नवीन सल्लागार व व्यवस्थापक
नमस्कार,
सर्व मिपाकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभकामना. आज मिसळपाव संबंधीत दोन महत्वाच्या घोषणा करीत आहोत. काही मिपाकरांचे खाते शिस्तभंगामुळे काही काळासाठी गोठवले होते त्यांची खाती आज पुन्हा सक्रिय करीत आहोत.
मिपाच्या सल्लागार मंडळात यापुढे प्रा.डॉ. दिलीप बिरूटे, पैसा, आणि आनंदयात्री सहभागी होत आहेत. यांच्या मार्गदर्शनाचा मिपाला आता पर्यंत फायदा झालाय. यापुढील काळात यांच्या सहकार्याने मिपाची प्रगती होईल अशी आशा आहे.
यापुढील सहा महिन्यांसाठी मिपाच्या व्यवस्थापनाचे सर्व अधिकार प्रशांत यांचेकडे असतील. मिपाच्या संबंधीत कुठलाही व्यवस्थापकीय, धोरणात्मक निर्णय प्रशांत घेतील. नीलकांत येत्या सहा महिन्यांसाठी कामातून रजा घेतोय.
- नीलकांत
आणि परत आलेल्यांचे स्वागत!
नव्या पदाधिकारी मंडळाचे आभिनंदन.
आमचा परम मित्र ब्याट्या, टक्या आणि विमे, संजयजी क्षीरसागर यांच्या आयडीवरील बंदी काढली. बरे वाटले.
ते परत येऊन जुन्याच हिरीरीने लिहायला लागले तर जास्त आनंद होईल. टक्या काय दबा धरुन बसला होता, तो लगीच आला आहे. ब्याट्या, विमे अन संजयजी(जुन्या आयडीने) लवकर यावेत ही इच्छा
धन्यवाद नीलकांत आणि प्रशांत मालक.
प्राडॉसर, लक्ष असू द्या हो. ;)
टार्याचे काय झाले
नवीन व्यवस्थापक आमि जन्या सल्लागार मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
धन्यवाद निलकांत
नीलकांत धन्स. (माझा मोकळा वावर बघवेना वाटतं ;) ) प्रशांतला खुप खुप शुभेच्छा. सहा महिन्यात मिपावर जे जे प्रयोग करायचे स्वप्न असतील ते ते पूर्ण करून घे.....!
शुभेच्छाबद्दल आभार दोस्त हो ! मिपा मुख्य बोर्डावर उत्तम आणि सर्वच विषय गुण्या गोविंदाने नांदावेत यासाठी मिपा सदस्यांबरोबर असेन. मिपा मुख्य बोर्ड हा मिपाचा प्राण आहे. मिपाहिताचाच विचार करेन आणि मिपाहितासाठी उत्तम सल्लागार म्हणून काम करेन अशी ग्वाही देतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. सर्वांचे मन:पूर्वक आभार.
-दिलीप बिरुटे
नवीन व्यवस्थापक आणि सल्लागार मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
नवीन व्यवस्थापक आणि सल्लागार मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा. परत आलेल्या मिपाकरांचे स्वागत.
मिपा व्यवस्थापनाला सहकार्य होते आणी यापुढेही राहीलच.
नवीन व्यवस्थापक आणि सल्लागार मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
सल्लागारांचे अभिनंदन, व्यवस्थापकांचे आभार!!
नवीन व्यवस्थापक आणि सल्लागार मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
सगळया पदाधिकार्यांना मनपुर्वक शुभेच्छा
अरे वा!
सर्वांना शुभेच्छा!
अभिनंदन आणी शुभेच्छा!
नवीन सल्लागार मंडळ व व्यवस्थापकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!!
नवीन व्यवस्थापक आणि सल्लागार मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी ठरवू शकत नाही पण माझ्या वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. याबाबत आपले काही मार्गदर्शन मिळेल का? मला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे असते हे माहीत आहे. मला खरेच त्यांची कीव...कीव येते.कुठलाही माणूस असे दुर्गंधीयुक्त विचार घेऊन मोठा होत नसतो.
नवीन व्यवस्थापकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !