लान्स नाइक हनमंतआप्पा यांना विनम्र श्रद्धांजली.
पस्तीस फूट बर्फाला आपल्या छाताडावर झेलून तब्बल सहा दिवस मृत्युशी झुंज दिलेला लढवय्या अशीच ओळख १९ मद्रास रेजिमेंटच्या ह्या बहादुर सैनिकाची कायम भारतीयांच्या मनात राहिल. लान्सनाईक हनमंतआप्पा आज आपल्या देशवासियांसमोर कर्तव्य आणि जबाबदारीचं अतुल्य असं उदाहरण ठेवून गेलेत.
कर्नाटक राज्यातल्या धारवाड जिल्ह्यातलं बेटादुर हे गाव आज भारतमातेच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या शुरवीराचं गाव म्हणून ओळखलं जाईल. ह्या शेती करणार्या गावातून आजवर सहा जणांनी सैन्यात आपली कामगिरी बजावली आहे. एका शेतकरी घरातून आलेल्या लान्सनाईक हनमंतआप्पा ह्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन वर्षाची चिमुरडी आहेत.
कुटुंबात सर्वात लहान असलेल्या हनमंतआप्पांचे केवळ सैन्यात भरती व्हायचे स्वप्न होते. अतिशय खडतर अश्या परिस्थितीतून तावून सुलाखून निघत, आपल्या गावापासून सहा किलोमीटरवर असलेल्या शाळेत रोज पायी जात-येत त्यांनी शिक्षण घेतले. सैन्य भरतीमध्ये सतत तीन वेळा अपयश येऊनही निराश न होता, जिद्द न हरता त्यांनी प्रयत्न चालूच ठेवले. चौदा वर्षांपूर्वी ह्याच जिद्दीच्या जोरावर अखेर त्यांना १९ मद्रास रेजीमेंटमध्ये नियुक्ती मिळाली. ही जिद्दच शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत कायम होती.
चार वर्षांआधीच त्यांचे लग्न महादेवी यांयाशी झाले, त्यांना दोन वर्षांची एक मुलगीही आहे जिचे नाव त्यांनी नेत्रा ठेवले. सहाच महिन्याआधी आपल्या गावी त्यांचा दौरा झाला होता. आपल्या कमाईच्या पैशातून गावात त्यांनी स्वतःचे घरही बांधले आहे.
हिमस्खलन होण्याच्या अगदी एक दिवस आधीच त्यांनी आपल्या घरच्यांना संपर्क करून सर्वांची ख्यालीखुशाली विचारली होती.
सियाचेन च्या अमानवी वातावरणात, अत्यंत कठिण परिस्थितीत, कायम अलर्ट राहणे हे जगाच्या पाठीवर फक्त आपली सेना करू शकते. हे शक्य होते ते फक्त लान्स नाईक हनमंतआप्पांसारख्या जिगरबाज वीरांमुळे. ही धरती, हे आकाश, इथले पाणी, गवताच्या पात्याचा असलेला, नसलेला प्रत्येक कण अन् कण, प्रत्येक भारतीयाचं तन आणि मन ह्या वीरांचे चंद्र-सूर्य असे पर्यंत ऋणी राहील. अशा पोलादी छातीच्या वीरांमुळे आपण सुरक्षित आहोत ही भावना सदैव मनात असणे ह्यापेक्षा जास्त परतफेड आपण सामान्य जनता करूच शकत नाही.
ह्या दुर्दवी अपघातात शहिद झालेल्या सर्व दहा भारतीय सैनिकांची नावे व पत्ते. (नावांच्या उच्चाराबद्दल खात्री नसल्याने ईंग्रजीच ठेवली आहेत)

- Subedar Nagesha TT r/o vill Tejur, Hassan Dist, Karnataka.
- Havildar Elumalai M r/o vill Dukkam Parai, Vellore Dist, Tamil Nadu.
- Lance Havildar S Kumar r/o vill Kumanan Thozhu, Teni Dist, Tamil Nadu.
- Lance Naik Sudheesh B r/o vill Monroethuruth, Kollam Dist, Kerala.
- Lance Naik Hanamanthappa Koppad r/o vill Betadur, Dharwad Dist, Karnataka.
- Sepoy Mahesha PN r/o vill HD Kote, Mysore Dist, Karnataka.
- Sepoy Ganesan G r/o village Chokkathevan Patti, Madurai Dist, Tamil Nadu.
- Sepoy Rama Moorthy N r/o vill Gudisatana Palli, Krishna Giri Dist, Tamil Nadu.
- Sep Mustaq Ahmed S r/o vill Parnapalle, Kurnool Dist, Andhra Pradesh.
- Sepoy Nursing Assistant Suryawanshi SV r/o village Maskarwadi, Satara Dist, Maharashtra
प्रतिक्रिया
काही तरी चमत्कार होईल आणि
भावपूर्ण श्रद्धांजली!
_/\_
.
काय बोलावं?
काल हे वाचून खूप वाईट वाटलं..
-^-
श्रद्धांजली
हुतात्म्यांना श्रद्धांजली!
Pagination