Skip to main content

दुलई

लेखक सुमेध रानडे यांनी बुधवार, 20/01/2016 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक दुलई ठेवलीये जपून थंडीच्या कपड्यांच्या बोळक्यात, येते तिची आठवण मधनंच साऱ्या आठवणींच्या घोळक्यात. त्या दुलईच्या मायेतंच मला झोप गवसली होती, गाढ झोपेतून उठून लहानपणी मी तिला लाळही पुसली होती. मऊशार उबदार मखमली तिचा स्पर्श, तिने अगदी सहज टिपलय माझ्या वाढत्या वयाचं वर्ष! माझ्यासवे ऐकल्यायेत तिने कितीतरी गोष्टी आणि, कितीदातरी लपवलंय माझ्या डोळ्यातलं पाणी! सकाळ झाली की गुंडाळून फेकून द्यायचो कोपऱ्यात, आणि रात्री मात्र त्याच कोपऱ्यातून काढायचो तिला तोऱ्यात. खुपसलं असेल, लाथाडलं असेल नको असेल तशी, पण माझ्या कित्येक आठवणींना दिली तिने कुशी! परवाच आई म्हणाली तू पांघर तीच दुलई, शोध शोध शोधली पण मिळाली नाही कुठेही. झालो थोडा कासावीस पोटात काहीशी ढवळाढवळ, घरभर शोधलं आणि सापडली माझ्याच उशीजवळ. माझ्या अश्रूंच्या खुणांना तिने अजूनही जपलंय, माझ्या लहानपणीचे मूल तिच्यात आजही लपलंय! निरागस स्वप्न मनाला तिच्याखालीच पडलंय, आणि त्या स्वप्नात रंगतानाचं हास्यही तिथेच दडलंय! ती थंडी, ती रात्र, ते हास्य, ते स्वप्न, या एकाच दुलईत गुंडाळण्याचा माझा भाबडा प्रयत्न... या दुलईत डोळेही आपोआप मिटू लागतात, आणि माझ्या हाताशीच असतात आईबाबांचे हात!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2541
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

दोन दिवस झाले थंडीच्या नं दुलई च्या भाईरच निंगालो नाई त्याच्च्यानं काई बोल्याले चान्संच भेटला नाई. बाकी दुलईनं मस्तं गरमी आनली सुमेधभाऊ.बढिया

मस्तच