Skip to main content

मास्तर

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 27/12/2015 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतून निघायला त्याला आज उशिरच झालेला. बसच्या गर्दीत स्वतःला घुसवत कसबसा घरी पोहचला. तिन वर्षाचा चिमुकला तापाने फनफनलेला. बायको घाबरुण गेलेली. मिठाच्या पाण्यात पट्टया भिजवुन डोक्यावर ठेवत होती. पण ताप कमी होइणा. तो आल्या आल्याच चिमुकल्याला दुपट्यात गुंडाळून दवाखान्यात घेऊन निघाला. बायकोला रडु अवरेना. डॉक्टरने रक्त तपासायला सांगितले. अर्ध्या तासाने रिपोर्ट आला. पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या. डॉक्टरांनी तिन दिवस एडमिट करायला सांगितले. चिमुकल्या हाताला सलायन लावली. ति ओल्या फडक्याने त्याचं अंग पुसत होती. तो तिथेच डोक्याला हात लावुन बसलेला. तिच्या पोटात सकाळपासुन अन्नाचा कण नव्हता. तो दुपारी जेवालेला. रात्रि बारा एकच्या सुमारास ताप निवाला. त्यानं तिथच खाटाला डोकं लाउन उलसिक डुकला घेतला पण ति रात्रभर जागीच होती. "महा जिव लइ घाबरागुबरा हुतुय, आजच्या दिस सुटी टाका" "नाही जमनार रे. ठकीच्या लग्नाला सुट्ट्या टाकल्या. अता आज नै गेलो त् आजचा दिवस बिनपगारिच होईल" "होउद्या, जाउद्या नका जाउ" "बघतो, जमलं त् हाफ डे टाकून येतो" " पर, नगा न जाऊ आजच्या दिस" "अगं! या महिन्यात बराच खर्च झालाय. ठकिला द्यायाला टिव्ही घेतला त्याचे पैशे राहिलेत अजुन द्यायचे. अन् अता आपल्या पिलु ला बी डाक्टर तिन रोज ठोयचं म्हणले त्याचं बिल कितिक येते काय माहीत" पहाटेच घरी जाऊन अंघोळ वगैरे उरकुन, पीलुची आवडती मुगाची खिचड़ी बनवुन, ती घेऊन तो परत दवाखान्यात आला. 'लुंदी दान्स लुंदि दान्स' म्हणत अख्ख घर डोक्यावर घेणारा इवलुसा पिलु आज निपचित पडला होता. हात पाय गळून गेलेले. खोल आणि निस्तेज डोळ्यांनी तो बापाकडे पाहत होता. त्यानं पिलुच्या कपाळावर ओठ टेकले आणि निघाला. "पपा, इतच् बचाना" केविलवान्या अवाजात पिलुने विनंती केली. "माज़्या पिल्लाला नवा द्रेस् अनायचा अन दुकानात पायलेली ती लिमोट ची गाली बी अनायची" बायको कड़े आणि परत पिलुकडे पाहत "आनायची ना पिलु?" "नतो मया गाली. तु इतच थांब" पिलुने त्याचं बोट धरलं. "अहो, म्हनतय लेकरु त् थांबाना" ति मधेच बोलली. "तुला कसं समजत नहीं रे? उदया परत कही कमी जास्त झालं त् परत सुट्टी मारावी लागल. अश्या दोन दोन बीनपगारी सुट्या पर्वडनार का आपल्याला?" तो काहिश्या चिड़क्या स्वरात बोलला. ति पिलाला समजावु लागली, तो निघुन गेला. डायरेक्टर साहेबांची बारां वाजता मिटिंग असल्यामुळे, "मिटिंग संपल्यानंतर जा" असे प्राचार्यांनी सांगितले. बारां म्हणजे साहिबांना यायला दीड वाजला. आल्या आल्या ते प्राचार्यांच्या कार्यालयात घुसले. तिथे कोल्डड्रिंक्स वगैरे मागवुन झाल्यावर म्हणजे ठीक दोन वाजता साहेब निघुन गेले. मीटिंग हॉल मधे प्राचार्य आणि साहेबांचे ख़ास 'शेलार मामा' आले. "साहेबांना अर्जेंट काम आल्यामुळे जावे लागले" हे व् आणखी इकडचे तिकडचे एक दोन वाक्य बोलुन झाल्यावर मामा मूळ मुद्द्यावर आले: "पुढच्या महिन्यात आपल्या साहेबांच्या मुलाचे लग्न आहे. साहेबांनी स्वतः त्याला भेट म्हणुन 'मर्सिडीज बेंझ CLS क्लास बुक केली आहे. आपण सर्वजन एकाच कुटुंबाचे घटक आहोत तेव्हा आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे कि आपण ही फूल न फुलाची पाकळी म्हणुन काहीतरी भेट द्यावी. तेव्हा आपल्या सर्वांचा दोन दोन दिवसांचा पगार कापुन सहेबांनी पसंद केलेल्या कार च्या खरेदिला हातभार लावण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे" तो सर्वात शेवटच्या ओळित एका खुर्चीवर बसलेला. त्याचं डोकं ठनकु लागलं. भरून आलेल्या डोळ्यात चिमुकल्याचा केविलवाना चेहरा दिसु लागला. "जाऊ नका ना" म्हणत बायकोने पाय धरल्याचा त्याला भास होउ लागला. मीटिंग संपली सर्वजन बाहेर पडले तरि तो तिथेच बसुन होता. डोळे मिटवुन आणि खुर्चीला घट्ट धरून.
लेखनविषय:

वाचने 3815
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

"का लिहीतात लोक असं ? " असा विचार आला पहिले डोक्यात . नंतर विचार केला कोंबड्यावर टोपली झाकली तरी सूर्य उगवायचा रहात नाही. इतकी विदारक नाही पण काहिशी अशीच परिस्थिती एका सहकारी बँकेत पाहिली आहे.

:-(

.

जे हातपाय मारून यातून बाहेर पडले ते टिकले, ज्यांनी हातपाय गाळले ते तसेच राहिले, वाईट वाटतं पण काय करावं

:(

:(

:(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dhimmathirigae... ;) :- Srimanthudu

कथा खरच विचार करायला लावणारी आहे , विषय जरी गुरुजी असला तरी थोड्या बहुत फरकाने प्रत्येक सरकारी व सहकारी नौकरी करणार्याची परिस्थिती अशीच आहे . राहुल

त्रास झाला राव :(

_/\_

"पक्षिणी" या ह.मो.मराठेंच्या पुस्तकातल्या कथा वाचून जसा सुन्न झालो होतो तसेच काहीसे झाले हे वाचून...