चमत्कारी बाबा (कथा)
लेखनविषय (Tags)
रात्रि पोहचायला उशीर झाला म्हणुन सकाळी थोड़े जास्त झोपावे म्हटले तर मिल्याची काहीतरी शोधा शोध सुरु झाली. त्याने टीव्ही चा टेबल खर्रकण सरकावाला आणि मी उठुन बसलो.
"काय शोधतोय रे, मिल्या?"
"काय नाय, तु झोप"
त्याची सरका सरकी चालूच.
मी भिंतीला टेकुन त्याच्याकड़े पाहत बसलो.
कॉट खाली, टेबलाखाली, टीव्ही मागे, बॅग मधे पाहुन झाल्यावर त्याला काहीतरी आठवल्या सारखे झाले. त्यानं रॅक मधल्या पुस्तकांच्या सांदित हात घातला आणि एक वाळलेले लिम्बु बाहेर काढले. ते दोन वेळा कपाळाला लाऊन उजव्या खिशात ठेवले.
"हे शोधित होतो. इथल्या दर्ग्यावरच्या बाबांनी भारुण दिलय्" माझी झोपमोड़ केल्याचा खेद त्याच्या आवाजात जानवला.
मी काहीच बोललो नाही. त्याने एकदा माझ्याकडे पाहिले आणि ड्रावर मधली लाल कापडाचे कवर घातलेली वही दाखवत पुनः बोलु लागला;
"जेव्हापासून हे लिम्बु खिशात ठेवायला लागलो ना तेव्हा पासून पेशंटची रांग लागतेय. ही वही बघ. आज सहा महीने होत आलेत बाबाला भेटुन त्या तारखेपासुन बघ अकड़ा वाढतच गेलाय. बाबा दर शनिवारी नविन लिम्बु देतात अन एखादी पूजा सांगतात. तेवढी मनापासुन केली की गल्ला डबलच्"
त्याने वहिच हातात दिली. चांगली जाड्जुड़ वही गोळ्या, इंजेक्शन्, सलायनी यांच्या हिशोबानी भरत आलेली. मी उगाच पानं चाळत बसलो. बुट पायात घालुन झाल्यावर तोच म्हणाला;
"आन इकडं, आज उशीर झालाय. अंघोळ करुण ओपिडीत ये मग बोलु"
तो गेल्यावर माझी नजर छताकडे गेली. दोन कुंकवात न्हाहलेले नारळं वरती बांधलेले. मागच्या रुममधे खिड़कीला एक भली मोठी काळी भावली बांधलेली. किचन वट्यावर एक लाल कपड़ा अंथरलेला आणि त्यावर सुया खुपसलेले लिंबं टाकलेली. त्याला लावलेले हळदकुंकु डोळ्यात बसले. बाथरूमच्या खिड़कित कुंकवात रीडबीड झालेली दोन कश्याचितरि अंडी, बाजुला दोन चार काळ्या मिराच्या. मला भिती वाटायला लागली. मिल्या कसल्या पुजा करतो काही उमगेना. खोलीत कुठल्या देवाचा फोटो किंवा मूर्ति असे काहीच नव्हते. मी कसेबसे आवरले आणि दवाखान्यात येऊन बसलो. मिल्या पेशंटला सलायन लावुन माझ्या जवळ येवुन बसला.
"उद्या कितिवाजता हे इंटरव्हिव?" मिल्या.
"पत्रात दुपारी दिडचा टायमिंग दिलाय" मी.
" चल मंग सकाळी दर्ग्यावर जाऊन येवु"
गेल्या चार महिन्यात पाच सहा इंटरव्हिव दिलेले पण एकातही यश मिळाले नाही, हे मिल्याला माहित होते. म्हणुनच तो सरळ "जाऊ यया का?" न म्हणता "जाऊ" म्हणाला. त्याला नाही म्हणणे शक्य नव्हते. एकतर एवढ्या मोठ्या शहरात प्रथमच आलेलो, रहायची व्यवस्था त्याच्या रुमवर आणि त्यानं माझ्यासाठीच
उद्या काहिवेळ दवाखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला.
नंतर पूर्ण दिवसभर त्यानं मला त्या दर्ग्यावाल्या बाबाचे चमत्कारी किस्से सांगितले. माझी पण बाबाविषयीची उत्सुकता वाढली.
सकाळी लवकर उठुन त्यानं पाच लिम्बु विकत आणली.
गाड़ीवरनं आम्ही दर्ग्याला पोहोचलो तेव्हा सकाळचे सात वाजलेले.
एक भलं मोठं चिंचेचे झाड़, त्याच्याखाली बसलेले ते बाबा. आपले कष्ट बाबांना सांगुण त्यावरचा उपाय जाणुन घेण्यासाठी लोकांची मोठ्ठी लाईन लागलेली. आम्ही नंबरला लागलो. गर्दी पाहुन मला इंटरव्हिव बुडण्याची भीति वाटु लागली. एवढ्या दुर हुन इंटरव्हिवला आलो आणि तिथेच पोहचायला उशीर झाला तर? मी त्याला चल म्हणालो पण तो तयार होइना.
आमचा नंबर आला तेव्हा अकरा वाजलेले.
"बाबा, दवाखाना चालु केला तेव्हा पार वाट लागलेली पर तुम्ही भेटले आणि सगळं कसं व्यवस्थित जुळून आलं" मिल्या.
"बोला डॉक्टरसाहेब, आज काय काम काढलत?" बाबांचा घोगरा आवाज.
"बाबा, हा माझा मित्र. गावाकडुन आलाय. आज त्याचा इंटरव्हिव आहे. मागच्या काही महिन्यापासून त्याला नोकरिच लागत नाही.."
मिल्याला मधेच थांबवत बाबा बाजुच्या अगरबत्त्यांची राख कागदात बांधून, ती पुड़ी माझ्या हातात देत म्हणाले;
"या पुड़ितला अर्धा अंगारा तिथे गेल्यानंतर तुझ्या कागदपत्रात टाक आणि उरलेला पाण्यासोबत पिउन टाक. लक्षात ठेव तुझ्यात खुप दोष आहेत अंगारा पेल्यावरच यश मिळेल"
ती पुड़ी खिशात ठेऊन आम्ही निघालो. एक वाजता इंटरव्हिव च्या ठिकाणी मला सोडुन मिल्या दवाखान्यात निघुन गेला.
तिथे पोहचल्यावर नोंदणी केली आणि वेटिंग रूममधे बसलो. खोली गच्च भरलेली. धड़धड़ वाढली. सगळे उमेदवार एकचढ़ एक. मिल्याचे अर्धा एक तासात चार कॉल येऊन गेले. त्याचा कॉल रिसिव्ह करने शक्य नव्हते.
इंटरव्हिव अर्धा तास चालला. बाहेर आल्यानंतर मिल्याला खुशखबर द्यावी म्हणुन बॅगमधुन फोन काढला तर त्याचेच तब्बल अकरा मिसकॉल.
"हेलो मिल्या, काम झाले. त्यांनी डायरेक्ट उद्याच् जॉइन करायला सांगितले"
".. एक नंबर! बघ बाबाचा चमत्कार कसा हे" मिल्याने अक्षरशः किंचाळतच फोन कट केला.
दवाखान्यात गेलो तेव्हा मिल्याने चहा सांगितला.
"बघ! तुला बी अला की नाही बाबाचा अनुभव. तुला येवढुसा अंगारा प्यायला दिला अन तुझ्यातले सगळे दोष धुन काढले. उगाच येवढी गर्दी नसते दर्ग्यावर" बाबाने मिल्याला पुरता ग्रासुन टाकले होते.
मी हळुच माझ्या शर्टच्या खिशातुन बाबांनी दिलेली पुड़ी काढली आणि त्याच्या समोर ठेवली. त्याला चांगलाच धक्का बसला. तो आ वासुन माझ्याकडे पाहु लागला.
बराचवेळ दोघेही शांत होतो.
"तु हा अंगारा पिला का नाहीस?" मिल्या अवसान गळाल्या गत बोलला.
मी त्याच्या समोरची पुडी हातात घेतली.
"हे बघ मिल्या, माणसाचे मन खुप हरामखोर असते. मी आज जर का हि राख पिलो असतोना..? माझा माझ्या या मनगटावरचा विश्वास कायमचा उडुन, मुठितल्या या पुडिवर बसला असता"
प्रतिक्रिया
१ नंबर
+१००००००००......
+१
कथा आवडली
आहे
छानच कथा.
हा विषय छान हाताळताय! येउ
!
छान
छान कथा!
मस्स्त कथा आनंदभौ..
कथा आवडली.
छान
आगे बढो. चांगलं लिहिताय..
मस्त
आवडली कथा!
वा !!!. शेवटच वाक्य एकदम खरे.
------ मी आज जर का हि राख
छान कथा
मस्त कथा
मस्त. कथा आवडली!
आवड्या मेरे कु
आवडली कथा.
शेवट भयानक जबरी आवडला!!
#१
मस्त
कथा छान
नाही हो
मस्तच लिहिले आहे लिहित राहा
....
ज।
उत्तम कथा