Skip to main content

असा रेहमान परत होणे नाही!

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 06/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण १९९२ चा नोव्हेंबर-डिसेंबर असावा छान थंडी, पुण्यातली... मोडेल कॉलोनी मध्ये... मित्राच्या घरी... मोठ्या टेरेस वर सगळे जमलेले, बर्थडे पार्टी... धमाल मस्ती संगीतखुर्ची केक आवाज मित्र गर्दी आणि मी हळूच एका कोपऱ्यात ह्या सर्व मोह मायेतुन ज़रा वेगळा... तो संगीत खुर्चीचा 'चित्त थरारक' कार्यक्रम संपल्यावर गाण्यांकड़े दुर्लक्ष करत मुलं आणि त्यांचे पालक आपआपलं उदरम भरणम करण्यात मग्न होते, पण मी वेगळा... त्या छोट्या टेपरेकॉर्डर पाशी, माझी छोटीशी हो हो तोच तो दिवस! दिल है छोटासा... छोटीसी आशा रोजा जानेमन, भारत हमको... रुक्मिणी रुक्मिणी... ये हसी वादियाँ... A साइड संपली की B... असा माझा कार्यक्रम चालू होता माझा 'साइड बाय साइड' ती मेग्नासौन्डची कस्सेट.. अजुन ही आठवते! तेव्ह्हा रहमान कोण वगैरे काही माहीत नव्हतं! पण जी काय जादू... जो काय 'साउंड' होता त्या रोजा मध्ये! स्वर्गीय!!! पुढे बॉम्बे, हम से है मुकाबला च्या वेळी रेहमानचा रेहमान साहेब झालेला, सुरभी वगैरे मध्ये त्याची मुलाखत वगैरे म्हणजे... जिंकलच हो! आयुष्यात २ पुस्तकच मनापासून आणि पूर्ण वाचली आहेत.. सचिन आणि रेहमान, सचिनला पाहून आणि रहमानला ऐकून शाळेत्ले नंतर कॉलेजचे दिवस... आता अजूनही सचिन संपला पण रेहमान... नाही तो अखंड असतो कानात, डोक्यात, ह्रुदयात, नसानसात रेहमान! त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल मला बोलणं, किव्वा एकणं कधीच आवडलं नाही... तो हिंदू होता मग मुस्लिम धर्मं का स्वीकारला, हाच विषय लोकं खरडून काढतात, मग त्याची एकच शैली आहे... तोच तोच पणा जाणवतो, इस बार मजा नहीं आया, क्या तेरा रेहमान... आजकल नहीं जमता उसको! असं ऐकलं की माझी सटकतेच! माझा रेहमान हां माझ्या पुरता मर्यादीत आहे! त्यानी काहीही केलं ते मला मनापासून आवडतं, मी वेडा आहे म्हणलात तरी चालेल कारण मी आहेच रेहमान वेडा, आणि मी एकटाच नाहीये... माझे खुप असे मित्र आहेत की त्यांचा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे रेहमान! मंदार बिडकर आणि मी... मित्र झालो जीवाभावाचे! कारण फ़क्त रेहमान! गाणं होतं 'गोपाला गोपाला'... तो गोपाला अजुनही तसाच कानात घुमतो! आमच्या अनमोल भावेनी आपल्या मुलीचं नाव ठेवले अरमान... आता का ते विचारलात तर मेलोडी खाओ खुद जान जाओ! माझ्या एका मित्रानं स्वतःचं टोपणनांव अमितचंद्रन् केलं, कारण काय तर रेहमान साउथचा! आमचा ग्रुप आहे रहमानिया नावाचा... रेहमानची गाणी ती पण लाइव परफॉर्म करणं म्हणजे... म्हणजे... नाही हो नाही, नाहीच उपमा देता येत! महा कठीण पेक्षा ही पुढचं काही असतं असा प्रकार! असो... साहेबांचा मुळ प्रवास सुरु झाला रेडियो टीव्ही जिंगल्स, मग तमिळ चित्रपट.. नंतर हिंदी आता इंटरनेशनल... म्हणतात ना संगीताला भाषा नसते! तसच... तमीळ मधले .०१% शब्द माहीत असले तरी, सर्व गाणी चाली आणि बारकाव्यासह ह्या मानवी ज्युक्बोक्स मध्ये कैद आहेत माझ्या! अमुक अमुक गाण्यात ३ऱ्या मिनिटाला हा ठेका ऐक्लास का तू, किव्वा सुरुवातीला अमुक अमुक जी ट्यून आहे तशीच त्याने अमुक अमुक गाण्यात वापरली आहे, अश्या अखंड बारकाव्यांची देवाण घेवाण आमच्या रेहमान वेड्या जगात चालू असते! त्याचा पुढील कार्यक्रम कधी आहे, त्याचे नवीन चित्रपट कधी येणारे, त्याच्याकड़े कुठलं नवीन वाद्य आलय... अश्या विषयांची रेलचेल whtsapp ग्रुप वर अखंड चालू असते! त्याच्या एफबी आणि ट्विटर पेजच्या अपडेट्स साठी सगळे आतुर असतात! रेहमान बद्दलचा आदर अजुनच वाढतो जेव्हा त्याच्या शांत आणि मृदु व्यक्तिमात्वाचे किस्से जेव्हा वारंवार ऐकायला मिळतात... कधीही कुठल्याही वादग्रस्त प्रकरणात त्याचा सहभाग नसतो! तो संगीतानी उत्तर देतो... जसा सचिन बैंटिंग करून द्यायचा! त्याच्या संगीतानी तो आम्हाला घडवातो सावरतो आनंदीत करतो! दु:खात सुख दाखवतो... तो देव आहे आमच्यासाठी! पूर्वी पेक्षा सध्या कॉम्पिटीशन वाढल्ये... शेवटी हे स्पर्धा जगच! शंकर एहसान लोय, इलाय्यराजा, अमित त्रिवेदी, सलीम सुलेमान, जातीन ललित, प्रीतम, शांतनु मोइत्रा, विशाल शेखर आणि अजुन काही संगीत दिग्दर्शक जबरदस्त काम करत आलेत... काही अजुन करतायत, पण रेहमान आणि इतर हे गणित आहे आपलं! मला कोणी रेहमानच्या गाण्यांची तारीफ़ करताना ऐकलं की इतका आनंद होतो! की मग त्या माणसाला रेहमानची इतर गाणी कशी अजुन चांगली आहेत, मग ती ऐकवण्यात अणि स्वतः मंत्रमुग्ध होऊन ऐकण्यात जो काही परमानंद मिळतो त्याची स्वर्गाशीच तुलना! त्याचं सर्वात आवडणारं गाणं विचारलत तर... त्यासरखा खोल विषय माझासाठी अजुन कुठलाच नाही, तरी त्यातल्या त्यात on loop वाले काही ट्रैक्स आहेत, उदाहणार्थ... कभी ना कभी मधलं - तुम हो मेरी निगाहों पे छाए न्यूयॉर्क नगरम / बोम्बे ट्यून / मौसम एंड इस्केप - स्लम डॉग मिल्लीनिअर / शब्बा शब्बा - दौड़ / मांगता है क्या - रंगीला / स्वदेस / देस की मिटटी - बोस / दो कदम और सही - मिनाक्षी / ये हसी वादिया - रोजा / तू बोले.. - जाने तू या जाने ना / ऐसे ना देखो - रांझणा / रेहना तू... - डेल्ही6 ही लिस्ट वाढतच जाइल... आता थांबतो! मी थांबलो तरी चालेल... पण हा माणूस नं थांबो त्याच्याकडून त्याच्या भक्तांना... अखंड अमृतमयी संगीत-श्रीखंड लाभत राहो! असा रेहमान परत होणे नाही, आम्ही परख्ला... आता तुमची बारी... रेहमानजी! तुम्हारी अदाओं पे मै वारी वारी... मै वारी वारी! तुम्हारी अदाओं पे मै वारी वारी... मै वारी वारी! A.R.Rahman #सशुश्रीके
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14703
प्रतिक्रिया 68

प्रतिक्रिया

मस्त लिखाण !! तुमची रेहमान भक्ती दिसून येते आहे.
असा रेहमान परत होणे नाही!
अनुमोदन !!

छान लेख . यावरुन "मुंबे वा अंबे वा" - सुल्लान ओरु कादल , "थोट्टा नी मलरुम" - न्यू ,"इन्न सुल्ल पोगिरा" - कुंडकोंडन कुंडकोंडन , "स्वासमे स्वासमे" - तेनाली , "मिल गये मिल गये दिलवर मेरे" - लव्हबर्डस अशा अनेक रेहमानच्या गाण्यांची आठवण झाली . अलिकडेच लिंगा या सिनेमामध्ये "मोना मोना गॅसोलीना" असा अचाट गाण्याचा प्रकार रहमानच करू जाणे.

छान

२ गाणी मी कितीही वेळा ऐकू शकतो. ये हसी वादियां अन् ये जो देस है तेरा बाकी भक्ती केली की ते श्रद्धास्थान होतं, मग त्याच्याकडून काही चुकूच शकत नाही, असं मत आपोआप बनतं. मग ते श्रद्धास्थान रेहमान असो, वा आईवडील वा शिवाजी वा राम वा गांधी वा मोदी

रहमान ने बाँबे चित्रपटात " हम्मा हम्मा " गाण्यात एकेठिकाणी स्केल चेंज केली आहे. ती ऐकायला एकदं धमाल येते

संपूर्ण लेखाशी बाडीस... ये हंसी वादीयाची सुरुवात माझ्या फोनची रिंगटोन होती तब्ब्ल पाच वर्ष अखंड. खास एडिट करून घेतली होती. माझ्या कुठ्ल्याही वेळेच्या प्लेलिस्ट मधे ८०% रहमानच असतो. त्याच्यासारखी शांतता नाही. एक रहमान दुसरा रफी... सुकून पाने के लिये बस ये दो ही है काफी!!!

दिल से सिनेमातली सगळीच्या सगळी गाणी संगीत बॉलीवुडमधला एक मेजर माईलस्टोन आहे! - (रेहमानभक्त) सोकाजी

In reply to by संदीप डांगे

सोत्रि, अगदी बाडीस. दिल से सिनेमामधलं प्रत्येक गाणं हे सोलो (कोरस सोदुन) आहे. हि स्पेश्ल्टी आहे त्याची.

गेल्या २७ तारखेलाच आयुष्यात प्रथमच रहमान यांचे संगीत याची देही याची डोळा अनुभवता आले. बाकी रंगीला या सिनेमाच्या गाण्यांचा उल्लेख आढळला नाही, हाय रामा हे गाण निव्वळ अप्रतिम

फक्त " होणे नाही " यावरुन मी सगळ्या बातम्या वाचल्या. मग लक्षात आल की अस काहीही झाल नाही. माझा गैरसमज झाला.

In reply to by नितीनचंद्र

माझंही असंच झालं अगदी सेम... मग जीव भांड्यात पडला. पण जरा रेहमानसाहेबांनी आता सब्बाथ घेऊन नव्या संगीताच्या शोधात निघावे असे वाटते. आजकाल म्हणजे गेल्या दोनेक वर्षात खास टच नाही जाणवत, भिडत नाही हृदयाला पुर्वीच्या गाण्यांसारखे. ठिकठाक आहे. अपेक्षांचे ओझे जाणवत असेल कदाचित.

In reply to by नितीनचंद्र

होना मीही टरकलो. :( (च्यायला आपल्याला कसं माहीत नाही इथपर्यन्त आलो होतो मी) -दिलीप बिरुटे -

छान लेख...रेहेमान खरच एकमेव.... रोजा ची पारायणे केलीत... बाकी >>आता अजूनही सचिन संपला >>> यासाठी निषेध

खर आहे. ज्याला प्रतिभा किंवा नवनिर्मीती म्हणाव ते अस हुकमी नसत. मग बरेच वेळा पारंपारीक चाली पुनरुज्जीवीत केल्या जातात. काही वेळा काहीच नाही सापडल की मग लोकगीत त्याच्या मुळ चालीसकट येतात. सिनेमातर ठराविक वेळीच रिलीझ व्हावा लागतो ना. नाहीतर लाखाचे बारा हजार. श्रीनिवास खळे किंवा बाबुजी सारखे आयुष्यभर नाविन्याने देणारे मोजकेच.

सगळ वाचलं पन लिष्ट मधी बक्कळ पैसं मोजुन बनवुन घेतलेल्या 'यारो इंडीया बुला लीया' का काय ते, त्या गाण्याचं काय नाव नाय दिसलं गड्या

माझ्याच भावना वाचल्यासारख्या वाटल्या....हायवे मधील सर्व गाणी खूपच सुरेख...माही वे ऐकताना आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आल्याशिवाय रहात नाही. मणिरत्नम च्या नवीन मुव्हीतील मेन्ट्ल मनधील आणि कारा अटकारा अप्रतिम.

लेख चांगला आहे! फक्त.... आंधळ्याला आंधळा म्हणू नये किंवा पांगळ्याला पांगळा म्हणू नये त्या चालीवर....(अर्थात बाकी कोण आंधळे किंवा पांगळे नाहीत!) रेहमानशिवाय इतर कोण आवडत असणार्यांना "फक्त रेहमान'च' चांगला, बाकी कोण नाही" असे म्हणू नये, एवढीच इच्छा! बाकी, मलाही रेहमान आवडतो! तुमचा लेख वाचून लगेच "ये हसीन वादियां" लावलो बगा! :) धन्यवाद, Sandy

In reply to by चांदणे संदीप

सँडीभाय, ऐसा कोन बोल्या रे! "बाकी कोन नाय" चा नारा लावणारे अभागी बंधू अस्तात, त्यांजकडे दुर्लक्ष करणे...!

सुंदर लेख. रेहेमान एक अप्रतिम संगीतकार आहेत. त्यान्ची लगान आणि स्वदेस मधील गाणी मला खूप खूप आवड्तात. तसेच कून फाया कून हे रोकस्टार मधील गाणे हे एक पवित्र सूफीगीत आहे.

रेहमानच्या गाण्या बद्दल एक गोष्ट मला फार आवडते. ती म्हणजे त्याच्या प्रत्येक गाण्यात एकदम छोटे छोटे आणि वेग-वेगळ्या प्रकारचे आवाज ऐकायला मिळतात. जे ऐकायला फ़ार फार मस्त वाटत. रेहमान हां रेहमानच. शंकर एहसान लोय, इलाय्यराजा, अमित त्रिवेदी, सलीम सुलेमान, जातीन ललित, प्रीतम, शांतनु मोइत्रा, विशाल शेखर आणि अजुन काही संगीत दिग्दर्शक जबरदस्त काम करत आलेत... ह्या यादीत विशाल शेखर आणि प्रीतम? णीषेढ.

रहमान च्या गाण्यात एक मात्र आढळते. शब्दांकडे फारच दुर्लक्श्य केले जाते. कदाचित तो त्याचा दोष नसावा. पण रहमानची गाणी ही फोर ट्रॅक साउंड वर ऐकायला मजा येते. "मधुबन मे जो कन्हैया किसी गोपी से मिले" या गाण्यात ब्याक्ग्राउंडला कोकीळेचा आवाज दिलाय तो ऐकायला हेडफोन किंवा कार स्टीरीओच हवा. पण एकदा ऐकले की तृप्तीच्या पलीकडे पोहोचल्याचे फील येते

In reply to by विजुभाऊ

उदाहरण: छैय्या छैय्या गाणं... गुलजार यांचं नितांत सुंदर गीत.

मला तर अजय-अतुल चे ''अप्सरा आली'' व ''माउली-माउली''' एकताना, रहमानची कोपी केली की काय ? असे वाटलेल.

In reply to by पगला गजोधर

मला तर अजय-अतुल चे ''अप्सरा आली'' व ''माउली-माउली''' एकताना, रहमानची कोपी केली की काय ? असे वाटलेल. खरचं!

फारच सुंदर लेख! रेहमानने मायकेल जॅक्सनच्या काही गाण्यांवर केलेले fusion तेदेखील raw , ऐकण्याचे परमभाग्य मला मिळाले आहे.तो अल्बम आला की नाही माहित नाही.

In reply to by अविनाशकुलकर्णी

हा कट्टर बाटगा आहे..गिता म्हणण्यास त्याने नकार दिल्याचे वाचले.......
बरं मग? तुम्ही 'कुराण' वाचता का रोज? त्यानी एकदा हिंदू धर्म सोडल्यावर त्यानी गीता वाचावी ही अपेक्षा का?

हे चित्रपट रेहमानच्या संगीताशिवाय अपुर्णच, बरेच सिनेमांची तर ओळखच रेहमानचे संगीत आहे एक वेळ चित्रपट विस्मरणात जाईल पण रेहमानचे संगीत नाही. १ ऱोजा ***** २ बॉम्बे ***** ३ रंगिला ***** ४ दिल से ***** ५ ताल ***** ६ लगान ***** ७ साथिया ***** ८ स्वदेस ***** ९ रंग दे बसंती**** १० दिल्ली ६ ***** ११ जोधा अकबर ***** १२ रॉकस्टार *****

रेहमानशी निगडीत बर्याच आठवणी आहेत माझ्याही. त्याने संगीत दिलेले ताल, लगान, साथिया माझ्या यादीत सर्वात वर आहेत.

मस्त लेख.. रहमानचे संगीत मलासुद्धा खुप आवडते. नवीन रॉकस्टारची गाणी फक्त रहमानसाठी आवडली होती.

वंदे मातरम कसं आठवत नाही कुणाला, आपल्याला तर फार्फार आवडतं बुवा !

निषेध १. - "सचिन संपला ?" निषेध २. - "हाय रामा यह क्या हुआ" - वगळून पुढे लिहिणे आपणास कसे शक्य झाले ?

In reply to by एस.योगी

मस्त लिखाण. पिक्चर पहाताना लगान मधले पहिल्यांदा झनन झनन ऐकले तेव्हाची समाधि अवस्था अजून आठवते . एस। योगी .अगदी बरोबर . दोन्ही निषेध .

सशुश्रीके - एक छोटी सुचना आहे. तुमचा लेख चांगला आहे पण त्याचे टायटल हे एखाद्या मृत्युलेखासारखे वाटते ( मला तरी ). कोणी मोठा माणुस गेल्यावर असे वाक्य वापरलेले दिसते. पटत असले तर बदला.

रेहमानच्या गाण्याबद्दल मला एक मोठा आक्षेप आहे की त्याला हिंदीचा वा उर्दूचा गंधही नाही. त्यामुळे आपल्या गाण्यात कुठले शब्द वापरले जात आहेत ह्याबद्दल त्याला काहीही सोयरसुतक नाही. मारून, ठोकून जे मिळतील ते शब्द बसवून बनवलेले संगीत हे आत्मा हरवलेल्या माणसाप्रमाणे वाटते. जुरासिक पार्क काय, टेक्सस काय, स्ट्रॉबेरीजैसी आखे काय, पिकासोकी पेंटिंग काय. कशाचा कशाला पत्ता नाही! ओपी नय्यर एकदा म्हणाला की गीताचे बोल हे माणसाच्या आत्म्यासारखे आहेत, संगीत हे त्याच्या शरीरासारखे आणि आवाज हे कपड्यासारखे. चांगला माणूस निव्वऴ कपडे वा निव्वळ शरीराने बनत नाही तर आत्मा शरीर आणि कपडे तिन्ही आवश्यक आहेत. एक यशस्वी संगीतकार भाषेला, शब्दाला इतके महत्त्व देतो हे लक्षात घेण्याजोगे आहे. https://www.youtube.com/watch?v=6POHWxS1_Wk

In reply to by हुप्प्या

जुरासिक पार्क काय, टेक्सस काय, स्ट्रॉबेरीजैसी आखे काय, पिकासोकी पेंटिंग काय. कशाचा कशाला पत्ता नाही! >>> हे शब्द रेहमानने लिहिले आहेत काय? त्याने तमिळ चित्रपटातील तमीळ गाण्याला संगीत दिलंय (जे खरंच भारीये, तुमच्या हिन्दी-उर्दूचा गंध असणार्‍या अन्नू मलिकने या चालीची चोरी केली आहे... दोनदा!!). कोणीतरी त्याचं तद्दन भ्रष्ट व छपरी हिन्दी रुपांतर केलंय, मग त्यात रेहमान चु़कीचा? (सिनेमात भौतेकवेळा चाल आधी बांधली जाते व नंतर त्याला अनुसरून शब्द रचले जातात, हेसुद्धा दुर्लक्षित केले तरी चालेल) एनी वे.. हिन्दी-उर्दू भाषेचा सुरेख उपयोग केलेली काही गाणी पटकन डोळ्यांसमोर आली. मधुबनमें जो कन्हैय्या किसी गोपीसे मिले, राधा कैसे न जले.. छैय्या छैय्या / दिल से रे ये जो देस है तेरा/पल पल है भारी/सांवरिया सांवरिया रुत आ गयी रे मुझे रंग दे/बुंदोंसे बातें खामोशियां गुनगुनाने लगी लुक्का छुपी बहुत हुई जश्न-ए-बहारा . .. ... असो !

In reply to by तुषार काळभोर

आपल्या गाण्यात काय शब्द वापरले जात आहेत ह्याचे सोयरसुतक रेहमानला नसते. उत्तम संगीतकाराला ते असते. अन्नु मलिक हा उत्तम संगीतकार माझ्या लेखी तरी नाही. त्यामुळे त्याच्याशी तुलना अप्रस्तुत आहे. ओ पी नय्यर सारखा संगीतकार असता तर त्याने असले शब्द खपवून घेतले नसते ह्याची खात्री आहे.

In reply to by हुप्प्या

बेस्ट लिरिक्स फिल्म्फेअर अ‍ॅवॉर्डस Gulzar -Chaiyya Chaiyya" 1999 ,Music A R Rahman Anand Bakshi – "Ishq Bina 2000 ,Music A R Rahman Javed Akhtar – "Radha Kaise Naa Jale 2002 ,Music A R Rahman Gulzar – "Saathiya" from Saathiya 2003 ,Music A R Rahman Javed Akhtar – "Jashn-E-Bahara 2009,Music A R Rahman Irshad Kamil – "Nadaan Parindey" 2012 ,Music A R Rahman Gulzar – "Challa" 2013,Music A R Rahman Irshad Kamil – "Agar Tum Saath Ho" 2016,Music A R Rahman

In reply to by हुप्प्या

कै च्या कै. रेहमान भौ च्या कुठल्या गाण्यात हे शब्द आलेत हे जरा बघनार काय. माझ्या मते ही गाणी सौथींडियन सलिमाचे हिंदीतले रूपांतर असावे. ज्याची ताल जशीच्या तशी ठेवायचा प्रयत्न केला जातो. बाकी रेहमान सहेबांचे संगीत ऐकावे. बस. रफ़ी साब और रेहमान साहब का पंखा बाबा योगीराज.

रेहमानचे संगीत मला कळत नाही, याचे फार दु:ख वाटले. आमची धाव फक्त, हुस्नलाल-भगतराम, अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, सी. रामचंद्र, मदनमोहन, रोशन, जयदेव, बर्मन पितापुत्र, रविंद्र जैन, सोनिक-ओमी, नौशाद, नाशाद, सज्जाद इ. पुढे कधी गेलीच नाही! रेहमान म्हटले की आम्हाला फक्त केसांचा कोंबडा राखणारा नट आणि आमची आवडती वहिदाच डोळ्यांसमोर येते.

प्रसाद १९७१ यांची सूचना एकदम रास्त .सशुश्रीके शीर्षक तेव्हडं बदला बुवा.अर्थाऐवजी अनर्थ ध्वनीत होतोय हो.

तिमा जी नौषाद ला तुमच्या लिष्टात सोम्या गोम्यानंतर शेवटाकडनं तिसर्या लंबराला ठिवलंत हे बरं नव्हं. हे तर काईच नव्हं,ओपीला अन सलील चौधरी, हेंमतदाना आमी इ.मध्धे पकडायचं व्हय तुमची लिष्ट सुदरव्हावी ही इनंती

In reply to by दिवाकर कुलकर्णी

आमच्या लिस्टीत जे जुने संगीतकार न्हाईत ते आम्हाला आवडत नाहीत असं आमी म्हनलं नै. रहिमानी संगीत समजत न्हाई हीच व्यथा हाय.

रहमान सारखा रहमानच. एक रोमेश कालुविथरना सोडला तर रहमानसारखा कोणी नाही .

झुबैदा य सिनेमाचा उल्लेख अजुनहि आला नाही.

स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सर्ट चं पार्श्वसंगीत?

रेहमान यांनी इलियाराजा यांच्याकडे संगित क्षेत्राची सुरूवात केली आहे, बाकी युवा चित्रपटापासुन कर्णमधुर संगीतापासुन थोडा दर्जा बदलला आहे. नहीं सामने, किंवा डोली सजाके रखना,सपने चा फिल येत नाही, गुलज़ार यांच्यापेक्षा इरषाद कामील यांची रचना क्लिष्ट आहे समजायला. * कुन फाया कुन, ख्वाजा मेरे ख्वाजा , बोल सजनी श्रवणीय आहेत

रेहेमान अफलातून आहे पण सध्या तो सुफी मोड मधून बाहेर येत नाही आहे . पूर्वी रेहेमान चे संगीत म्हणून सिनेमा पाहायचो मला आठवत आहे ताल ची गाणी ऐकून ऐकून तो सिनेमा पहिला ,गाण्यासाठी अक्षय खन्ना ला सहन केले आता रेहेमान ची गाणी येतात आणि जातात सिनेमा पडतो थोडा बहुत चालतो रेहेमान चा सुरवातीला आदरयुक्त दबदबा होता तो आता संपला आहे लेखात त्याला ऑस्कर मिळवून देणाऱ्या जय हो चा जयघोष झाला नाही साथिया चा उल्लेख झाला नाही जोधा अकबर पेक्ष्या बाजीराव मस्तानी चे संगीत चालले तू नळीवर जाऊन त्यांच्या लाईकस पाहता सहज कळून येतो मधल्या काळात मोह मोह के धागे गाणे ऐकले त्या आधी विलन मधील गाणी ऐकली आता रेहमान कानावर पडला नाही तरी खटकत नाही आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.

लुक्का छुपी - रंग दे बसंती. काय सुंदर गायलय हे गान. लता दीदी आणि रेहमान साहेब, वा. छोटीसी आशा - रोजा तमिल आणि रोजा हिंदी-(१९९२). दोन्ही गाणी एकाच गाईकेनि गायली आहेत. MINMINI अस काहिस नाव आहे. दोन्ही गाणी एक मस्त आहेत. एकदम मूड फ्रेश झाला पाहिजे. हाय रामा - रंगीला(१९९५) हरिहरन आणि सुवर्णलता. जबरदस्त गान आहे हे. जिया जले - दिल से (१९९८) लता दीदी आणि एम् जी श्रीकुमार. बोल सजनी मोरी - सजनी डोली सजाके रखना(१९९) सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ति. नहीं सामने - ताल(१९९९) हरिहरन आणि सुखविंदर सिंग. खामोश रात - तक्षक (१९९९) रूप कुमार राठौड़. ऐ नाझनिन सुनो ना - दिल ही दिल में (१९९९) अभिजीत. हा बाबा अज्जीबात आवडत नाही, परंतु हे गाण मात्र आवडल. सुनता है मेरा खुदा - पुकार (१९९९). उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ति. हे फ़ार म्हणजे फ़ार आवडत. धीमी धीमी - झुबैदा (२०००) कविता कृष्णमूर्ति. चुपके से - साथिया (२००२) साधना सरगम , मुर्तुझा आणि कदीर. राधा कैसे ना जले - लगान(२००१) आशा भोसले,उदित नारायण आणि वैशाली. ये रिश्ता क्या केहलाता है - मीनाक्षी (२००४) रीना भारद्वाज. कभी नीम नीम - युवा (२००४) रेहमान साहेब आणि मधुश्री. ये जो देस है तेरा - स्वदेश (२००४) रेहमान साहेब. हम है इस पल यहाँ - किसना (२००४) उदित नारायण आणि मधुश्री. तेरे बिना - गुरु(२००६) रेहमान साहेब, मुर्तुझा खान, कदीर खान आणि चिन्मयी. इन लम्हों के दामन में - जोधा अकबर (२००८) सोनु निगम आणि मधुश्री. अजून ही बरीच गाणी आहेत. ही फक्त काही गाणी आहेत. सम्पूर्ण यादि आंजा वर आहे. http://rahmanfanatic.blogspot.in/2008/06/complete-track-list-of-ar-rahm…

माझ्याकडे रहमान चे संगीत असलेल्या पण त्यावेळी कमी परिचीत दुनिया दिलवालों की, प्रियंका, चोर चोर, डयुएट या मुवीजच्या कॅसेट्स होत्या

In reply to by श्रीरंग_जोशी

हो, गाण्याची सुरुवात बहुतेक प्यार कभी ना तोडेंगे, साथ कभी ना छोडेंगे अशी आहे. खालील दुव्यावर गाणी मिळतील. http://www.hindimp3online.com/ar-rahman-music-collection.php?page=2

In reply to by संदीप डांगे

माननीय संपादक. प्रस्तुत लिन्क उडवावी. ती गाण्याची डाऊनलोड लिन्क आहे हे नंतर लक्षात आले. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

या काळातले लव्ह बर्ड्स चित्रपटातले प्रभुदेवा अन अपाची इंडियन यांच्यावर चित्रित झालेले नो प्रॉब्लेम गाणे आठवले. त्यातल्या नो प्रॉब्लेम शब्दांच्या जागेवर आम्ही शेन थॉम्पसन म्हणत असू. १९९६ विश्वचषकात त्याने आमीर सोहेलचा जो झेल घेतला होता त्याला त्या चषकातल्या सर्वोत्कृष्ट झेलाचा पुरस्कार मिळाला होता.