✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भुईक

ज
जव्हेरगंज यांनी
Fri, 11/06/2015 - 20:05  ·  लेख
लेख
"नाकाला नुसती धार लागली हुती, रगात नुसतं ठिबकत हुतं" बापुराव घुश्श्यातचं बोलला. "आरं पण यवढं झालचं कसं?, लिंब्यानं कायचं कसं न्हाय क्येलं" पाटील पानाचा तोबरा भरत बोललं. "यका बुक्कीत कुठं येवढं रगात येतं व्हयं, गणा बिना फुटला आसल" चवढ्यावर बसलेला मारुती घाऱ्या डोळ्यांनी बघत बोलला. "ते काय नाय पाटील पोराचा जीव बीव गेला आसता तर, केवढ्याला पडलं आसतं बोला" बापुराव पेटला. "येका बुक्कीत जीव जायला त्येच्यात काय आवसानच न्हाय वयं, उग काय बी बोलू नगु , घ्या मिटवा मिटवी करुन" पाटील सामोपचाराचं बोललं. "आसं कसं मिटवायचं, ह्येच्या नाग्याचं डोस्कं बिस्क फुटलं आसतं तर घीतली आसती का ह्यनं मिटवामिटवी करुन?" बापुराव काय थांबायचं नाव घेत न्हवता. "आरं नाग्या काय तुला आसा तसा वाटला वय? पाय लावुन पळुन ग्येलं तुजं पोरगं म्हायतंय का?"मारुतीरावानं बी आता बार भरला. "मारुतीराव लय त्वांड आलं काय बोलाय, नाग्यासंग तुलाबी हितं ऊलटं टांगीन, पोरावर जरा ध्यान ठिव, परवा बी म्हणं त्यानं नळात कुणाला तरी बुडवलं" पाटलानं पटका गुंडाळायला घेतला. "नळाला पाणीच न्हायतर काय बुडवता, आलीकडच्या डबक्यात पोरं पवत हुती, तिथच कायतरी झालं, म्याबी त्येला दोन मुस्काडात ठिवुन दिल्या म्हणा" मारुतीरावानं आपली बाजू पष्ट केली. "नळाला पाणी न्हाय मनतुय, मग ऊसाचं काय केलयं?" पाटलानं आजुन एक पान काढलं. "यादवाचं घेतलयं इकात, जमवायच आपलं कसंतरी, यवढा म्हैना गेला की खाल्लाकडच्या तुकड्यात पाईपलाईन टाकायचीय, नळाचं पाणी डायरेक शेतात" मारुतीरावानं बी टोपी वर सारली. "पाटील, जित्राबास्नी खायला कुटं कडवाळ हायका कुणाचं?" मगापस्न घुम्यावनी बसलेल्या म्हादुबाला आता वाचा फुटली. "व्हय, लय हाल ओ जित्राबाचं, नुसता कडबा किती खात्याली?" शेजारी बसलेला एकनाथनं त्याचीच री ओढली. "त्ये काय नाय पाटील, मला चारशेची नुस्कान भरपाई पायजेल, पोराला दवाखान्यात न्ह्यायचय, नाक नुसतं सुजलयं" बापुरावनं काय आपला हेका सोडला न्हाय. " धा रुपयला गुळी मिळती, हितं गावच्या दवाखान्यात दाखव, उग कायबी सांगु नगू, ही रोख धा रुपय घी आन मिटवुन टाक" मारुतीराव खिशात हात घालतचं बोलला. "येकुलतं यक पोरगं हाय पाटील, उग हिततिथं दाखवणार न्हाय, आपुन काय चारशेच्या खाली येणार न्हाय, नसता रातच्याला कोयता तयारच हाय, पुना मागनं काय बुलु नगासा" बापूरावचं डोळं आता लालभडक होत चाललं. "आन आमी काय बांगड्या भरल्यात्या वय, घराम्हागं तलवार पुरुन ठिवलीय, दसऱ्याला पुजा करताना समद्या गावानं बघितलयं" मारुतीरावानं बी फुशारकी मारली. "बापू, चारशे लैच हुत्यातयं, बघ जरा काय कमी करता आलं तर" पाटील बंडीत हात घालत बोललं. आतल्या खिशातनं शंभराच्या नोटांच बिंडेल काढलं. एक एक करत समद्या पंधराच्या पंधरा नोटा मोजल्या. आन वरच्या काय नोटा हातात घीऊन बोललं, "म्हादुबा, सहाशे हाईत, सखुबाईला दी, खुरपायच्या बायांची हाजरी मनावं, आन आजुन दोन बाया वाढीव मनावं" म्हादुबानं हात पुढं करुन नोटा घेतल्या. एक एक करत पुना समद्या मोजत राहीला. मारुतीरावाचं काळीज क्षणभर थांबुन पुन्हा धडकलं. बापुरावाचं तर धडाधडा धडकुन पुन्हा मुळपदावर आलं. "पाटील, बारदाना आणायचा हुता मक्याला, त्येलाबी आजुन दुनीकशी लागतील" म्हादुबा ईमानदारीनं बोलला. "व्हय बारदाना बी लागलचं, मका नुसती कांबळ्यावर पडुन हाय" एकनाथनं पुन्हा एकदा त्याची री ओढली. "सकाळपस्न पोरगं थंडीतापानं फणफणलयं, मला जेवानसुदीक गेलं न्हाय" बापूराव आपलं घोडं दामटवत राहिला. "आपल्याकडं काय पैका न्हाय गड्या, ह्या धा ची बी आता पुडी घ्यायचीय" मारुतीरावानं तर हातच झटकलं. पाटील तोबऱ्यावर तोबरं भरत राहिलं. म्हशीच्या शेणापासुन ते केळीच्या पट्टीपर्यंत विषय काढत आन खिशातल्या नोटा चार पाच वेळा मोजत म्हादुबा घुम्यावाणी बसुन राहिला. एकनाथ बी आळस देत त्याची री ओढत गेला. ह्या गोंधळात आख्खी दुपार गेली. शेवटी ठरलं आसं की 'बघु ऊंद्याच्याला'. आन लिंबाखालची चावडी ऊठली. *********************************************************************** रातच्याला लिंब्या उड्या हाणतच खेळाय गेला.पोरं शिवनापाणी खेळत हुती. सुटणी झाली. नाग्यावर राज्य आलं. लिंब्या लांब पळत सुटला. डाव्या हातानं शेंबुड पुसत नाग्या त्याच्या म्हागं लागला. पळता पळता लिंब्या थांबला आन म्हागनं येणाऱ्या नाग्याच्या तोंडावर त्यानं जोरदार ठोसा मारला. नाग्या धडपडतच खाली बसला. नाकाला नुसती धार लागली हुती, रगात नुसतं ठिबकत हुतं.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
9805 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

हम्म..

जेपी
Fri, 11/06/2015 - 20:18 नवीन
हम्म..
  • Log in or register to post comments

हम्म

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 11/06/2015 - 20:22 नवीन
हम्म
  • Log in or register to post comments

हम्म

चांदणे संदीप
Fri, 11/06/2015 - 20:35 नवीन
हम्म
  • Log in or register to post comments

बन्घु ऊंद्याच्याला ...

आवडि
Fri, 11/06/2015 - 20:47 नवीन
च्यामारि हे वाचताना बि लैच तरास व्हायला लागलाय....बन्घु उन्द्याच्याला ? मन्ग बघु उन्द्याचाला
  • Log in or register to post comments

हम्म

जव्हेरगंज
Fri, 11/06/2015 - 21:06 नवीन
हम्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवडि

हे उत्तम. शैलीचा सोस जरा कमी

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/06/2015 - 21:22 नवीन
हे उत्तम. शैलीचा सोस जरा कमी केला असं वाटतंय. म्हणूनच आवडलं.
  • Log in or register to post comments

_/\_

जव्हेरगंज
Fri, 11/06/2015 - 21:40 नवीन
_/\_ हलकंफुलकं काहीतरी लिहायचं होतं. असंच आपलं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

घ्या आमचा बि एक...

पीके
Fri, 11/06/2015 - 22:35 नवीन
हम्म...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

मी असं मुद्दाम लिहिलं कारण

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/06/2015 - 22:37 नवीन
मी असं मुद्दाम लिहिलं कारण तुमच्या शैलीत तोचतोपणा वाटू लागला होता. आणि गाडी शेवटी लैंगिकतेकडेच जायची कुठे तरी. त्याला हरकत नाही, पण मग पहिल्या ओळीलाच पुढे काय आणि कसं होणार हे कळल्यावर वाचायला मजा येईना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

च्यायला असं होतं होतं का ते .

जव्हेरगंज
Fri, 11/06/2015 - 22:53 नवीन
च्यायला असं होतं होतं का ते .... देन ओके, एखादी फेल जाणारचं :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

खुप सुंदर... झक्कास.

संदीप डांगे
Fri, 11/06/2015 - 23:33 नवीन
खुप सुंदर... झक्कास. जव्हेरगंजबाबाकी जय....!!!
  • Log in or register to post comments

कथेत छोटेमोठे बदल केलेत.

जव्हेरगंज
Fri, 11/06/2015 - 23:42 नवीन
कथेत छोटेमोठे बदल केलेत. आणि शीर्षक पण बदललयं. धन्यवाद!.
  • Log in or register to post comments

कथेत छोटेमोठे बदल केलेत.

आतिवास
Sat, 11/07/2015 - 10:53 नवीन
कथेत छोटेमोठे बदल केलेत. दोन-तीन कथांच्या प्रतिसादात तुमचं हे वाक्य वाचलं. तुम्ही संपादक आहात का हो? :-) बाकी आधीच्या कथेत नेमके काय बदल केलेत हे (पुन्हा वाचून) कळणं अवघड असतं हे लक्षात आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

तुम्ही संपादक आहात का हो? :-)

जव्हेरगंज
Sat, 11/07/2015 - 18:25 नवीन
तुम्ही संपादक आहात का हो? :-)>>>>>>>>> नाही ओ, तेवढं कुठं आमी... संमं ला सांगुन करुन घेतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

हम्म

कपिलमुनी
Sat, 11/07/2015 - 00:47 नवीन
हम्म
  • Log in or register to post comments

मस्तं.

प्रभाकर पेठकर
Sat, 11/07/2015 - 02:39 नवीन
छान, मस्त आहे कथा.
  • Log in or register to post comments

छान जमलंय.

शिव कन्या
Sat, 11/07/2015 - 14:00 नवीन
छान जमलंय.
  • Log in or register to post comments

मस्तय

टवाळ कार्टा
Sat, 11/07/2015 - 14:09 नवीन
मस्तय
  • Log in or register to post comments

आता चांगली जमलीय

एक एकटा एकटाच
Sat, 11/07/2015 - 18:30 नवीन
आता चांगली जमलीय पहिल्यापेक्षा अजुन येउ द्यात
  • Log in or register to post comments

कथेत केलले बदल जाणवले नाहीत.

जेपी
Sat, 11/07/2015 - 18:41 नवीन
कथेत केलले बदल जाणवले नाहीत..त्यामुळे पुनश्च: . . . . हम्म..
  • Log in or register to post comments

शीर्षकाचा अर्थ काय?

यशोधरा
Sat, 11/07/2015 - 18:51 नवीन
शीर्षकाचा अर्थ काय?
  • Log in or register to post comments

उदाहरण देऊन सांगतो.

जव्हेरगंज
Sat, 11/07/2015 - 18:59 नवीन
उदाहरण देऊन सांगतो. "म्या त्याला भुईक करुन बुक्की मारली". वेगळ्या भाषेत 'ढिश्युम' ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

'ढिश्युम' !

नूतन सावंत
Mon, 11/09/2015 - 08:45 नवीन
'ढिश्युम' !
  • Log in or register to post comments

आवडली!

पैसा
Mon, 11/09/2015 - 09:34 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

ह्म्म!

स्वाती दिनेश
Mon, 11/09/2015 - 16:04 नवीन
कथा आवडली. स्वाती
  • Log in or register to post comments

भुईंक

तुषार काळभोर
Mon, 11/09/2015 - 16:58 नवीन
शीर्षक आवडलं
  • Log in or register to post comments

थान्क्स मान

जव्हेरगंज
Mon, 11/09/2015 - 18:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

आवडली

प्रदीप
Mon, 11/09/2015 - 21:02 नवीन
पण शेवटचे स्पष्टीकरण नसल्यास बरे झाले असते असे वाटले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद प्रदीप,

जव्हेरगंज
Mon, 11/09/2015 - 22:54 नवीन
धन्यवाद प्रदीप, खरतर जिथे ***** दिलेत तिथेच कथा संपवणार होतो. शेवट यासाठी की दुसऱ्या दिवशी चावडीत बापू आणि मारुतीच्या उलट्या भुमिका असणार ... असं काहीतरी.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा