नवीन सल्लागार व व्यवस्थापक

Primary tabs

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
26 Jan 2016 - 1:27 pm

नमस्कार,
सर्व मिपाकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभकामना. आज मिसळपाव संबंधीत दोन महत्वाच्या घोषणा करीत आहोत. काही मिपाकरांचे खाते शिस्तभंगामुळे काही काळासाठी गोठवले होते त्यांची खाती आज पुन्हा सक्रिय करीत आहोत.

मिपाच्या सल्लागार मंडळात यापुढे प्रा.डॉ. दिलीप बिरूटे, पैसा, आणि आनंदयात्री सहभागी होत आहेत. यांच्या मार्गदर्शनाचा मिपाला आता पर्यंत फायदा झालाय. यापुढील काळात यांच्या सहकार्याने मिपाची प्रगती होईल अशी आशा आहे.

यापुढील सहा महिन्यांसाठी मिपाच्या व्यवस्थापनाचे सर्व अधिकार प्रशांत यांचेकडे असतील. मिपाच्या संबंधीत कुठलाही व्यवस्थापकीय, धोरणात्मक निर्णय प्रशांत घेतील. नीलकांत येत्या सहा महिन्यांसाठी कामातून रजा घेतोय.

- नीलकांत

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

26 Jan 2016 - 1:38 pm | प्रभाकर पेठकर

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व पदाधिकार्‍यांना शुभेच्छा!

नविन माहिती बद्दल धन्यवाद.

मी-सौरभ's picture

27 Jan 2016 - 11:54 pm | मी-सौरभ

- त्यांचा स्वघोषित पुतण्या

सौरभ

प्रचेतस's picture

26 Jan 2016 - 1:40 pm | प्रचेतस

नवीन सल्लागार व व्यवस्थापकांचे अभिनंदन.
सदस्यांना परत घेतल्याचा सर्वाधिक आनंद.

नाखु's picture

27 Jan 2016 - 10:27 am | नाखु

अगदी मनातले.

वल्ली मनकवडे आहेत काय याची चौकशी करणे आले.

सर्वांना कायम सहकार्य आहे आणि राहिलही..

आनंदीत नाखु

सस्नेह's picture

27 Jan 2016 - 11:27 am | सस्नेह

असेच म्हणते

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jan 2016 - 8:18 am | अत्रुप्त आत्मा

+३

परिकथेतील राजकुमार's picture

2 Feb 2016 - 9:42 pm | परिकथेतील राजकुमार

सदस्यांना परत घेतल्याचा सर्वाधिक आनंद.

ह्याच्याशी पण सहमत.

दुरावा संपून जवळीक निर्माण झाली हे महत्त्वाचे.

आता लवकरच खरडवही आणि व्यनी ह्यांच्यातील अंतर देखील 'पूर्वीसारखेच' मिटेल अशी आशा करतो.

मृगनयनी's picture

1 Apr 2016 - 9:00 pm | मृगनयनी

ओह्ह... परा....नको नको रे असं "अन्तर" मिटवायला सांगूस्स!!!... आता कुम्पणानेच्च शेत खाल्लं, तर आम्ही पामरांनी कुणाच्या तोन्डाकडे बघायचं? आणि आमची प्रायव्हसी मग आता "प्रायव्हसी" उरणारच नाही रे!
अर्रे.. असं अन्तर मिटलं, तर आपण पूर्वी सारख्या व्यनि'तून गुलुगुलु गप्पा कश्या मारणार? आणि आपले सिक्रेट्स कसे शेअर करणार? श्शी बाब्बा.... आता की नै, आप्ल्याला कोड लैन्ग्वैज मध्येच्च्च्च खरडावं लागणार्र!!!!!
;)

सर्वसाक्षी's picture

26 Jan 2016 - 1:44 pm | सर्वसाक्षी

सल्लागार व व्यवस्थापक यांचे अभिनंदन व त्यांना हार्दिक शुभेच्छा

गामा पैलवान's picture

26 Jan 2016 - 1:47 pm | गामा पैलवान

गोठवलेली खाती पुनश्च ऊन केल्याबद्दल नीलकांत यांचे आभार. नवीन सल्लागार मंडळास शुभेच्छा.
-गा.पै.

संदीप डांगे's picture

26 Jan 2016 - 1:51 pm | संदीप डांगे

+१

नवीन सल्लागारांचे अभिनंदन .

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jan 2016 - 1:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व नवीन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन !

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jan 2016 - 2:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

परत मूळ प्रवाहात सामील झालेल्या सर्व सभासदांचे स्वागत !

उगा काहितरीच's picture

26 Jan 2016 - 2:04 pm | उगा काहितरीच

अभिनंदन !

नाव आडनाव's picture

26 Jan 2016 - 2:04 pm | नाव आडनाव

... त्यांची खाती आज पुन्हा सक्रिय करीत आहोत
क्या बात! भेलकम बॅक :)
सल्लागार आणि व्यवस्थापकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

अजूनही गोठवलेल्या खात्यांपैकी एक / दोन जणांचं प्रोफाईल चेक केल्या नंतर "You are not authorized to access this page." असा मेसेज येतोय. कोणकोणत्या सदस्यांचं खातं सक्रीय झालंय?

नाव आडनाव's picture

27 Jan 2016 - 9:57 am | नाव आडनाव

आता सक्रीय झालेले दिसत आहेत आयडी.

नाव आडनाव's picture

26 Jan 2016 - 2:05 pm | नाव आडनाव

... त्यांची खाती आज पुन्हा सक्रिय करीत आहोत
क्या बात! भेलकम बॅक :)
सल्लागार आणि व्यवस्थापकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

चांदणे संदीप's picture

26 Jan 2016 - 2:06 pm | चांदणे संदीप

व्यवस्थापक व सल्लागार मंडळाला शुभेच्छा!

गोठवलेले आयडी वितळवल्याबद्दल धन्यवाद! नवीन रसधारा त्यातून प्रवाहित व्हाव्यात हीच इच्छा!!

धन्यवाद,
Sandy

जव्हेरगंज's picture

26 Jan 2016 - 2:06 pm | जव्हेरगंज

सल्लागार मंडळांचे नक्की कार्यक्षेत्र काय असते?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2016 - 3:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एका जिल्ह्यातील तालुक्यांचा आणि त्यांच्या हद्दीतील नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कारभारावर लक्ष ठेवायचं आणि जिल्हाधिका-यांनी अहवाल मागितला की बंद लिफाफ्यात अहवाल सादर करायचा. नागरिकांना काय सोयी सुविधा द्यायच्या, नवीन योजना राबवायच्या असल्यास मतं व्यक्त करणे, विचारल्यास तड़ीपार करणा-यांची नावं सांगणे, काहींवर चाप्टर केस दाखल करण्याची शिफारस करणे, थोडक्यात तालुका आणि गावपातळीवर चांगल वातावरण कसं राहील हे पाहणे, काही विचारल्यास सल्ला देणे. अजुन बरंच काही. प्रसंग पडल्यास डबल ब्यारलचा उपयोग करणे. इ. इ. खरं तर हाती शस्त्र न घेता युक्तीच्या चार गोष्टी सांगणे हे सल्लागाराचं काम असतं.
-दिलीप बिरुटे
(सल्ला देऊन गार करणारा ) :)

यशोधरा's picture

26 Jan 2016 - 2:28 pm | यशोधरा

नवीन सल्लागार व व्यवस्थापकांचे अभिनंदन.
सदस्यांना परत घेतल्याचे वाचून आनंद झाला.

पद्मावति's picture

26 Jan 2016 - 2:51 pm | पद्मावति

अरे वाह, मस्तं. अभिनंदन आणि शुभेच्छा.

मारवा's picture

26 Jan 2016 - 2:52 pm | मारवा

गोठवलेली नेमकी कोणत्या सभासदाची खाती वितळवण्यात आली कृपया त्यांची नावे द्य्वावीत बरे होइल.
बॅटमॅन यांचे ही त्यात नाव आहे का ?

टवाळ कार्टा's picture

26 Jan 2016 - 3:04 pm | टवाळ कार्टा

:)

अस्वस्थामा's picture

26 Jan 2016 - 3:21 pm | अस्वस्थामा

और शैतान (फिरसे) जाग उठा..!! ;)

टवाळ कार्टा's picture

26 Jan 2016 - 4:16 pm | टवाळ कार्टा

अरे ए :)

सतिश गावडे's picture

26 Jan 2016 - 5:37 pm | सतिश गावडे

टक्या, मधल्या काळात कोणत्या आयडीने यायचास?

अस्वस्थामा's picture

26 Jan 2016 - 6:15 pm | अस्वस्थामा

तो दुसरा आयडी खूपच शांत होता पण. ;)
बादवे, त्ये दमामि बेणं पण नै दिसलं मधल्या काळात.! परत येणारे का आता मग ?

टवाळ कार्टा's picture

26 Jan 2016 - 6:31 pm | टवाळ कार्टा

खिक्क....त्ये शिक्रेट है

पिलीयन रायडर's picture

26 Jan 2016 - 3:02 pm | पिलीयन रायडर

Somehow had feeling that today banned members will come back.
Good News! Welcome Back!

टका आणि बॅट्याला वेलकम बॅक!

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्या.
नवीन सल्लागार व व्यवस्थापकांचे अभिनंदन

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Jan 2016 - 3:34 pm | कैलासवासी सोन्याबापु

सल्लागार मंडळाला शुभेच्छा अन जुन्या खेळाडुंस वेलकम बॅक

आदूबाळ's picture

26 Jan 2016 - 3:38 pm | आदूबाळ

आले का आले परत आले? किधर हय वह लोग?

तर्राट जोकर's picture

26 Jan 2016 - 4:06 pm | तर्राट जोकर

मिसळपाव प्रशासनास धन्यवाद...

सर्व सदस्यांना प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुबेच्छा!

अनन्न्या's picture

26 Jan 2016 - 4:31 pm | अनन्न्या

आणि शुभेच्छा!

स्वाती दिनेश's picture

26 Jan 2016 - 5:01 pm | स्वाती दिनेश

अभिनंदन आणि शुभेच्छा!
स्वाती

किसन शिंदे's picture

26 Jan 2016 - 7:13 pm | किसन शिंदे

नवनियुक्त सल्लागारांचे अभिनंदन आणि प्रशांतला काटेरी मुकूटासाठी शुभेच्छा!

स्रुजा's picture

26 Jan 2016 - 7:34 pm | स्रुजा

सल्लागारांचे आणि नवीन व्यवस्थापकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !

टका आणि बॅटमन , वेलकम बॅक.

नूतन सावंत's picture

26 Jan 2016 - 7:36 pm | नूतन सावंत

नव्या पदाधिकारी मंडळाचे आभिनंदन.
जुन्या सदस्यांचे नव्याने स्वागत.

सतिश गावडे's picture

26 Jan 2016 - 7:57 pm | सतिश गावडे

सर्व मिपाकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभकामना. सल्लागारांचे अभिनंदन. !!!

आता आमचे सरसुद्धा पुन्हा एकदा लिहिते होणार तर. बॅटमन सर हो.

मितभाषी's picture

26 Jan 2016 - 9:22 pm | मितभाषी

माइ मोड ऑन.
हल्ली ज्योती व दिलीप चा दंगा खुपच वाढला होता. आता नविन जबाबदारी मुळे दोघांनाही दंगामस्ती करता येणार नाही असे आमचे 'हे'म्हणाले.
माइ मोड ऑफ.

सतिश गावडे's picture

26 Jan 2016 - 9:45 pm | सतिश गावडे

कोण ज्योती व दिलीप? धन्यवाद.

पैसा's picture

26 Jan 2016 - 10:19 pm | पैसा

अग्ग मायडे, अग्ग लब्बाडे, कुठे लपली आहेस? तू आल्याशिवाय खरा दंगा कसा सुरू होणार?

श्रीरंग_जोशी's picture

26 Jan 2016 - 9:35 pm | श्रीरंग_जोशी

नवनियुक्त सल्लागार व व्यवस्थापकांचे त्यांच्या नव्या भूमिकेत स्वागत आहे.

परतलेल्या मिपाकरांचेही स्वागत आहे. या प्रकारची कारवाई करण्याची वेळ कमीत कमी वेळा व्यवस्थापनावर येवो ही सदिच्छा!!

अत्रन्गि पाउस's picture

26 Jan 2016 - 10:09 pm | अत्रन्गि पाउस

स्वागत आनंद शुभेच्छा

पैसा's picture

26 Jan 2016 - 10:22 pm | पैसा

नीलकांत आणि इतर मित्र मैत्रिणींना धन्यवाद! प्रशांतला भरपूर शुभेच्छा!

आनंदयात्री's picture

3 Feb 2016 - 2:02 pm | आनंदयात्री

सर्व शुभेछुकांचे आभार.