कोपरयातलं रोपट.
लेखनविषय (Tags)
आमच्या कॉलेजला नुकत्याच सुट्टया लागलेल्या होत्या. सगळं चंबुगबाळ घेऊन गावी निघालो होतो. पेपर संपल्यानंतरची खुशी काय वर्णवावी! रिझल्ट लागेपर्यंत का होईना ती टिकून राहते.
बसस्थानकात अत्यंत स्वच्छ, मोकळी बस मझ्यासाठी उभी होती. 'प्रवासी हेच आमचे दैवत' हे सिद्ध करणारा तेजस्वी,हसरया चेह्रयाचा कंडक्टरही लाभला होता.कंदमुळे खाऊन या कंडक्टरने कोणालाही कंप सुटावा अशी तब्येत मिळवली असेल असे वाटले. अदबीने तिकीट फाडुन माझ्याकडे दिले गेले .नेहमीप्रमाणे अखिल भारतीयांना सतावणारा सुट्टया पैशांचा प्रश्न त्यालाही भेडसावत होता हे कळाले. शेवटी योग्यवेळी आरामात मी गावी पोहचलो.
मला घ्यायला घरचे कोणीच आलेले दिसत नव्हते. फोनाफोनी झाल्यावर कळालं की सगळे कुठेतरी बाहेर गेलेतं. आता काय करावं याचा विचार करत असतानाच शेजारचे जोशीकाका दिसले. त्यांनीही मला पाहिल पण बरयाच दिवसांनी मला पाहत असल्याने काहीसे साशंक दिसत होते. शेवटी मीच गेलो त्यांच्यापाशी.
" अरे रोहित ना तू ? मला वाटलच. बस बस. सोडतो तुला. घरीच निघालो. " "थॅंक्स हा काका." असे मी म्हणेपर्यंत त्यांनी गाडी सुरूसुदधा केली. मला पाहुन ते खुश झालेले दिसत होते. खरतर मला पाहुन त्यांना आनंद व्हावा असे मी काहिही केलेले नव्हते. असो. लवकर पोहचतोय ना बास..
मी घरापाशी पोहचलो आणि लक्ष्ात आलं की माझ्याकडे तर घराची चावीच नाही. फोन काढल्यावर बघितले तर पप्पांचे मिसकॉल्स. फोन केल्यावर कळालं की कोणी नातेवाईक वारल्यामुळे ते सगळ्यांना घेऊन त्यांच्या गावाला गेले होते. माझी आता पुरती पंचायत झाली होती. पोरापेक्ष्ा नातेवाईक जवळचे काय असे तणतणत फोन बंद केला.
हा सर्व प्रकार जोशीकाकांच्या समोरच झाला. त्यांनी आपसुकच घरी बोलवल मला. मीही नाईलाजास्तव गेलो. जवळपास दहा बारा वर्षांनंतर मी त्यांच्या घरी चाललो होतो. कॉलेज ,शिक्षण, मित्र या सगळ्यात मी पार बडुन गेलो होतो. त्यांचा मुलगा कुठेतरी बाहेर शिकायचा.त्यामुळे खास जोशीकाकांकडे फारस जाणंयेणं नव्हतच.
" तुला आठवतय का रे रोहित लहानपणी या समोरच्या लॉनमद्धे दिवसभर गोंधळ घालायचास. तुझी आई तुला बोलावून बोलावून थकून जायची. तरी तू जायचा नाहिस आमच्या मिलींदची खेळणी घेऊन खेळत बसायचा.." समोरच्या वाळलेलं गवताकडे पहात मी फक्त मान डोलावत होतो कारण यापैकी काहीही आठवणे आता शक्य नव्हते. माझ्याच धूडघुस घातल्याने ते गवत वाळून गेलेय अशी एक अपराधी भावना मनाला चाटून गेली. ( या भावना आईस्किमप्रमाणे 'चाटूनच' का जातात देव जाणे..)
आत गेल्याबरोबर त्यांनी जोशीकाकूंना हाक मारली. " अग पाहिलस का कोण आले ते ? " हाताला लागलेल पीठ झटकत त्या बाहेर आल्या. " अग बाई रोहित ना तू ? किती मोठा झालास! मिसरूडस फूटली हो यास ." मला उगिचच लाजल्यासारखे झाले.
" अग ते देशमुख बाहेर गेलेत म्हणून आणला याला घरी. .काय रे काय खाणार ? भेंडी कर ग याला आवडते मला माहिती आहे. ." मी पहातच राहिलो. इतक्या वर्षांनंतरही त्यांना माझ्या आवडीनिवडी लक्ष्ात होत्या. काकु हुं म्हणत आत गेल्या. आत जाताना त्यांनी खुण करुन काकांना आत बोलावलं
ही 'खुण' कशासाठी होती हे काका बाहेर आल्यावर त्यांच्या चेह्रयावरुन कळाले. आपण इथे आगंतुक आहोत असे वाटायला लागले. " राहु द्या काका मी जेवूनच आलोय." " अरे जेव रे. तू काय रोजरोज येतो का.. मला वाटतय तुझ्या घरच्यांना उशीर होणार .इथेच झोप आणि उद्या जाशीलच की."
तेवढ्यात फोन वाजला. " काय रे मैत्र्ीणीचा फोन वाटत " इति काका. " नाही हो अननोन नंबर आहे...बोला कोण बोलतय ?. " "अरे रोहित मी बोलतेय..माझ्या फोनची ब्याटरी गेली. 'हे' पण बाहेर गेलेत कुठेतरी ..कुणाकडे जातोयस तु? आणि हो त्या शेजारच्या जोशींकडे जाऊ नकोस . आपलं भांडण झालय त्यांच्याशी पुन्हा वाद नको. .." बरं बरं मी बघतो हा..ठेवतो. "
काकांना तरी शंका आलीच . "कुणाचा रे फोन ? " "मित्र होता" मी पुटपुटलो. थोड्यावेळाने त्यांनी जेवायला बोलवल. गप्पा सुरु झाल्या. " काय रे तुझ्य घरच्यांचा फोन आला नाहि ते ? पोहचले का त्यांच्या घरी ? " "माहित नाही काका." " मघाशी किती उलट बोलला पप्पांशी !!' मुलापेक्ष्ा नातेवाईक जवळचे का म्हणुन ?' अस नसत बाबा नाती जपावी लागतात कोणी जपो न जपो आपण मात्र मागे पडायच नाही ..काय ग बरोबर ना ? " काकु दचकल्या .. मीच बरोबर म्हणून वेळ मारून घेतली. काकूंचे हावभाव पाहता मी आता सरळ झोपायला जायचं ठरवलो आाणि लगेचच गुपचुप झोपलोसुद्दा
भल्या पहाटे काकांनी मला उठवले. " अरे आवर लवकर मॉर्निंगवॉक घ्यायचा आहे आपल्याला. काका सकाळी चहाएवजी मॉर्निंगवॉक घेतात हे पाहुन माझ्या अंगाल वॉकच्या आधिच घाम फूटला. पण आता पर्याय नाही हे पाहुन तयार झालो.
मी आणि काका 'त्या' लॉनपाशी थांबलो. अजुन काकू तयार व्हायच्या होत्या. " बघितल ही अजुन उशीर करते "
मी त्या लॉनकडे पहात होतो. वाळलेल्या त्या लॉनवर कोपरयात एक रोपट होत. " कशाच रोपट आहे हो ते काका ? " काकांनी त्या दिशेला पाहिल
ते अचानक गंभीर झाले.
" माहित नाही रे बेटा. बरेच दिवस झालेत. गंमत माहिती तुला, ते रोपट फारस वाढलच नाही. त्या रोपटाला फुलबिल काही नाही. कधीकाळी या गवतासोबत त्यालाही पाणी मिळाल. आणि आलं उगवून.
त्या रोपट्याला कधी उपटून टाकाव असं नाही वाटल. त्याकडे कधी लक्षच जास्त नाहि दिलं. कधीही स्वताःहून पाणी नाही टाकलं. गवताला मिळण्यारया पाण्यावर ते जगलय आधी. आता तेही बंद झालं तरीहि ते रोपट टिकून आहे बर. कधीकाळी पाऊस पडला तरच पाणी मिळतय त्याला. का कोणास टाऊक हे रोपट विनाकारण आघात करत माझ्या डोळ्यांवर. पण पुन्हा विसरुनही जातो. आज तुझ्यामुळे लक्ष गेल म्हणायच..
आपण आयुष्यभर नाती जोडत जातो. त्याला लेबल लावतो आणि त्याप्रमाणे त्याला सहवासाचं पाणी टाकत राहतो. काही नात्यांचे बिज वाढतात आणि वाढतच राहतात काही कुजुन जातात. काही नाती मात्र या रोपट्याप्रमाणे असतात. ती केवळ 'असतात.' तिला जसा बहर कधीच येत नाही तशी ती सुकूनही जात नाही. आपल्या मनाच्या बागेतला कोपरा ते पकडतात. आपल्या नकळत ठाण मांडतात. कधीकाळी पाऊस पडलाच तेव्हा यांची आठवण होणार एरवी नाही..."
.
.
.
.
.
परवा रुमवर असताना अचानक भरुन आलं आणि धो धो पाऊस पडू लागला. पाऊस थांबल्यावर बाहेर फिरायला निघालो. चहाच्या टपरीवर सगळे जमणार होते. तिथे सहजच खाली नजर गेली आणि एक रोपट पाहिल. एकदम जोशी काकांची आठवण आली. पण मित्र्ांसमोर कसं बोलणार म्हणून फोन केला नाही.
अनेकांप्रमाणे काकासुदधा माझ्या मनातील केवळ कोपरयातलं रोपटच बनूनच राहिले.
प्रतिक्रिया
वाह!!!!!!!
क्लास!!!
छान
छान लिहिलंय.
_/\_
सुंदर लेख
सुरेख लिहलय!
चांगलं लिहिलंय..
सहमत. त्यानेच अभिव्यक्ति
शेजार्यांसोबत भांडण असणे नेहमीच आढळणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्य
+१ मस्त प्रतिसाद. छान ललित.
वैश्विक अभिव्यक्ती ?
धन्यवाद!
अप्रतिम लेख...
मस्त लेखन
मस्तच आवडंलं
मुक्तक
आवडले!
व्वा !
सुरेख लेख.
खुप सुन्दर लेख आहे.
खूपच छान!