विश्वास पानिपतच्या लढाईत नेहमीच जातो
लेखनविषय (Tags)
"विश्वास पानिपताच्या लढाईत नेहमीच जातो"
अलीकडं गोविंदा , आमचा अनेक दिवसाचा जूना ड्रायव्हर छान छौकी झाला होता.
पूर्वी पांच पैशाला महाग असलेला गोविंदा सध्या कायम खिशात शे पाचशे बाळगून असायचा .
रमी क्लब मध्ये त्याचं नशीब जोरावर आहे,तो सांगायचा . बरं आमच्या कंपनीत व्हावचर इ.लिखापढीला त्याच्या
एव्हडं तत्पर कोण नसेल. तेल पाणी, इंधन , किरकोळ रिपेअरिंग, टोल ,ड्रायव्हरच्या अखत्यारीत
असणार्या सर्व बाबी जिथल्यातिथं.संशयाला एव्हडीसुद्दा जागा नाही. पण पाणी कुठंतरी मुरतंय असं चिन्मय जेव्हां
म्हणाला तेव्हां मी त्याच्यावर बिलकुल विश्वास ठेवायला तयार नव्हतो.
तसं म्हटलं तर चिरंजीव हाताला आल्यापासून ,मी किरकोळ गोष्टीत लक्ष घालत पण नसतो .जून्या नोकर वर्गाला
मी कायमच आपुलकीचि वागणूक देता आलोय. पण त्या दिवशी--------
"तुम्हाला कसं घडतंय, बघायचंय बाबा? " त्यानं गोविंदाला हांक मारली अन् म्हणाला ड्रायव्हरकाका
रात्री एखाद्यावेळेस मुंबईला निघावं लागेल, तुम्ही अकौंट सेक्शन मधनं कॅश घ्या आणि टाकी फूल करून आणा.
थोड्या वेळानं गोविंद आला म्हणाला ,धाकटे मालक २००० ₹ घेतलेले,१८००₹ चं पेट्रोल घातलं २००₹आणि व्हावचर
जमा केलंय.म्हणाला आणि गेला.
"आता काय?" मी चिन्मयला विचारलं
" हे सगळे पैसे त्यानं खिशात घातले"
"कसं काय? कशावरून? आणि गोविंद आणि पेट्रोल पंप वाले दोघेही विश्वासातले--------"
"एकेकाळी विश्वासातले होते, पंप आता दुसर्यानी चालवायला घेतलाय,आणि त्यानी ड्रायव्हरकाकाना
असल्या गोष्टीची चटक लावली. मी पंप बदलायचा निर्णय घेतलाय,आतापर्यंत २०,०००चा फ़ाटका बसलाय
आपल्याला.ड्रायव्हरकाकांचा निर्णय तुम्ही घ्या."
"पण त्यानी पैसे खाल्ले कशावरून?"
"कारण मी स्वत:च दुसर्या पंपावरून मघाशी टाकी फूल करून आणली होती , ही त्याची पावती"
विश्वास पानिपताच्या,लढाईत खरंच गेला की रे,मी स्वताशीच पुटपुटलो
प्रतिक्रिया
विश्वास ठेवला कि घात होतो
अर्रर!!
हो.
कथा आवडली. डोळे झाकून कुणावरच
मी लिहितो ते बर्यापैकि सत्यच