा नसतो आणि जो पाठिंबा मिळतो त्या पाठिंब्याचा 'बदल घडविण्यासाठी' फारसा उपयोग नसतो. त्यामुळे हे लोक नेहमी सत्ताधार्‍यांवर चिडलेले असतात. श्रीमंतीचा घाऊक तिरस्कार करतात. पोकळ आंदोलने वगैरे करतात आणि अशी आंदोलने करूनच आपण "सत्याचा आवाज बुलंद ठेवत आहोत" अशा भ्रमामध्ये जगतात. प्रत्यक्षात असेच आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चे चे टीशर्ट घालून मोदींच्या सभांना हजेरी

गॅरी ट्रुमन
Fri, 03/04/2016 - 11:54 नवीन
बाकी चे गवेराचे टीशर्ट घालणार्‍यांना "चे चा इतिहास माहिती आहे का?" असे दर वेळी विचारावेसे वाटते.
२०१४ मध्ये निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर एक फोटो फॉरवर्ड आला होता. चे गव्हेराचे टी-शर्ट घालून काही मंडळी नरेंद्र मोदींच्या सभांमध्ये आली होती. आता बोला. बहुदा चे गव्हेरा म्हणजे रॅम्बो किंवा तत्सम कोणी वाटला असावा त्यांना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

चे गवेरावर लिहिले तर तो

जयंत कुलकर्णी
Fri, 03/04/2016 - 12:11 नवीन
चे गवेरावर लिहिले तर तो आजच्या घडीला गुन्हा ठरेल काय? काय वाटते ? मी जेव्हा तरुण होतो तेव्हा चे गवेराच्या बर्‍यापैकी प्रभावाखाली असायचो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

नाही

गॅरी ट्रुमन
Fri, 03/04/2016 - 12:29 नवीन
चे गवेरावर लिहिले तर तो आजच्या घडीला गुन्हा ठरेल काय? काय वाटते ?
गुन्हा का ठरावा?चे गव्हेरा तर भारतातही आला होता.आणि पंडित नेहरूंनी त्याला आपल्या निवासस्थानी आमंत्रितही केले होते.भारताचे पंतप्रधान एखाद्याला आपल्या निवासस्थानी आमंत्रित करत असतील तर त्या माणसाविषयी लिहिणे हा गुन्हा ठरू नये.मला स्वतःला ती मते पटत नसली तरी त्याच्यावर लिहिणे हा गुन्हा ठरावा असे मला तरी वाटत नाही. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

मी जेव्हा तरुण होतो तेव्हा चे

मोदक
Fri, 03/04/2016 - 13:35 नवीन
मी जेव्हा तरुण होतो तेव्हा चे गवेराच्या बर्‍यापैकी प्रभावाखाली असायचो.. म्हणजे तुम्ही आता प्रभावाखाली नाही आहात. मग तर तुम्ही लिहायलाच हवे. विचार बदलण्याचे नक्की काय कारण, प्रभावातून बाहेर का आलात? एकंदर स्थित्यंतर कसे झाले वगैरे वगैरे. नक्की लिहाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

जरुर लिहा.

बोका-ए-आझम
Fri, 03/04/2016 - 14:08 नवीन
मराठीत अरुण साधूंचं ' फिडेल, चे आणि क्रांती ' आणि ' क्रांतीनंतरचा क्यूबा ' ही दोन पुस्तकं सोडली तर चेवर कोणीच लिहिलेलं नाहीये (बहुतेक). साधू डावे असल्यामुळे त्यांनी ते त्या बाजूने लिहिलंय. तुमचं लिखाण दुसरी बाजू दाखवून देईल. वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

मला वाटते

विकास
Sat, 03/05/2016 - 02:42 नवीन
"क्रांतीनंतरचा क्युबा" हे माधवराव गडकर्‍यांनी लिहीलेले पुस्तक होते. माधवरावांना डावे म्हणणे कदाचीत अवघड जाईल पण ते उजवे म्हणजे भाजपा/संघाच्या बाजूचे पण नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हो, बरोबर.

बोका-ए-आझम
Sat, 03/05/2016 - 08:17 नवीन
गडकरींनी लिहिलेलं पुस्तक आहे. साॅरी. तेही चुकून अरुण साधूंच्या नावावर गेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

पत्रकार म्हणजे,

भंकस बाबा
Sat, 03/05/2016 - 09:45 नवीन
वारा पाहुन् शीड बदलणार , तरी गड़कर्याचे लेख थोडेफार कोंग्रेस धार्जिनेच असायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मला एक साधा प्रश्न पडलाय,

गणामास्तर
Fri, 03/04/2016 - 09:24 नवीन
मला एक साधा प्रश्न पडलाय, आजपर्यंत मी 'उजवा विचारवंत, असा प्रकार ऐकला वा पहिला नाहीये. हे विचारवंत नेहमी डावेचं का असतात ? का फक्त डाव्या विचारसरणीच्या लोकांनाच विचारवंत म्हणायचे असे काही आहे ? वैयक्तिक मत : कम्युनिस्ट दिसला कि त्याला पोत्यात घालून बुडवला पाहिजे ;)
  • Log in or register to post comments

हे विचारवंत नेहमी डावेचं का

मोदक
Fri, 03/04/2016 - 10:06 नवीन
हे विचारवंत नेहमी डावेचं का असतात ? जशी सेक्युलर मंडळी शांतताप्रिय धर्माची सतत पाठराखण करतात तसेच काहीसे प्रकरण आहे. का फक्त डाव्या विचारसरणीच्या लोकांनाच विचारवंत म्हणायचे असे काही आहे ? अर्थातच. प्रवाहाच्या विरोधी लिहून, बोलून प्रकाशझोतात राहिले की हा शिक्का मिळतो. त्यानंतर रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यापासून दहशतवाद्यांपर्यंत सर्वांच्या ह्युमन राईट्सची आठवण येते. गांधी विथ गन्स वगैरे वगैर.. कम्युनिस्ट दिसला कि त्याला पोत्यात घालून बुडवला पाहिजे असाच विचार डाव्यांकडून उजव्यांप्रती अंमलात आणला जातो. मात्र प्राण गमावलेली व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची, विचारधारेची आहे त्यावर आवाज उठण्याची तीव्रता अवलंबून असल्याने आवाज ऐकू येण्याचे प्रमाणही बदलते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

ठ्ठो!

अगम्य
Fri, 03/04/2016 - 10:51 नवीन
शंकानिरसक प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

विचार

गॅरी ट्रुमन
Fri, 03/04/2016 - 10:57 नवीन
असाच विचार डाव्यांकडून उजव्यांप्रती अंमलात आणला जातो.
पण मोठा फरक म्हणजे तो विचार अंमलात आणायची शक्यता डाव्यांच्या बाबतीत खूप जास्त असते. आठवा गुलाल.... आज भारतातही सर्व राज्यांमध्ये पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये राजकीय हिंसाचार (पोलिटिकल व्हॉयोलन्स) सर्वात जास्त आहे त्याचे कारण सूज्ञांस सांगणे न लागे. सगळ्या जगाने नाकारलेल्या या विचारांना स्वतःला विचारवंत समजणारे इतके लोक कसे भूलतात तेच समजत नाही. हा विचार मुळातच मानवी स्वभावाच्या विरूध्द असल्यामुळे तो एन्फोर्स करण्यासाठी बळाच्या पोलादी पंज्याचाच वापर करावा लागतो यातच सगळे काही आले. (कम्युनिस्टांचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात नव्हे तर अस्मानात जाणारा) ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सगळ्या जगाने नाकारलेल्या या

गुलाम
Fri, 03/04/2016 - 15:58 नवीन
सगळ्या जगाने नाकारलेल्या या विचारांना स्वतःला विचारवंत समजणारे इतके लोक कसे भूलतात तेच समजत नाही
सगळ्या जगाने कोणता विचार नाकारलाय नक्की?? आपण आर्थिक कम्युनिस्ट विचारांबद्दल बोलत असाल तर डावे विचार म्हणजे फक्त आर्थिक विचार नव्हे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आज ज्या अर्थाने भारतामध्ये डावे विचार ओळखले जातात त्यात अभिव्यक्तिस्वातंत्र्य, समता, विवेकवाद आणि धर्मनिरपेक्षता ईत्यादी सुध्दा अंतर्भुत होतात. यातले काही विचार तुम्हाला सुध्दा मान्य असावेत. आणि अगदी आर्थिक विचारांबद्द्ल जरी बोलत असाल तर जसा शुध्द कम्युनिझम जगाने नाकारलाय तसाच शुध्द कॅपिटॅलिझम देखील नाकारलाच आहे. अगदी अमेरिकेत सुध्दा १०० टक्के मुक्त बाजारपेठ नाही. तिथेसुध्दा कल्याणकारी राज्याच्या अनेक योजना आहेत. भारतासकट अनेक देशांमध्ये असलेली श्रीमंतांवर कर आणि गरीबांना सबसिडी हेदेखील कम्युनिझमच आहे. रच्याकने आजच्या भारतातल्या राजकीय डाव्या पक्षांकडे बघुन पुर्ण डाव्या विचारसरणीबद्द्ल मत बनवणे म्हणजे शिवसेनेकडे बघुन शिवाजी महाराजांबद्दल मत बनवण्यासारखे आहे. (भगतसिंगांचे नाव ऐकून पण तुमची तळपायाची आग मस्तकात जाते का हो?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

शेवटचे वाक्य षटकार आहे साहेब

नाना स्कॉच
Fri, 03/04/2016 - 16:01 नवीन
शेवटचे वाक्य षटकार आहे साहेब मुजरा घ्या _____/\_____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम

हाणुमोदन.

आनन्दा
Fri, 03/04/2016 - 17:28 नवीन
हाणुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

+१ जोरदार वाक्य आहे. अर्ध

नाव आडनाव
Fri, 03/04/2016 - 17:39 नवीन
+१ जोरदार वाक्य आहे. अर्ध राज्य बक्षीस तुम्हाला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

++ सहमत

बाळ सप्रे
Fri, 03/04/2016 - 16:11 नवीन
++ सहमत हे डावं उजवं करत राहिलं की संतुलन ढळतच. म्हणूनच सरसकटीकरण टाळावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम

हा हा हा

गॅरी ट्रुमन
Fri, 03/04/2016 - 16:13 नवीन
आज ज्या अर्थाने भारतामध्ये डावे विचार ओळखले जातात त्यात अभिव्यक्तिस्वातंत्र्य, समता, विवेकवाद आणि धर्मनिरपेक्षता ईत्यादी सुध्दा अंतर्भुत होतात. यातले काही विचार तुम्हाला सुध्दा मान्य असावेत.
हा हा हा. अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि डावे? मग डाव्या देशांमध्ये गुलागवगैरे का होते हो? डाव्यांना पटेल ते बोलले तरच अभिव्यक्तीस्वातंत्र्य.नाहीतर कुठले अभिव्यक्तीस्वातंत्र्य, कुठली समता आणि कुठचे काय.
अगदी आर्थिक विचारांबद्द्ल जरी बोलत असाल तर जसा शुध्द कम्युनिझम जगाने नाकारलाय तसाच शुध्द कॅपिटॅलिझम देखील नाकारलाच आहे.
तुमच्याच शब्दात सांगायचे झाले तर शिवसेनेकडे बघून शिवाजी महाराजांविषयी मत बनविल्यामुळे कॅपिटॅलिझम वाईट असे चित्र उभे राहते. पण मुळातली कॅपिटॅलिझमची तत्वे गंडलेली नाहीत. मुळात समता ही बाहेरून थोपता येत नसल्यामुळे त्या थोपविण्यावर आधारीत असलेली कुठलेही प्रणाली मुळातच गंडलेली आहे.त्यामुळे हे विचार गंडलेले आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.
(भगतसिंगांचे नाव ऐकून पण तुमची तळपायाची आग मस्तकात जाते का हो?)
हो. एनी प्रॉब्लेम? भारतात कम्युनिस्टांचे राज्य येण्यापेक्षा ब्रिटिश राज्य राहिलेले मला कधीही चालले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम

भारतात कम्युनिस्टांचे राज्य

बाळ सप्रे
Fri, 03/04/2016 - 16:29 नवीन
भारतात कम्युनिस्टांचे राज्य येण्यापेक्षा ब्रिटिश राज्य राहिलेले मला कधीही चालले असते.
चान चान देशप्रेमाच्या कल्पना !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

दगडापेक्षा वीट मऊ

गॅरी ट्रुमन
Fri, 03/04/2016 - 16:32 नवीन
चान चान देशप्रेमाच्या कल्पना !!
दगडापेक्षा वीट मऊ वगैरे गोष्टी तुम्ही ऐकल्या असाव्यात ही अपेक्षा. आणि ऐकल्या नसतील तरी कम्युनिस्टांच्या राज्यापेक्षा मला ब्रिटिश राज्य परवडले असते या मतात मला कानामात्रावेलांटीचाही बदल करायची गरज वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

_/\_

बाळ सप्रे
Fri, 03/04/2016 - 16:39 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

अर्रर्र!!! गॅरी ट्रूमैन

नाना स्कॉच
Fri, 03/04/2016 - 17:42 नवीन
अर्रर्र!!! गॅरी ट्रूमैन ह्यांचे राजकीय पृथक्करण वाचायला मला नेहमी आवडे वाचनमात्र होतो तेव्हापासुन पण त्यांचा डावा द्वेष् किती आत्यंतिक आहे हे आज पाहिले, माझ्यालेखी गॅरी ह्यांनी ऑब्जेक्टिविटी गमवली आहे (कधी होती तरी का? हा कळीचा प्रश्न आहे ते एक असो), राजकीय पृथक्करण करताना नीरक्षीर असणे गरजेचे, ते करणाऱ्या मंडळी ने स्थितप्रज्ञपणे कोष्टके अन आकड़े मांडावे, जनतेला निर्णय घेऊ द्यावा, असे कायम वाटते, पण गॅरी साहेब ह्यांनी सपशेल भ्रमनिरास होईल असे वाक्य वर लिहिले आहे, माफ़ करा पण आजपासुन तुमचे पृथक्करण हे फ़क्त अन फ़क्त प्रचारकी लेखन म्हणून मी तरी गणेल, अर्थात आपला अभ्यास उदंड आहे आपले श्रोते/वाचक उदंड आहेत ते तसेच रहावे ह्या शुभेच्छा , तसे पाहता माझे अश्या निषेध करण्यामुळे गॅरी ह्यांच्यासारख्या अभ्यासु लेखकाला शष्प फरक पडणार नाहीच हे मला व्यवस्थित माहीती आहे. फ़क्त एकेकाळी मी मिपावर येण्यासाठी ज्या काही आयडीचे लिखाण पेडेस्टल वर ठेवत असे त्यात एक गॅरी होते म्हणून वाईट वाटले, एक विलक्षण प्रतिभावान अन डेटा ने परिपूर्ण असलेला आयडी आमच्या (नॉट सो इम्पॉर्टेन्ट) नजरेतून उतरला हे मनःपूर्वक नमूद करावे वाटले म्हणून लिहितोय. गॅरी साहेब, आपण ही कॉमेंट वैयक्तिक घेणार असलात तर मी तो माझाच बहुमान समजेल, किमान तुम्ही आमच्यासरख्या कीड़ामुंगी आयडीची दखल घेतली असा आमचा समज होईल, दुर्लक्ष केल्यास आमचे दुर्दैव असेल ते. आम्ही भगत, अटलजी, सावरकर, अन चंद्रशेखर आझाद ह्यांचा दुस्वास सहन करू शकत नाही (ही आमची पर्सनल अकलेची लिमिटेशन आहे असे समजा) तेव्हा आजपासुन आम्ही गॅरी ह्यांचे राजकीय पृथक्करण त्यागतो आहोत क्षमस्व (कट्टर देशप्रेमी) नाना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

जशी आपली इच्छा.

गॅरी ट्रुमन
Fri, 03/04/2016 - 17:47 नवीन
जशी आपली इच्छा. (कट्टर देशप्रेमी) ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

इथे कोणी कट्टर 'देशी'प्रेमी

स्वामी संकेतानंद
Fri, 03/04/2016 - 17:50 नवीन
इथे कोणी कट्टर 'देशी'प्रेमी नाही का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

तर्राट जोकर म्हणून एक आयडी

नाना स्कॉच
Fri, 03/04/2016 - 17:54 नवीन
तर्राट जोकर म्हणून एक आयडी आहे! (ऑल द बेस्ट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

देशप्रेम कट्टर झाले की विदेशी

बाळ सप्रे
Fri, 03/04/2016 - 17:55 नवीन
देशप्रेम कट्टर झाले की विदेशी कशी चालेल???? देशीच हवी ना??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

अजुन एक

नाना स्कॉच
Fri, 03/04/2016 - 17:54 नवीन
माझा अभ्यास खुपच कमी आहे (कारकुंड्याचा आयक्यु :D) तरीही मला जे पटणार नाही त्याचा मी जमेल तितका ऑब्जेक्टिव अन तर्कप्रमाणिक राहत विरोध करत राहीन म्हणतो, अर्थात तुम्ही तोड़ीसतोड़ लॉजिक दिल्यास मी खुल्यादिलाने ते आत्मसात करून घेईन , इतके मात्र मी ताजाकलम म्हणून नमूद करतो -नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

जरूर

गॅरी ट्रुमन
Fri, 03/04/2016 - 18:03 नवीन
तरीही मला जे पटणार नाही त्याचा मी जमेल तितका ऑब्जेक्टिव अन तर्कप्रमाणिक राहत विरोध करत राहीन म्हणतो
जरूर.अशा प्रक्रीयेचे स्वागतच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

Objectivity

बोका-ए-आझम
Sat, 03/05/2016 - 09:56 नवीन
या शब्दाला काहीही अर्थ नाहीये नाना! प्रत्येकजण या जगाकडे आणि त्यातल्या घडामोडींकडे आपल्या दृष्टिकोनातून बघत असतो. ग्लास अर्धा रिकामा की अर्धा भरलेला हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर आणि माझ्या मते त्या वेळच्या मन:स्थितीवर अवलंबून असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

हा हा हा.

गुलाम
Fri, 03/04/2016 - 20:03 नवीन
हा हा हा. अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि डावे?
तुम्ही पुन्हा एकदा चीन, कोरिया इ. कम्युनिस्ट सरकार बघुन हे विधान करताय. पण मी आधिच म्हणल्याप्रमाणे भारतात ज्या अर्थाने डावे ही कल्पना वापरली जाते ती फक्त मार्क्सवादापुरती मर्यादित नाहिये. ती एकंदर अमेरिकेत ज्या अर्थाने लिबरल ही टर्म वापरतात तशी वापरली जाते. ज्यामध्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे सर्वात महत्वाचे तत्व आहे. किंबहुना भारतात 'डावे' पेक्षा 'लिबरल' हीच टर्म वापरली जावी असं आता वाटू लागलय. शेवटी कम्युनिझम आणि कॅपिटॅलिझम या दोघांचेही उद्दिष्ट संपुर्ण समाजाची आर्थिक उन्नती आहे. दोघांमध्येही काही गंभीर दोष आहेत. कम्युनिझम मध्ये हुकुमशाहीचा आणि कॅपिटॅलिझम मध्ये मुठभर लोकांकडे संपत्ती एकवटण्याचा धोका असतो हे सर्वश्रुत आहे. आणि म्हणुनच जगभरात मिश्र अर्थव्यवस्था प्रेफर केली जाते. तरीही एखादी व्यवस्था जास्त वाईट आहे असे एखाद्याला वाटू शकते. पण म्हणुन त्या विचारसरणीच्या सर्वच लोकांचा घाउक द्वेष करणे केवळ चुकीचेच नाही तर धोकादायक ठरु शकते.
हो. एनी प्रॉब्लेम? भारतात कम्युनिस्टांचे राज्य येण्यापेक्षा ब्रिटिश राज्य राहिलेले मला कधीही चालले असते.
हे विधान तुम्ही फक्त आर्ग्युमेंट जिंकण्यासाठी करत असून ते तुमचे खरे मत नाही असे गृहीत धरतो आणि सोडून देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

मुद्दा

गॅरी ट्रुमन
Fri, 03/04/2016 - 22:24 नवीन
शेवटी कम्युनिझम आणि कॅपिटॅलिझम या दोघांचेही उद्दिष्ट संपुर्ण समाजाची आर्थिक उन्नती आहे.
याविषयी शंका असायचे काहीच कारण नाही. तरीही मी असे म्हणतो की डावे विचार हे स्वप्नाळू आहेत. म्हणजे समता वगैरे मूल्ये जर हृदयापासून अनुभवायला मिळत असतील तरच त्या मूल्यांचा समाजाला उपयोग होऊ शकतो.नुसती तोंडदेखल्या समता काय कामाची? आणि अशी समता खरोखरच हृदयापासून वाटणारे लोक फारच थोडे असतात हे तर सर्वांना दिसतेच.तेव्हा समता वगैरे मूल्ये ही बाहेरून लादता येणार नाहीत.त्यामुळे ही व्यवस्था मुळातच स्वप्नाळू विचारांवर आधारीत आहे. आणि त्यामुळेच ही व्यवस्था स्थिर करायची असेल तर दडपशाहीच्या वरवंटा लागतोच. त्यामुळे माझा दावा आहे की ही व्यवस्थाच मुळातच गंडलेल्या गृहितकांवर आधारीत आहे. त्यामुळे उत्तर कोरिया वगैरे उदाहरणे बाजूला ठेवली आणि अगदी मुळातले जे डावे विचार अभिप्रेत आहेत ते आणायचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही. कारण ती अंमलात येणेच शक्य नाही (जगात सगळे लोक तुकाराम महाराज किंवा एकनाथ महाराजांसारखे असतील तर गोष्ट वेगळी. पण तसे लोक फारच थोडे असतात हाच प्रॉब्लेम आहे) आणि त्यामुळे ती टिकवायची असेल तर बळाचा वापर आलाच हा माझा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम

पण मी आधिच म्हणल्याप्रमाणे

बोका-ए-आझम
Fri, 03/04/2016 - 23:33 नवीन
पण मी आधिच म्हणल्याप्रमाणे भारतात ज्या अर्थाने डावे ही कल्पना वापरली जाते ती फक्त मार्क्सवादापुरती मर्यादित नाहिये.
थोडं असहमत. डावे पक्ष किंवा डावी विचारसरणी असलेले पक्ष(याच्यात राजकीय/आर्थिक/सामाजिक या सगळ्यांचा समावेश आहे)हे चार आहेत - CPI (Marxist) किंवा CPM, CPI, Forward Bloc (याचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस होते) आणि Revolutionary Socialist Party किंवा RSP. यांच्यात कार्यकर्त्यांच्या संख्येनुसार आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्येनुसार CPM हा सर्वात बलिष्ठ पक्ष आहे. प्रकाश करात आणि आता सीताराम येचुरी हे याच पक्षाचे सरचिटणीस आहेत. २००४ मध्ये युपीएला पाठिंबा द्यायचा, २००८ मध्ये तो काढायचा, १९९६ मध्ये ज्योती बासूंना पंतप्रधान न होऊ देण्याचा वगैरे सगळे निर्णय हे CPM च्या नेत्यांनी घेतले अाणि बाकी पक्षांनी हाताला हात लावून मम (किंवा दास कॅपिटलमध्ये जे काय असेल ते) म्हटलं. नंदीग्राम आणि सिंगुर इथल्या हिंसाचारात CPM कार्यकर्त्यांचा सहभाग इतर डाव्या पक्षांपेक्षा जास्त होता. त्यामुळे भारतातील डावे हे प्रामुख्याने मार्क्सवादी आहेत. नक्षलवादी चळवळीतही CPI ML (Communist Party of India - Marxist - Leninist) आणि Maoist Communist Center हे दोन पक्ष आहेत. त्यातल्या पहिल्या गटाला नक्षलवादी आणि दुस-या गटाला माओवादी असं म्हटलं जातं. आजकाल दोन्हीही शब्द एकमेकांचे प्रतिशब्द म्हणून वापरले जातात पण त्यांच्यात फरक आहे. सांगण्याचा मुद्दा हा की भारतातले डावे हे प्रामुख्याने मार्क्सवादीच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम

भारतीय डावे विरुद्ध अमेरीकन लिबरल्स

विकास
Sat, 03/05/2016 - 02:33 नवीन
पण मी आधिच म्हणल्याप्रमाणे भारतात ज्या अर्थाने डावे ही कल्पना वापरली जाते ती फक्त मार्क्सवादापुरती मर्यादित नाहिये. ती एकंदर अमेरिकेत ज्या अर्थाने लिबरल ही टर्म वापरतात तशी वापरली जाते. ज्यामध्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे सर्वात महत्वाचे तत्व आहे. किंबहुना भारतात 'डावे' पेक्षा 'लिबरल' हीच टर्म वापरली जावी असं आता वाटू लागलय. भारतातले डावे लिबरल्स आहेत असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरेल. त्यासाठी आधी आपण अमेरीकन लिबरल्स आणि कॉन्झर्वेटीव्हज् मधला फरक आधी समजून घेऊयात. धर्म:
  1. अमेरीकेत लिबरल्स म्हणवणार्‍यांना स्वतःला ख्रिश्चन अथवा ज्यू म्हणवून घेताना कमी पणा वाटत नाही. किंबहूना ते धर्म हे देखील जीवनाचे अंग मानतात. फक्त ते इतर धर्मांना आणि धर्मियांना कमी लेखत नाहीत. त्याच मुळे सगळे लिबरल्स यात येत नसले तरी, युनिव्हर्सल युनिटेरीयन चर्च हा जो प्रकार आहे तो लिबरल्स चे चर्च म्हणून ओळखला जातो. पण असे अनेक लिबरल्स आहेत जे इतर प्रकारच्या चर्चेस मधे (उदा रोमन कॅथलिक, मेथॉडीस्ट आदी) तसेच ज्यूंच्या सिनॅगॉगशी संलग्न असतात आणि स्वत:ला त्या समुदायाचा भाग समजतात.
  2. लिबरल्स चे स्थानिक पातळी पासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत राज्य आले तरी त्यांना त्या त्या ठिकाणच्या अधिकृत सभा/अधिवेशने चालू करायच्या आधी प्रार्थना म्हणायला कमी पणा वाटत नाही आणि तशा ते त्या करतात.
देश
  1. अमेरीकन लिबरल्स देखील देशाला कॉन्झर्वेटीव्हज इतकेच मानतात. त्याच्या सीमा राखण्यासाठी ते देखील कमी नसतात. म्हणूनच ९/११ नंतरच्या इराक युद्धाच्या वेळेस त्यांना (अमेरिकन काँग्रेसला) जी गोपनियतेत माहिती देण्यात आली होती ती खरी मानून अनेक लिबरल डेमोक्रॅट्स नी त्या युद्धाला पाठींबा दर्शवला होता. ९/११ च्या ९ महीने आधीच बुश-गोअर यांची निवडणूक गाजलेली होती. बुश वरती अविश्वास होता. तरी देखील ज्यावेळेस (लिबरल) गोअरना ९/११ नंतर प्रतिक्रीया विचारली तेंव्हा त्यांनी बुश हे त्यांचे सर्वोच्च सेनापती आहे असे म्हणून त्यांना जी काही मदत हवी असेल ती विनाशर्त करण्याची तयारी दाखवली.
  2. नंतरच्या काळात गाँटोनोमो बे क्युबामधील कैद्यांसंदर्भात इथल्या लिबरल्सनी योग्य तोच आवाज केला. पण परदेशात (टेक्निकली मित्रदेशात) जाऊन ओसामाला का मारले म्हणून एकानेही प्रश्न विचारला नाही. किंबहूना तसा निर्णय घेणार्‍यात लिबरल्सच होते. आणि हो त्यांचे कौतुक करण्यात रिपब्लीकन काँडोलिजा राईस पण पुढे होत्या.
सामाजीक प्रश्न
  1. धार्मिकतेचा संदर्भ देत विज्ञान अथवा वैद्यकीय ज्ञानाला बंदी घालण्यावर आहे - त्यात सगळ्यात तापलेला मुद्दा असतो तो गर्भपाताचा, नंतर दुसरा असतो तो समलिंगी लग्नाचा ("लग्नाचा" - नुसत्या राहण्याचा नाही).
  2. आर्थिक आघाडीवर लिबरल्स राष्ट्रीय पातळीवर नुसतेच दाखवताना आणि स्थानिक पातळीवर खरेच हे प्रोटेक्टीव्ह असतात. त्यामुळे, युनियन्स त्यांच्या बाजूच्या असतात. या देशात, काहीच क्षेत्रात असेल पण, युनियन्स ना जितके महत्व आहे तितके भारतात देखील नाही असे वाटते. पण मोठ्या प्रमाणावर विचार करताना ते देखील मुक्त अर्थव्यवस्थेचाच स्विकार करतात.
  3. बंदुकांच्या राजकारणात अधिक नियंत्रण असावे असे म्हणतात. पण बंदुकांवर बंदी आणायला तयारी नसते. किंबहुना यांच्याकडे देखील बंदुका असतात...
अजून पण बरेच असतील पण तुर्तास इतकेच. आता भारतीय डावे कसे आहेत?
  1. माझ्या लेखी ते लिबरल्स नसून डाव्याविचारांचे काँझर्वेटीव्हज् आहेत! त्यांना धर्म मान्य नसतो. म्हणजे स्वतः निधर्मी असण्याबद्दल आक्षेप नाही. पण इतरांना आणि त्यातही बहुतांशी हिंदूंना, धर्मावरून कमी लेखणे अथवा पुर्वीच्या चुकीच्या प्रथा (उदा जातीयता) आणि त्यामुळे तयार झालेले प्रश्न सोडवण्याऐवजी ते पेटवत ठेवण्यात त्यांना इंटरेस्ट असतो.
  2. देशाबद्दल सगळ्याच डाव्यांना मी कमी समजणार नाही. पण स्वत:स विचारवंत म्हणवणारे जे असतात त्यांच्या बाबतीत मात्र देशाशी प्रामाणिक राहण्याबद्दल साशंकता आहे. हे स्वातंत्र्योत्तर चीनच्या युद्धापासून पहाता येईल जेंव्हा कम्युनिस्ट पक्षाचे दोन तट पडले. देशातली हिंसा थांबवण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो. म्हणूनच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नक्षलवाद्यांसारख्या चळवळी जागृत ठेवण्यात हे पुढे असतात. ह्यांना विकास (डेव्हलपमेंट) त्यांच्या मताप्रमाणेच हवा असतो. असे कुठलेच वर्तन अमेरीकन लिबरल्सच्या बाबतीत दिसणार नाही...
  3. बाकी सामाजीक प्रश्नात वर आणलेले दोन प्रमुख प्रश्नः गर्भपातावर आपल्याकडे बंदी नाही असे मला वाटते आणि त्याला बहुसंख्य असलेल्या हिंदू धर्माचा विरोध देखील नाही. त्यामुळे तो मुद्दाच येत नाही. दुसरा मुद्दा समलिंगी लग्नाचा आहे. त्यासाठी सगळ्या लिबरल्सची पण मानसिकता तयार झाली असेल असे वाटत नाही. आणि भले असली तरी केवळ त्या एका मुद्या मुळे भारतीय डावे काही अमेरीकन लिबरल्सशी समान दिसणारे ठरत नाहीत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम

EPW

बोका-ए-आझम
Sat, 03/05/2016 - 10:01 नवीन
च्या दोन लागोपाठच्या अंकांत एकाच अमेरिकेला आणि अमेरिकन सरकारच्या त्याच धोरणांना Neoliberal आणि Neoconservative अशा दोन परस्परविरोधी संज्ञा वापरल्या गेल्या होत्या. हा काय प्रकार आहे हे कोणी स्पष्ट करु शकेल का? एकच धोरण liberal आणि conservative कसं काय असू शकेल? हे दोन परस्परविरोधी शब्द आहेत असा समज होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

बोकाजी आणि विकासजी दोघांना

गुलाम
Sat, 03/05/2016 - 13:44 नवीन
बोकाजी आणि विकासजी दोघांना एकत्र प्रतिसाद देतोय. बोकाजी, जेएनयु प्रकरणात किंवा एरव्हीदेखील आपल्याकडे 'डावे' ही टर्म खुपच लूझली वापरली जाते. त्यामुळे युक्रांद, अंनिस सारख्या सामाजिक संघटना आणि रिपब्लिकन पार्टी, आप, काँग्रेस सारख्या राजकीय संघटना देखील डाव्या मानल्या जातात. अनिल अवचट, कुमार सप्तर्षी, प्रकाश आमटे किंवा अगदी नारायण मुर्ती सुध्दा स्वतःला डावे म्हणवून घेतात. ते चुक की बरोबर तो भाग वेगळा. पण हे सगळे मार्क्सवादी नक्कीच नाहित. आणि म्हणूनच सगळ्या डाव्यांना सरसकट देशद्रोही, हिंदूविरोधी किंवा व्यवस्था तोडणारे ठरवलं जाऊ नये एव्हढंच माझं म्हणणं आहे. विकासजी, आपण जो अमेरिकन लिबरल्स आणि भारतीय डाव्यांमधला फरक सांगितला आहे तो बहुतांशी मान्यच आहे. पण तो फरक एकंदरच अमेरिकन आणि भारतीय राजकारणातील मॅच्युरिटी आणि समज यांमध्ये आहे. किबहुना त्याचमुळे आपल्याकडे कन्हैयाला ताबडतोब देशद्रोही ठरवलं जातं तर अमेरिकेत अ‍ॅपलने दहशतवाद्याचा फोन क्रॅक करुन दिला नाही तरी त्याचं कौतुक होतं. शेवटी आपले आणि तिथले सामाजिक प्रश्न पण वेगळे आहेत. तुम्ही वर गर्भपाताचा मुद्दा मांडला आहे. तो प्रश्न जरी आपल्याकडे नसला तरी व्यापक अर्थाने धार्मिकतेला विज्ञानापेक्षा महत्व देणे आहेच. अगदीच उदाहरण द्यायचे झाले तर शनी शिंगणापूर किंवा शबरीमला प्रकरण, गोहत्याबंदी वगैरे घेता येईल. त्यांना विरोध करणारे बहुतांशी लोक स्वतःला डावे म्हणवून घेणारेच असतात. विचारांचा पराभव त्याच्या अनुयायांकडुनच होतो याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे भारतात स्वतःला डावे म्हणवून घेणारे "काही" लोक. अशा लोकांनी धर्मनिरपेक्षता जेवढी बदनाम केली आहे तेवढी तर संघानेही केली नसेल असं मी नेहमी म्हणतो. या लोकांमुळेच सामान्य हिंदूधर्माभिमानी त्यांच्यापासून फटकून राहतो आणि संपुर्ण चळवळीचंच नुकसान होतं. त्यासाठी त्यांच्यावर टीका करणं ठीकच. परंतु, आपण एखादी विचारसरणी मान्य करताना किंवा ती त्याज्य ठरवताना अशा स्वार्थी लो़कांकडे बघुन करु नये. संपुर्ण विचारसरणीवर टिका करण्याऐवजी त्यातल्या निवडक स्वार्थी प्रवृत्तींवर टिका करावी आणि जे शेवटी संपुर्ण समाजाच्या हिताचे आहे ते घ्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

धन्यवाद

विकास
Sat, 03/05/2016 - 18:54 नवीन
सर्वप्रथम माझे उत्तर हे भारतातले डावे हे अमेरीकतल्या लिबरल्स सारखे कसे नाहीत या एका विषयासंदर्भात होते. कोणतीच बाजू पूर्ण बरोबर अथवा चूक आहे असे मी कधी म्हणणार नाही. मात्र डावा नसल्याने, एखादी डावी भुमिका योग्य वाटली अथवा व्यक्ती आदर्श वाटली तर तसे म्हणताना कमीपणा वाटणार नाही. मात्र असे मोकळेपण हे डाव्यांकडून कधी दिसू शकणार नाही. समोरचा उजवा असेल तर तो कसा अडाणी, मोदी भक्त वगैरे सहज चालू होऊ शकेल... त्यामुळे सगळ वातावरण गढूळ झाले आहे असे माझे म्हणणे आहे. वास्तवीक ही उपचर्चा वेगळा विषय होऊ शकेल. पण येथेच काही उत्तरे देतो - मते मांडतो... अनिल अवचट, कुमार सप्तर्षी, प्रकाश आमटे किंवा अगदी नारायण मुर्ती सुध्दा स्वतःला डावे म्हणवून घेतात. यातील अनिल अवचट आणि प्रकाश आमटे हे अमेरीकन लिबरल शब्दासाठी योग्य आहेत. नारायण मुर्ती कधीकाळी (कुठेतरी वाचल्याप्रमाणे) कम्युनिस्ट विचारसरणीशी जवळ होते फक्त रशियातील एका प्रसंगानंतर ते बदलले. सप्तर्षी आणि त्यांची युक्रांद हे मला वाटते भारतीय डाव्या विचारसरणीतलेच एक फळ आहे. ते रशिया-चीन कडे बघणारे कम्युनिस्ट नसतील पण ते अमेरीकन पद्धतीचे लिबरल आहेत असे देखील वाटत नाही... आणि म्हणूनच सगळ्या डाव्यांना सरसकट देशद्रोही, हिंदूविरोधी किंवा व्यवस्था तोडणारे ठरवलं जाऊ नये एव्हढंच माझं म्हणणं आहे. पूर्ण सहमत. मी कधी म्हणलेले देखील नाही. विशेष करून आधीच्या काळातल्या डाव्यांच्या बाबतीत मी ते नक्कीच म्हणेन. तरी देखील आज जी काही डावी नामक पिलावळ तयार झाली आहे त्यांच्या बद्दल मला असे म्हणावेसे वाटणार नाही... त्याचे विश्लेषणच करायचे झाले तर - सर्वप्रथम यांना असलेला धर्माचा तिटकारा. धर्म संकल्पना मान्य नसली तर काहीच हरकत नाही. अयोग्य रुढी-परंपरांबद्दल आवाज पण उठवणे, जागृती करणे देखील महत्वाचे. पण व्यक्ती आणि व्यक्तींनी बनलेला समाज पोकळ राहू शकत नाही. काही तरी व्यवस्था लागतेच, विचार लागतो, परंपरा देखील लागते. इथे (अमेरीकेत) अनेकदा भारतीय मुलांचे पाहीले आहे. कारणे काही असली तरी भारताबद्दल काही माहिती नसते. मग अचानक कॉलेजात गेल्यावर इतर सर्व मुले आपापल्या "रूट्स" बद्दल / परंपरांबद्दल बोलू लागली की मग लागतात शोधायला.... दुसरा भाग म्हणजे आपलीच एक पद्धती बरोबर आणि इतरांचे चूक... ते स्वत:साठी मार्केटींग म्हणून केले ठिक आहे. पण तसे देखील करत असताना समाजात स्वत:बद्दल वैषम्य आणि दुही निर्माण होऊ शकेल असे वागण्याची काय गरज आहे? केवळ उदाहरण म्हणून असे बरेच प्रसंग आहेत - टोकाचे आहे, पण जे काही महीषासूर प्रकरण सध्या चालू आहे त्या बाबतीत. एखाद्या समुदायाच्या दृष्टीने महीषासूर हिरो असेल आणि तसा असला म्हणून देखील काही हरकत नाही. पण त्याला समजून घेऊन "दुर्गा पूजक" न करता देखील बरेच काही करता येऊ शकेल. त्यासाठी दुर्गेला आणि दुर्गापुजकांना वाईट करण्याची आणि समाजात नसलेली दुही तयार करण्याची काय गरज? दक्षिणेत रावणाला मानणारे आहेत, त्यावर सिरिअल्स देखील काढल्या गेल्या... तुम्ही करा तसे काही. उगाच असंतोष कशाला तयार करता? त्या मागचा उद्देश काय? तेच नक्षलवादा बद्दल आणि अर्थातच काश्मीर बद्दल... तो प्रश्न जरी आपल्याकडे नसला तरी व्यापक अर्थाने धार्मिकतेला विज्ञानापेक्षा महत्व देणे आहेच. पूर्ण सहमत आणि त्यातील अंधश्रद्धा दूर करण्याला पण सहमतीच आहे. पण परत एक अमेरीका -भारतातील फरक सांगतो. अमेरीकेत धर्मासाठी कायद्याने चुकीचे संरक्षण देऊन विज्ञानाला कमी लेखणे महत्वाचे करणे झाले आहे. सुदैवाने तसे भारतात झालेले नाही... जे झाले आहे ते विशेष करून ७० ते ९० च्या दशकातल्या राजकारणामुळे झालेले आहे. आज जे आपण बघत आहोत ती त्याची फळे आहेत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा