Skip to main content

आणिबाणीच्या आधीची आणि नंतरच्या गैर काँग्रेसी राज्यसरकारांच्या सकारात्मक कामाचा लेखाजोखा हवा आहे

आणिबाणीच्या आधीची आणि नंतरच्या गैर काँग्रेसी राज्यसरकारांच्या सकारात्मक कामाचा लेखाजोखा हवा आहे

Published on गुरुवार, 22/10/2015 प्रकाशित
राजकारणाचा एक उद्देश सत्ताप्राप्ती असेल तर दुसरा उद्देश विकास असतो. राजकारण अथवा सनसनाटी विषयांची चर्चा नेहमीच होते. एक वेगळा विषय जो गैरकाँग्रेसी राज्यसरकारांच्या विकासाच्या बाजूचा लेखा जोखा सनसनाटी बातम्यांच्या पलिकडे जाऊन घेण्याचा प्रयत्न करता येईल का ? गैर काँग्रेसई सरकारांमध्येही प्रॉब्लेम्स असतील नाही असे नाही पण कोणत्याही ढगाला कितीही काळे ठरवले तरी कुठेतरी चंदेरी कडा असतातच, शंभर पैकी नव्व्याणव पसंतीस नाही उअतरले तरी एखादा चांगला आमदार एखादा चांगला मंत्रि कुठेतरी काहीतरी चांगले कामही करुन गेला असेल एखादी चांगली योजना अमलात आणली असेल त्याचा लेखा जोखा या चर्चेच्या निमीत्ताने व्हावा अशी कल्पना आहे. (काँग्रेसच्या राज्यसरकारांबद्दलही असतील नाही असे नाही- धागा राजकारणाचा आखाडा होऊन अती विषयांतर होऊ नये म्हणून इच्छुकांनी त्याबाबत वेगळा धागा काढावा) * शक्यतो केंद्र सरकार बद्दल कमीत कमी चर्चा करावी. * आरोपबाजी बद्दल कमीत कमी चर्चा करावी * गैर काँग्रेसी राज्यसरकांचे मुख्यमंत्री, कार्यकाल आणि विकास विषयक वैशीष्ट्य अशी यादी कुणी बनवून दिल्यास वाचण्यास आवडेल. * खासकरून प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या राज्यस्तरावरील विकासकर्त्या गैरकाँग्रेसी राजकारण्यांची दखल घेणे असा या धागा लेखाचा उद्देश आहे. * जिथे राजकारण्यांनी पक्षांतरे केली असतील तर त्यांच्या गैरकाँग्रेसी काळाचीच तेवढी चर्चा करावी. * अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी चर्चा सहभागासाठी आभार.

याद्या 3531
प्रतिक्रिया 1
दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत राम नाईक यांची लेखमाला येते आहे. त्यातून बरेच संदर्भ मिळतील. मधू दंडवते - कोकण रेल्वे. मनोहर जोशी - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग. मोहन धारिया - अधिकारांचे विकेंद्रीकरण. ही काही चटकन आठवलेली उदाहरणे.