प्रस्तावना :
गेले काही दिवस मिपावर फार मजेशीर प्रकार चालु आहे (म्हणजे तसा तो आधी पासुन चालु असावा, माझ्या निदर्शनास नुकताच आलाय.) काहीतरी अल्पस्वल्प वाचनाने आपले स्वतःचे काही तरी एकांगी मत बनवुन घ्यायचे, ते पकडुन कचकुन लेख पाडायचा , भले मग इतरांच्या भावना दुखावल्या जाओ न जाओ आपल्याला त्याच्याशी काय . बरं त्यातल्या कोणी प्रतिवाद केला तर सौम्य प्रतिवाद असल्यास परत आपलेच मत रेटुन लावायचे, तोडीचा प्रतिवाद असल्यास असहिष्णुता असहिष्णुता अशी बोंब ठोकायची अन यदा कदाचित वरचढ प्रतिवाद असेल तर वैयक्तिक टिपण्णी, व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला, वैयक्तिक मार्केटिंग स्ट्रेटेजीवर टीका असे म्हणत कोणते तरी अत्मसत्य ठोकुन द्यायचे.
(संपादित)
बर्यापैकी उद्विग्न झालो होतो ,असूर्या नाम ते लोका अंधेन तमसावृता तांस्ते प्रेत्याभिगच्छंति ये के चात्महनो जनाः ||३|| ईशावास्योपनिषदातिल हा श्लोक मनात सतत घोळत होताच ..... अन अजुनही सरांनी सांगितले तसे "माफ करायचे " जमत नाही पुर्णपणे! खरे तर काही लिहावेसेच वाटत नव्हते , पण यु ट्युबवर सर्फिंग करता करता हा अभंग डोळ्यासमोर आला. आपल्या तुकोबांचाच ! हो , हो , ह्या इथे कोनाड्यात फोटो लावलाय ना त्याच तुकोबांचा !! जवळपास ५-६ महिने झाले चैतन्यने मला सांगितले होते की नक्की ऐक म्हणुन पण आज योग आला . खरेच काय योग आहे ! कदाचित ह्या सार्याच्या मिसळपावमंथनाच्या निमित्ताने आपल्या श्रध्दांचीच आपल्या निष्ठांचीच परीक्षा पाहिली जात असावी. तुकोबांच्या काळातही असेच काहीसे झाले असेल की काय ? कदाचित ह्या सगळ्या स्वमतांध लोकांच्या मागुन बाप्पाच परीक्षा पहात असावा आपली !! https://www.youtube.com/watch?v=EDpmBf-A1jI _______________________________________________________________कमोदिनी काय जाणे तो परिमळ | भ्रमर सकळ भोगीतसे || धृ || तैसे तुज ठावे नाही तुझे नाम | आम्हीच ते प्रेम सुख जाणो || १ || माते तृण बाळ दुधाची ते गोडी | ज्याची न ये जोडी त्यासी कामा || २ || तुका म्हणे मुक्ताफळ शिंपी पोटी | नाही त्याची भेटी भोगती ये || ३ ||फुलाला काय माहीत की त्याचा काय सुगंध आहे अप्रतिम ! भ्रमर त्याचा पुर्ण उपभोग घेत असतो ! तसेच काहीसे आपले नाते आहे बाप्पा. तुला काय माहीत की तुझे नाव कित्ती गोड आहे ते , ते प्रेमसुख काय अप्रतिम आहे हे आम्हीच जाणतो ! गाई साठी जे खाद्य गवत आहे तेच वासरा साठी अमृततुल्य दुध आहे त्यांची बरोबरी अशी बरे होणार ! शिंपीणीच्या पोटात मुक्ताफळ(?) असेल पण तिला काही त्याचा भोग घेता येत नाही ते सुख भोगणारे औरच !! अहाहा ! तुकोबा तुकोबा !! _____________________________/\__________________________________ कित्ती सोप्पं आहे हे सारं बाप्पा ! आम्हीच उगाच अवघडात शिरतो , वादात पडतो अन शांती गमावुन बसतो ! पण मग माऊली मग अलगद बाळाला उचलुन घेतात असे कडेवर ! धाकुटयाचे मुखीं घांस घाली माता । वरी करी सत्ता शाहाणियां ॥१॥ ऐसें जाणपणें पडिलें अंतर । वाढे तों तों थोर अंतराय ॥ध्रु.॥ दोन्ही उभयतां आपण चि व्याली । आवडीची चाली भिन्न भिन्न ॥२॥ तुका म्हणे अंगापासूनि निराळें । निवडिलें बळें रडतें स्तनीं ॥३॥ आता चालु दे काथ्याकुट. खुशाल करा अध्यात्माची , वैदिक उपनिषदोक्त धर्माची बदनामी . आता कसलीच हरकत नाही . तुम्ही थोरले आहात , ज्येष्ठ आहात, जाणते आहात ..... आम्हाला अपला आमचा भोळाभावच बरा! बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥
पांडुरंग | पांडुरंग |
_____________________________________________________________ https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%… ______________________________________________________________________
वाचने
17214
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
झोपत नाहीस का रे :)
या निशा सर्वभूतानां तस्यां
In reply to झोपत नाहीस का रे :) by टवाळ कार्टा
बॅटमॅन रात्री का जागतो त्याचे
In reply to या निशा सर्वभूतानां तस्यां by प्रसाद गोडबोले
तुकारामांची गाथा अभ्यासावीशी
अभंग आवडला
खिक्क!
+१
कमोदिनी काय जाणे तो परिमळ |
धन्यवाद प्रगोसाहेब!
काहिहि कळले नाही, कसलेसे
(No subject)
In reply to काहिहि कळले नाही, कसलेसे by स्पा
मेल्या, म्हातारी मेल्याचं दु
In reply to काहिहि कळले नाही, कसलेसे by स्पा
खरे खरे
कांगावा आणि विपर्यास.
या धाग्याला कांगावा म्हणायचे
In reply to कांगावा आणि विपर्यास. by एस
सहमत!
In reply to या धाग्याला कांगावा म्हणायचे by बॅटमॅन
ठीक आहे. मी कांगावा हा शब्द
In reply to या धाग्याला कांगावा म्हणायचे by बॅटमॅन
एखाद्याचे सश्रद्ध असणे हा
In reply to ठीक आहे. मी कांगावा हा शब्द by एस
+1 बॅटमॅण शी ( नेहमीप्रमाणे) सहमत
In reply to एखाद्याचे सश्रद्ध असणे हा by बॅटमॅन
अगदी हेच मत माझेही
In reply to +1 बॅटमॅण शी ( नेहमीप्रमाणे) सहमत by स्पा
असहमत
In reply to अगदी हेच मत माझेही by संदीप डांगे
नास्तिक असो वा आस्तिक. प्रत्येकाला अहं प्यारा. मी कुठे मूर्खतर ठरत नाही ना अशी सुप्त भीती असते. त्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची हुक्की येते. हे वाद नास्तिक-आस्तिक नसून केवळ आणि केवळ शुद्ध अहंकाराचे आहेत.लॉजिक फक्त मेंदूत असतं, (प्रत्यक्षात ते सत्य असेलच असे नसत) त्या लॉजिकला सपोर्ट करतं मन. आणी मनाला सपोर्ट लागतो चार इतर लोकांचा. मग तो आस्तिक असो वा नास्तिक. सगळे फॅनफॉलोईंगच्या भानगडीत अहंकाराचे षड्डू ठोकित असतात.शंकराचार्यधन्यवाद बॅटाण्णा!
In reply to एखाद्याचे सश्रद्ध असणे हा by बॅटमॅन
संयतपणाच्या आवश्यकतेबद्दल
In reply to एखाद्याचे सश्रद्ध असणे हा by बॅटमॅन
संयतपणाच्या आवश्यकतेबद्दल
In reply to संयतपणाच्या आवश्यकतेबद्दल by एस
कांगावा हा चुकीचा शब्द आहे सहमत नाही.
In reply to ठीक आहे. मी कांगावा हा शब्द by एस
+१००
In reply to ठीक आहे. मी कांगावा हा शब्द by एस
अभिनिवेषाचा आणखी एक प्रकार
In reply to +१०० by बाळ सप्रे
बैटोबा
In reply to या धाग्याला कांगावा म्हणायचे by बॅटमॅन
सुंदर!!
सहा आंधळ्यांना पूर्ण हत्ती
सार सार को गहि रहै थोथा देई उडाय
' हि वृत्ती पण असायला पाहिजे.यकमेकाच्या उरावरच बसाय लागलंत
कुटा खरंच कुटा. कदाचित ईश्वरी
In reply to यकमेकाच्या उरावरच बसाय लागलंत by वडाप
जवळपास ५-६ महिने झाले
हं....
शिंपीणीच्या पोटात मुक्ताफळ(?) असेल पण तिला काही त्याचा भोग घेता
असेलही !
In reply to शिंपीणीच्या पोटात मुक्ताफळ(?) असेल पण तिला काही त्याचा भोग घेता by चामुंडराय