जबरदस्त अनुभव! मजा आली वाचताना!
एक माझाही अनुभवः
संगणकाच्या विषाणूने होणारी धावपळ मी स्वतः अनुभवलेली आहे.
साधारण २००० सालची ही घटना आहे. मी ऑफिसातून घरी यायला त्या दिवशी रात्रीचे साडेनऊ वाजले होते.
माझी आठवीतली मुलगी माझी वाट पाहात रस्त्यावर येऊन थांबली होती. मी दिसताच ती धावत माझ्याकडे आली आणि म्हणाली, "बाबा लवकर चला. आपल्या काँप्युटर मध्ये व्हायरस घुसलाय. आत्ता पर्यंत त्याने आपल्या काँप्युटरला खाल्ले पण असेल.आता आपल्याला नवीन काँप्युटर घ्यावा लागेल ना?"
तिच्या त्या बालसुलभ वक्तव्यावर मी हसलो. तिची समजूत घातली. घरी आल्यावर अँटी व्हायरस प्रोग्रॅमने तो व्हायरस काढून टाकला तेव्हा तिच्या चेहर्यावर दिसणारा आनंद मी आजही विसरु शकत नाहीये.त्यानंतर मला व्हायरस बद्दल असलेली तुटपुंजी माहिती तिला सांगून मी तिची भिती दूर केली.
खरे तर मीही संगणकाच्या बाबतीत नवखा होतो त्यामुळे माझ्या मुलीच्या शंकेचे मला जरी हसू आले तरी तिला दोष देता आला नाही. कारण राक्षसासारखे दिसणारे त्यांचे आकार पाहून ती घाबरली होती. त्यातून संगणकातला व्हायरस आणि आपल्या शरीरावर हल्ला चढवणारा व्हायरस हे एकच असतात असा कितीतरी मोठ्या लोकांच्यात असणारा गैरसमजही मी पाहिलेला आहे.
मजा आली. बर्याच दिवसांनी हॉस्टेलच्या उचापती वाचायला मिळाल्या. आमच्या इकडेही एक टीकिडस नावाचा व्हायरस होता. ६० सेकंदात मशिन बंद करा. रिमोट प्रोसिजर कॉल सर्विस बंद करायचा साला.
शेवटी एक पॅच मिळाला आणी त्याचा बिमोड झाला.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
आपले अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद.
आणखी ही एकदा थोडाफार त्रास झाला होता वायरसचा. बहुधा माझ्याकडून माझ्या मित्राला ईमेल ने गेला होता. मग काय, तो मित्र (कलकत्त्यात), मी (ठाण्यात) आणि त्याचा एक मित्र (अमेरिका की पुणे नक्की आठवत नाही. कॉलेज मध्ये वरिष्ठ होता तो आम्हाला) मिळून, याहू चॅट ने संभाषण करून, त्या विषाणूचा माग काढला. विषाणू प्रतिरोधक संहितेने तो काढला पण त्याच्या विंडोज रजिस्ट्री मधील लिखाण आम्हालाच शोधून काढावे लागले. अर्थात कसे ते सर्व त्या मित्राने सांगितले.
माझ्या लेपटोप ची २-३ वेळा वाट लागली आहे.
याहु मेसेंजर आणि इंटरनेट चालयचे नाही.
जेव्हा पासुन AVG ७-८ वापरतो, तेव्हा पासुन काही अडचण नाही.
माझ्याकडे सुदधा, सगळे व्हायरस आहेत. डी वी डी वर आहेत.
सखाराम गटणे
एका शासकीय कार्यालयात सर्दी झालेल्या कर्माचार्याला प्रवेश नाकारला जायचा.
कारण विचारल्यावर कळले की कॉम्प्युटरला व्हायरस लागु नये म्हणुन ही काळजी होती
दुसर्या एका केस मध्ये पोलिसानी जप्त केलेल्या फ्लॉपीस पंचिंग मशीन ने पंच करुन व्यवस्थीत फाईल करुन ठेवल्या होत्या पुरावा म्हणुन.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
प्रतिक्रिया
जबरी!
लय भारी
धन्यवाद
माझ्या
एका शासकीय