मराठीतला सर्वात छोटा, परिचित आणि सर्वाधिक लोकप्रिय काव्यप्रकार म्हणजे चारोळी. चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्यांनी तर एक संपूर्ण पिढी नादावली होती. ते काव्य अर्थात आवडलं होतं. पण त्याहून वेगळ्या काही कविताही आवडल्या आहेत.
प्रविण दवणे यांची बोन्साय ही अशीच एक कविता. म्हटलं तर आवडली, म्हटलं तर अजिबात आवडली नाही. ही कविता पहिल्यांदा वाचली तेव्हा चौकट राजा या चित्रपटातले काही प्रसंग डोळ्यासमोर तरळले होते.
बोन्साय
चिमुकल्या झाडा,
तुला करीन आळं,
घालीन खत
देईन पाणी
एकच कर,
वाढू नकोस...
अशीच आवडलेली ही सुपरिचित रचना..
कबूतराला गरुडाचे पंख लावता येतीलही...
पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही !!
लाखमोलाचं शहाणपण मोजक्या शब्दात देणाऱ्या, बहुतेक कोकणी भाषेतल्या म्हण स्वरूपातल्या एका उक्तीचा असाच कुठेसा वाचनात आलेला हा अनुवादही खूप आवडून गेला...
चुली चुली तू शंभरांचे शिजव
शंभरांचे अन्न हजारांना पुरो
चुलीपाठीमागे हंडाभर उरो
तारूण्यात पदार्पण करतानाच्या वयातल्या या ओळी अशाच समर्पक...
कुठून येतं फुलपाखरू
कुठे निघुन जातं
चिमटीत उरतो रंग तेव्हा
रंगात फूलपाखरू दिसतं
भिरभिरणारं कोवळं वय
हळूच तिथं फसतं
हे वयच असं असतं,
हे वयच असं असतं...
नखांना रंग लावणाऱ्या नखरेल मुलीवर भाळलेल्या कोणा एकाची ही आणखी एक छोटीशी रचना...
नखांना रंग लावणाऱ्या नखरेल मुली
आपल्याला बुवा आवडतात
आपल्या नखांची ऐट जाऊ नये,
म्हणून का असेना
त्या कोणाच्या स्वप्नांना
नख तरी लावत नाहीत.
वाचने
2899
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
नखांना रंग लावणाऱ्या नखरेल
अप्रतिम.
अप्रतिम
आणखी काही रचना...
धागा आणि प्रतिसाद दोन्ही छान!
In reply to आणखी काही रचना... by माधुरी विनायक
ही एक गोग्गोड चारोळी आहे पण आवडली होती पूर्वी -
लाडका विठ्ठल कसा विसरले मी...
यावरुन मिपावर लै दंगा झालाय.
In reply to लाडका विठ्ठल कसा विसरले मी... by माधुरी विनायक
हा आहे का?
In reply to यावरुन मिपावर लै दंगा झालाय. by प्यारे१
हेच ते हेच ते!
In reply to हा आहे का? by चांदणे संदीप
विठ्ठल... विठ्ठल...
पांडुरंग पांडुरंग!
In reply to विठ्ठल... विठ्ठल... by माधुरी विनायक
वा. सुंदर!