आपल्या देशात सरकारी जाहिराती कशा असतात आपण जाणता !
२०१४ मधे काही घटना अशा घडल्या त्यामुळे पुरुष नसबंदी या विषयाची चर्चा जोर धरू लागली आहे.
छत्तीसगड
आपल्या देशात विज्ञान लोकांपर्यंत नीटपणे पोचावे यासाठी कष्ट घेतले जाताना दिसत नाहीत. त्यामुळे त्याबद्दलचे अज्ञान हे फक्त खेड्यापुरते मर्यादित नसून ते सर्वव्यापी आहे. अनेक गोष्टींचा सरकारी पातळीवरून प्रचार व्हायला लागतो. त्यावेळी त्याच्या हेतुबद्दलच शंका यायला सुरुवात होते. टिव्हीवरून आयोडाइज्ड मीठाच्या जाहिराती येऊ लागल्या तेव्हाही रास्तपणे ही शंका बोलली जाऊ लागली होती. अनेक डॉक्टरांच्या मते आयोडाइज्ड मीठाची आवश्यकता नाही त्यामुळे सक्ती नको. भारतात खरंच 'खेंगा होता है' ही वस्तुस्थिती आहे का. की यामागे कोणती लॉबी कार्यरत आहे. आयोडाइज्ड मीठ बनवणार्या कंपन्यांच्या नावांवर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे या सगळ्या साबण उत्पादक कंपन्याही आहेत. साबण बनवताना बाय प्रॉडक्ट म्हणून तयार झालेले आयोडाइज्ड मीठ कसे खपवावे असा प्रश्न त्यांच्या समोर होता का अशी शंका येते आणि तसे असेल तर मग सरकारने आयोडाइज्ड मीठाच्या जाहिरातीची जबाबदारी का उचलावी. सरकारी जाहिरातीत वरवर लोककल्याण आतून धनदांडक्यांचे हित असा तर प्रकार नाही ना ! हेल्मेटसक्ती देखील जनतेच्या हितासाठी की हेल्मेट विक्रेते आणि उत्पादकांच्या हितासाठी आहे असा प्रश्न पडतो.
सरकारी पातळीवरच्या जाहिराती केवळ कुठलातरी प्रचार करणार्या, आग्रह धरणार्या असतात. लोकशिक्षण मात्र केले जात नाही. लोकांचे एखाद्या बाबतीत लोकशिक्षण करावे. हित अहित याची जाणीव त्यांना करून द्यावी. पण निर्णय मात्र त्यांचा त्यांनाच घेऊ द्यावा. सरकारी प्रचार सुरु झाला की नुसता धो धो रतीब घातला जातो. रेडियोवरून जाहिरात, टिव्हीवरून जाहिरात. हे पुरेसे नाही म्हणून भिंती रंगवल्या जातात, घाटातले दगडही सरकारी प्रचाराने भरवून टाकले जातात. एक या दो बस्स. छोटा परिवार सुखी परिवार. अगदी रेशनकार्डावरची पानेही याच संदेशाने भरलेली असायची पूर्वी. पण सतत कानीकपाळी तीच तीच गोष्ट पहायला मिळाल्यावर त्यातले गांभीर्य हरवते आणि 'हम दो हमारे दो' याचे विडंबन हम पांच हमारे पच्चीस वगैरे ऐकायला मिळू लागते. थोडक्यात सरकारी पातळीवरून प्रचाराचा एवढा मारा होतो की सत्य काय आणि तथ्य काय याचा विचार करायला सवडच दिली जात नाही. जनतेची अक्षरशः वैचारीक भंबेरी उडवली जाते.
कुटूंब नियोजन या गोष्टीचा आपल्याकडे प्रचंड प्रचार झाला. यासाठी बक्षिसेही ठेवली गेली. मुलाचा आग्रह कशाला असं म्हणून एक मुलगी असताना कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली तर इतके इनाम, दोन मुली असताना कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली तर तितके इनाम वगैरे. लोकशिक्षण मात्र बाजूलाच. एखाद्या खेड्यातला बाजाराचा दिवस असतो. या दिवशी त्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातली लोकंही येतात. अशा वेळी तिथे सरकारी जीप प्रचार करत उभी असते. ही जीपही अनेक घोषणांनी रंगवलेली असते. यातली एक घोषणा "तांबी बसवा पाळणा लांबवा" सगळ्या घोषणा इतक्या शालीन शब्दांमधे लपेटल्या जातात की काही विचारू नका. अगदी लहान मुलांनाही या ओळी तोंडपाठ असतात. मुलांमधे अंतर हवं. एक मूल चालू लागले की दुसर्याचा विचार इत्यादि. या सरकारी जाहिरात करणार्यांना कवी तरी कुठून मिळतात कुणास ठाऊक. या उपायांमधले नेमके शास्त्र काय आहे. तंत्रज्ञान काय आहे हे लोकांपर्यंत पोचवलेच जात नाही. त्यामुळे जे लोक या उपायांसाठी डॉक्टरांकडे पोचतात ते एखाद्या मांत्रिकावर विश्वास ठेवावा तसाच डॉक्टरवर विश्वास ठेवतात. त्या उपायांमागे असलेले शास्त्र पेशंटलाही धडपणे माहीत नसते. डॉक्टरही त्याची नीट कल्पना देतात का हा मोठ्ठा प्रश्न आहे. उदा. खेड्यापाड्यापर्यंत तांबी हा शब्द पोचला आहे. ती कशासाठी हेही जुजबीपणे माहीत असते पण त्यातले नेमके शास्त्र जनतेला माहीत नसते. त्यामुळे जादुई चिरागप्रमाणे गरजूंनी कुटूंब नियोजन उपायांवर विश्वास ठेवावा ही अपेक्षा असते. अनेकदा तर उपायांचे दुष्परीणाम त्यांच्या असफलतेचे आकडे हे जनतेपर्यंत पोचवलेच जात नाहीत.
इम्जेक्शन घ्या
छत्तीसगडमधे २०१४ मधे दुर्घटना घडली. महिलांच्या कुटूंब नियोजन शिबिरात काही महिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी पुरुष नसबंदीची चर्चा होती. कुटूंब नियोजनाची जबाबदारी महिलांनीच का घ्यावी. पुरुषांसाठी कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया महिलांहून अत्यंत सुलभ असताना त्यांनीच ही जबाबदारी का घेऊ नये. हा प्रश्न विचारला जात होता. पूर्वी टिव्हीवर पुरुष नसबंदीची जाहिरात येत असे. एक जण दवाखान्यातून बाहेर येतो आणि म्हणतो. "मी करून घेतली शस्त्रक्रिया, अजून माझा जोम आणि जोश कायम आहे" मग तो दंड फुगवून दंडातली बेटकुळी दाखवतो. पण ही जाहिरात करताना असफलतेचे आकडे सांगितले जात नाहीत. या शस्त्रक्रियेचे परिणाम कायमस्वरूपाचे असतात. पुन्हा मागे पूर्वस्थितीला जायला वाव नसतो. हे कुणालाच माहीत नसते. म्हणूनच सरकारने फक्त प्रचार न करता आणि आग्रह न धरता लोकशिक्षणावर भर द्यावा. जनतेला जनतेचा निर्णय घेण्याएवढे शहाणे करून सोडावे.
वर्गीकरण
वाचने
3699
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
तांबी वगैरे ६५ सालातली.एक
"गप्पी मासे पाळा हिवताप टाळा"
@"गप्पी मासे पाळा हिवताप टाळा
In reply to "गप्पी मासे पाळा हिवताप टाळा" by सतिश गावडे
:)
In reply to @"गप्पी मासे पाळा हिवताप टाळा by अत्रुप्त आत्मा
साखर मीठ पाणी
In reply to @"गप्पी मासे पाळा हिवताप टाळा by अत्रुप्त आत्मा
असो!!!
इतर गोष्टीं विषयी माहित नाही, मात्र .........
सहमत
In reply to इतर गोष्टीं विषयी माहित नाही, मात्र ......... by सौन्दर्य
पाणी गाळा, नारु टाळा. हे
छत्तीसगड मृत्यू आणि सत्य
पुरुष नसबंदी या विषयावरही
In reply to छत्तीसगड मृत्यू आणि सत्य by सुबोध खरे
साबण बनवताना बाय प्रॉडक्ट
साबणाचं माहीत नाही, पण सोडा
In reply to साबण बनवताना बाय प्रॉडक्ट by सुबोध खरे
साहेब
In reply to साबणाचं माहीत नाही, पण सोडा by आदूबाळ
आपल्या इथे शौचालयाची पण
हेल्मेट हवेच.
एका घाटात बघण्यात आलेली पाटी;
=))
In reply to एका घाटात बघण्यात आलेली पाटी; by ऋतुराज चित्रे