शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ
शिवाजी महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक जून 1674 मध्ये करून घेतला व मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याची घोषणा केली. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना व्यापक व प्रभावी होती. त्यामुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. याप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापन केली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली. ही मंत्रीपदे वंशपरंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर व व्यक्तीचे गुणदोष पाहूनच ठरवण्यात येत. या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते.
प्रधानमंत्री (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे हे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे मंत्री. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर देखरेख ठेवणे व महाराजांच्या गैरहजेरीत राज्यकारभार सांभाळणे हे त्यांचे काम होते. प्रधानमंत्रीला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.
पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र निलकंठ हे महत्त्वाचे मंत्री असून त्यांना स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च पाहून तसेच लिहून व तपासून महाराजांसमोर सादर करणे ही कामे करावी लागत. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.
पंत सचिव (सुरनिस) : अण्णाजीपंत दत्तो. हे महत्त्वाचे मंत्री असून त्यांना सर्व जाणाऱ्या येणार्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे, शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी पाठवल्या जाणार्या आज्ञापत्रावर लक्ष ठेवणे, स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळणे तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवणे ही कामे करावी लागत. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवणे, महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे होती. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या घोडदळ व पायदळ विभागाचे सेनापती होते. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
पंत सुमंत (डाबीर) : रामचंद्र त्रिंबक यांना परराष्ट्रांना खलिते पाठविणे व आलेली घेणे, परराष्ट्रासंबंधी माहिती आणि सल्ला महाराजांना देणे आणि परराष्ट्रातील बातम्या हेरांमार्फत काढण्याचे काम होते. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी यांना दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देण्याचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
पंडीतराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथराव पंडीत यांना दानधर्म करणे, पंडीत, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमीत चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही कामे होती. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
राज्यभिषेकासाठी एवढा खर्च
नाही देऊ शकणार
.
आम्हाला सातवे पे कमिशन आता लवकरच लागू करा