"चक्रव्यूह"
रुतलेला मी
खोल चक्रव्यूहात
"मी" पणाच्याच
खेचणारं आकर्षण
चक्रव्यूहाच्या केंद्रात
केलेली प्रत्येक कृती
उचललेलं प्रत्येक पाऊल
परिघात चक्रव्यूहाच्याच
सभोवती रिंगण नात्यांचं
हा, ही, हे, तो, ती, ते,
तेही जोडलेले एकमेकांशी
Covalent बॉन्डने
"मी" पणाच्याच
आहेत ही नाती निरर्थक
की तेच सत्य?
घडू पाहतो स्फोट
पण घडत नाही
कारण कवच घट्ट
"मी" पणाचंच
एक कळ तीव्र
छातीत, डाव्या हातात
समोर आहेस का तूच?
आहेस तू absolute?
म्हणतात तसा?
मी पाहतो अलिप्त
माझ्या कलेवराकडे
तरी पुन्हा मीच?
असशील तू सत्य
तर घडून जाऊ दे स्फोट
पसरून जाऊ दे
उन्मुक्त तत्व
विश्वाच्या अफाट पसाऱ्यात!
पसरून जाऊ दे
उन्मुक्त तत्व
विश्वाच्या अफाट पसाऱ्यात!
बिग किंवा बँग थियरी सोप्या
big bang? or singularity? द्वैत-अद्वैत वगैरे