✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुढाऱ्याचे प्रेम

स — सप्तरंगी, Mon, 01/04/2016 - 20:33
प्रेम या थिम वर एक गद्य-पद्य लिहायचे होते त्यात मी ' पुढाऱ्याचे प्रेम ' वर लिहायचे ठरवले. एक पुढारी आपल्या नाराज झालेल्या बायकोला कसे मनवेल ते बघूया: अशी का ग प्रिये तू गरम तव्यावर राहतेस तुझी माझी कायमची युती मग कशाला उगाच झेंडे फडकवतेस जरा मूड मध्ये आलीस कि जशी पक्षाला मिळतेस आनि थोडी येउन बिलगलीस कि मला खुर्चीवानी वाटतेस..... माझ्याशिवाय तू जशी अपक्ष उमेदवार नाही विरोधी पक्षात मान तुला तू तर फुटलेला आमदार….. शिक्शान मंत्री करू कि वट लाऊ direct Home-Minister पदासाठी तू फाकिस्त बोल आहे हे सरकार कायमच आपल्या पाठी सारे मिळून खाऊ गुमान पुरवीन तुझ्या साऱ्या demand जरी मी सामान्य कार्यकर्ता असशीलच कि तू Hi-Command….. प्रचंड मतांनी निवडून केलेस मला 'खास'दार आणीबाणी जाहीर करून का चालणार आहे हा आपला संसार.... वेळ नाही आपल्याला तुला मनवायला फार पार्टी चा विचार-विन्मय करायचा आहे आमच्य्वारच तर भार...... टिकून असलो आम्ही जरी power नाही बक्कळ मला काय....सरकारला पण तर लागते कायम बाईचीच शक्कल जरी करशील बंडखोरी तरी एकवार घेईन मी पक्षात मात्र आलीस जर आपले सरकार कोसळायच्या आत !

प्रतिक्रिया द्या
1257 वाचन

💬 प्रतिसाद (2)

:-) छान आहे.

एस
Tue, 01/05/2016 - 15:47 नवीन
:-) छान आहे.
  • Log in or register to post comments

एस, प्रतिसादाबद्दल आभार :)

सप्तरंगी
Tue, 01/05/2016 - 18:19 नवीन
एस, प्रतिसादाबद्दल आभार :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा