तांत्रिक अंधश्रद्धा
"काय दिनु भाऊ, काल पोरगी पहायला गेलता म्हणे. केली का मग पास?" डोंबिवलित चढल्या चढल्याचढल्या मी त्याला विचारले.
"हो गेलतो की. आणि पास पण करुण आलो" तो गर्दीतुन मान वर काढत बोलला.
"मग ज़रा फोटु बिटू दाखवाकि आम्हाला?" मागच्याला पुढं घालत रम्या आमच्याकडे वळाला.
दिन्याने एकदा खिशातून मोबाइल काढला, लॉक उघडायचे बटन दाबले आणि बाजूला उभा लोकांकडे पाहत परत खिशात ठेऊन दिला. बस मग काय,त्याला फोटो दाखवायचा नाही हे रम्याच्या लक्षात आले.
"मुलीला केसं आहेत कारे? का आपल्या बॉससारखी हे?" म्हणत रम्या मोठ्याने खिदळु लागला.
"ये रम्या, फोटुवर लाइन मारायची नई बरका. आपली वैनी हे" मी पण खेचायला सुरुवात केली. ठाण्यातून सुन्या आणि बाब्या बसले. त्यांनी पण दिन्याची जाम खेचली. येरव्ही दिन्या आमच्यात सामील व्हायचा पण आज त्याचे वागणे थोड़े खटकले म्हणुन सर्वांनाच चांगला चेव आलेला. दादरला उतरल्यावर स्टेशनच्या बाहेर येई पर्यंत दिन्या मागे पडलेला. आमची त्याच्या सोबत चलायची पण इच्छा नव्हती. बाहेर कंपनीची बस उभाच होती. आम्ही चटकन शिरुण पुढचे सीट पकडले. तो मागे जाऊन बसला.
ऑफिसमधे सर्वजन आपल्या आपल्या कामला लागली. मी पीसी स्टार्ट करुण दिन्याकडे एक तिरपी नजर टाकली. तो त्याच्या टेबल जवळ उभा होता. हातातल्या मोबाइलला त्यानं ओषधाच्या बाटली सारखं हालवले आणि टेबलवर ठेऊन दिले.
लंचब्रेक मधे आम्ही सर्वांनी एकमेकांना आवाज दिले आणि कैंटीनकड़े निघुन गेलो. दिन्याला कुणीच् बोलावले नाही.
आम्ही टेबलवर टिफिन खोलले तेवढ्यात दिन्या आला. खिशातून मोबाइल काढुन त्यानं, उडवायच्या आधी शाम्पेनची बाटली जाशी हालवतात तसा मोबाइल हालवाला. आम्ही एकसाथ त्याच्यावर नजर ठेऊन बसलो. त्यानं मोबाईल आमच्याकडे दिला आणि
"ही बघा तुमची वैनी" म्हणाला.
"माकडा, मग अगोदर दाखवायला काय झालते?" मी न राहवुन त्याला विचारले.
"आरे! या मोबाइलचा प्रोब्लेम झालाय. खिशात ठेवला कि बंद पडतो. ओनऑफचे बटन कितीही वेळा दाबले तरी चालु होत नाही अन तीनवेळा जोरात हलवले की लगेच चालु होतो"
सगळे जोरजोरात हसले.
"साल्या, दुरुस्त करुण घे की मग!" बाब्या.
"चांगला हप्ताभर ठेवला होता. शेवटी कंटाळून वापस आणला" दिन्या.
"कल्याणला चल आज. आपला एक दोस्त हे. तो कसलेपण मोबाईल दुरुस्त करतो" मी.
"मी भरपुर दुकानात दाखवलाय. काही उपयोग नाही" दिन्या.
"अबे तु चाल त् खरं. आपला अहमदभाई जाम एक्सपर्ट हे" मी.
"मला काम हे आज. एक काम कर आजचा दिवस तुझा फोन मला दे अन माझा तु घेऊन जा" दिन्या.
ऑफिस सुटल्यावर माझा कीपॅडवाला मी त्याला दिला आणि त्याच्या स्क्रीनटच मधे माझे कार्ड टाकले. संध्याकाळी अहमदभाईला मोबाईल दाखवला. त्यानं अर्धा तासात दुरुस्त करुण दिला. नंतर आम्ही नऊ च्या शो ला गेलो. मधे मी बराचवेळा फोन खिशातुन काढुन चेक केला, ओके होता.
शो सुटल्यावर रूमकडे आलो. घरमालकाने मेन गेट ला कुलुप लावालेले. पार्टनरला फोन करुण चावी फेकायला सांगवी म्हणुन खिशातुन फोन काढला तर तो बंद पडलेला.
मग उजव्या हातात फोन घट्ट धरला आणि जोरात तिनवेळा वरखाली केला.
..... आणि गालातल्या गालात हसतच पार्टनरला फोन लावला.
प्रतिक्रिया
क्रमशः आहे का?
कथेतल्या पात्रांच्या सामाजिक
काय दिनु भाऊ, काल पोरगी
नाही
कथा कळली नाही
मला समजली कथा.
मला समजली ही कथा. असाच अनुभव
ग्राउंड फ्लोट होत असेल.
संदीप भाऊ!
प्रतिसादही
छान! जमलीय भट्टी!
स्क्रीनवरचं भूत - २
सस्पेंस!!!!
आवडली कथा. माझ्याही बर्याच
सांगा की मग
भारीच की!
स्क्रीनवरचं भूत - ३.
अश्या
कथा आणि संदीप डांगे ह्यांचे प्रतिसाद मस्त.....
..