आमच कोल्हापुर

झकासराव's picture
झकासराव in जे न देखे रवी...
20 Nov 2007 - 8:59 pm

मी काढलेले फोटो.
दिवाळीत कोल्हापुरला जावुन आलो त्यावेळचे.

http://picasaweb.google.co.uk/zakasrao/MaajhKolhapur

इथे पहा माझ कोल्हापुर आणि सांगा कसे आहे ते. :)
प्रत्येक फोटोच्या कॅप्शनवर माउस नेला की त्याची माहिती पुर्ण दिसेल. काहि फोटोखालि माहिती लिहिली आहे.
ती वाचायची राहु नये म्हणून सांगितले :)

kolhapur

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

झकासराव's picture

20 Nov 2007 - 9:01 pm | झकासराव

एवढा ४-५ वेळा प्रयत्न करुन पण फोटो दिसतच नाहि :(
कोणी सांगेल का माझ काय चुकतय??

प्रमोद देव's picture

20 Nov 2007 - 9:20 pm | प्रमोद देव

पण छायाचित्रे बाकी एकदम 'झकास'राव!

http://picasaweb.google.co.uk/zakasrao/MaajhKolhapur/photo#5134587289768...
आणि हा मी काढलेला -
Sky fan in Kolhapur Garden

http://www.flickr.com/photo_zoom.gne?id=2049656399&size=m&context=set-72...

काही शांत, निवांत रंकाळ्याचे. पण अपलोड नाही केलेत अजून.

झकासराव's picture

21 Nov 2007 - 9:55 pm | झकासराव

त्याच झाडाचा फोटो आहे की हा.
रंकाळ्याचे टाका हो फोटो. आता सगळ केंदाळ आहे म्हणून मी गेलोच नाय तिकडे :(

मनिष's picture

21 Nov 2007 - 11:38 pm | मनिष

इथे बघता येतील -
http://www.flickr.com/photos/manishh/sets/72157603255696808/

comments लिहा आठवणीने! :)

ध्रुव's picture

22 Nov 2007 - 11:54 am | ध्रुव

मित्रा,
तु अनिल अवचटांबरोबर बर्याच वेळा काम केले आहेस का? तुझ्या flickr अल्बुम मध्ये त्यांचे बरेच फोटो आहेत.

--
ध्रुव

मनिष's picture

22 Nov 2007 - 12:26 pm | मनिष

हो. आम्ही त्यांच्यावर एक ब्लॉगही लिहितो. तो ब्लॉग मी सांभाळतो.
http://anilawachat.wordpress.com/

देवदत्त's picture

24 Nov 2007 - 1:10 pm | देवदत्त

सामाजिक न्याय पुरस्कार अनिल अवचट यांना जाहिर झाला आहे. त्याबद्दल त्यांना आमचे अभिनंदन संदेश पोहोचवावेत अशी विनंती :)

स्वाती राजेश's picture

20 Nov 2007 - 9:56 pm | स्वाती राजेश

फोटो नावाप्रमाणेच झकास आले आहेत. कोल्हपूरची सैर केल्यासारखे वाटले.
जोतिबाच्या रस्त्यावरील झाडाचा फोटो अप्रतिम.

प्राजु's picture

21 Nov 2007 - 2:22 am | प्राजु

आपलं म्हणा...
वा!!! खूप दिवसांनी कोल्हापूरचे दर्शन झाले..
झकासरव, तुमच्यामुळे आज मन परत भरून आलं
धन्यवाद.. आपल्या कोल्हापूरचे असे दर्शन घडविल्याबद्दल.

-प्राजु.

तात्या विंचू's picture

21 Nov 2007 - 10:54 am | तात्या विंचू

झकासराव, तुम्ही काढलेले फोटो आम्च्या अल्बममधे लावायला परवानगी हवी आहे.......
जर तुमची काही हरकत नसेल तर ?????

झकासराव's picture

21 Nov 2007 - 9:59 pm | झकासराव

भरभरुन प्रतिक्रिया दिलीत आपल्या कोल्हापुरला :)
अनुप शेठ फोटो तुम्ही परवानगी न मागता पण घेवु शकला असतात की तरिहि परवानगी विचारलीत आभारी आहे.
तुम्हाला तुमच्या अल्बम मध्ये कशाल हवे आहेत फोटो????
जर कोणाला दाखवायचेच असतील तर वरचीच लिन्क देवु शकता की.
आणि जर एखाद्या वेब साइट साठी किंवा कम्युनिटि साठी हवे असतील तर मला डिटेल्स सांगा. मग ठरवेन मी परवानगीच.
आणि बिना परवानगी घेतलेत तर प्रश्नच नाहि.
(खडुस नका समजु पण कशासाठी हवेत हे मला माहीत नसताना मी वापरा अस नाही ना म्हणुन शकत.)

तात्या विंचू's picture

22 Nov 2007 - 2:01 pm | तात्या विंचू

सोप अहे......माझ्या पिकासामध्ये लावायला.......:)

विसोबा खेचर's picture

22 Nov 2007 - 12:40 am | विसोबा खेचर

झकासरावा,

तुझं कोल्हापूर तुझ्या नावाप्रमाणेच झकास! फोटोही चांगले आहेत...

(कोकणातला) तात्या.

गारंबीचा बापू's picture

23 Nov 2007 - 1:03 pm | गारंबीचा बापू

झकासराव,

तुमच्या झकास कोल्हापूरचा एकही फोटो आम्हाला गारंबीत दिसत नाही.

(आंधळा) बापू

झकासराव's picture

23 Nov 2007 - 6:05 pm | झकासराव

मस्तच आहेत रे तुझ्या अल्बममधले फोटो.
मी बहुतेक तो ब्लॉग वाचलाय आधी.
मुक्तांगण हा एक चांगला उपक्रम आहे.
अनुप मग सॉरि रे. काहितरी कंस्ट्रक्टिव काम असे तर मी आनंदाने देइन रे.
हे म्हणजे अगदीच काहिही झाल.
तात्या अहो कोल्हापुरला कोकणाची सर नाही म्हणा.
एकदा कोकणात घुसुन तिकडचे फोटो पण काढायचे आहेत बघु कधी जमत ते. :)

बापु तुमच्या गारंबीत पिकासा वर बंदी असेल तर उठवा आधी मग दिसतील :)

अवांतर : गारंबीचा बापु हे माझ आवडत पुस्तक आहे. त्यातला अफाट बापु जगण्याची एक वेगळीच प्रेरणा देतो.
सार जग फाट्यावर मारुन जगण्याची धुंदी वेगळीच :)
तुम्ही कोणते बापु अफाट की सपाट??? :)
ह घ्या

तात्या विंचू's picture

24 Nov 2007 - 2:06 pm | तात्या विंचू

देवदत्त's picture

24 Nov 2007 - 1:17 pm | देवदत्त

आम्ही १९९७ मध्ये कोल्हापूरला गेलो होतो. मंदीर आणि जवळचे पन्हा़ळगड. मस्त वाटले एकदम.
कोल्हापूरची मिसळ ही चाखली तिकडे एकदाची, लाल रस्शासोबत :)