✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(इंडियन) अमेरिकन आई बाप

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Wed, 09/03/2008 - 00:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6935 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

ह्याही पुढची पीढी

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 09/03/2008 - 07:54 नवीन
त्याच म्हणणं असं की आपण तरुण बाप असताना सुप्त राहिलेली आपली मुलांच्या असल्या गोड कौतुकाची इछ्या त्यावेळी जमत नसल्याने आता आपण अजोबा झाल्यावर वसूल करतो आम्ही तरुण बाप असताना, आमच्या दोन्ही मुलांची अशी सगळी गोड कौतुके केली आहेत, त्यांच्या लंगोट्या बदलल्या आहेत. वगैरे वगैरे सगळे केले आहे. आता आमच्या नातवांना (जेव्हा केव्हा येतील तेव्हा) आमचा असाच आधार मिळणार नाही, असे तुमच्या देसाईंचे मत असेल, तर ते चुकीचे आहे. आजोबा झाल्यावर कौतुक विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी हा एक मूळ पॉझिटीव्ह पॉईंट असतो ! तबल्यावर हात आणी डग्ग्यावरही, अशी सिचुएशन कुणाला नाही आवडणार ? -- सर्किट
  • Log in or register to post comments

तबल्याचे बोल

श्रीकृष्ण सामंत
Wed, 09/03/2008 - 11:16 नवीन
सर्किटजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. "आता आमच्या नातवांना (जेव्हा केव्हा येतील तेव्हा) आमचा असाच आधार मिळणार नाही, असे तुमच्या देसाईंचे मत असेल, तर ते चुकीचे आहे." देसायांच मत त्यांच्या बद्दल होतं,त्यांच्या जांवया बद्दल नव्हतं.जांवयांना त्यांच्या नातवाना आधार देताना जांवयांची कौतुकं सुप्त राहणारच नाहीत. कारण तरूण बाप असताना त्यांच्या मुलांची लंगोट्या बदलून गौड कौतुकं केली आहेत ना! देसायाना त्यांच्या परिस्थितीत ते करायला मिळत नव्हतं ना! "आजोबा झाल्यावर कौतुक विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी हा एक मूळ पॉझिटीव्ह पॉईंट असतो ! तबल्यावर हात आणि डग्ग्यावरही, अशी सिचुएशन कुणाला नाही आवडणार ?" जांवई आजोबा झाल्यावर "रिस्पॉन्सिबिलिटी" हा त्यांचा सुद्धा "पॉझिटीव्ह" पॉईंट होणार हे उघडच आहे.ते कुठच्याही आजोबाला चुकलेलं नाही. सर्किटजी, अहो! तबल्यावर हात आणि डग्ग्यावरही हात अशी सिच्युएशन आल्या शिवाय गाणं आणि तबल्याचे बोल कसे वाजणार? आणि गाणं जांवयाना पण आवडणारच की. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

विषय फार

अमेयहसमनीस
Wed, 09/03/2008 - 09:24 नवीन
विषय फार पटला नाही. अमेय
  • Log in or register to post comments

विषय फार पटला नाही.

श्रीकृष्ण सामंत
Wed, 09/03/2008 - 11:19 नवीन
अमेयहसमनीसजी, म्हणजे काय? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेयहसमनीस

अनेक वर्षांपूर्वी

रेवती
गुरुवार, 09/04/2008 - 19:31 नवीन
असं वाटायचं की कधी हा डायपरचा व्याप संपणार? त्यातून माझा लेक इतकी वळवळ करायचा की डायपर बदलणे म्हणजे अरे देवा! माझा नवराही बिनदीक्कतपणे मुलाचे डायपर बदलायचा.ती आठवण झाली. त्यासुमारास एक गम्मत झाली. माझे सासरे माझ्या मुलाला खेळवत होते ते बघून सासूबाई आश्चर्यचकीत होऊन म्हणाल्या की त्यांना माहीतच नव्हते की आपला नवरा लहान मुलांशी खेळू शकतो. त्यावर सासर्‍यांचे मत असे होते की पूर्वी वडीलांनी (स्वत:च्या) मुलाशी खेळणे फारसे प्रचलीत नव्ह्ते. नातवंडांशी खेळलेले मात्र चालायचे (त्यावेळची पण आता आम्हाला न पटणारी पद्ध्त आहे.); पण आपले लेखन पटले. रेवती
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 09/05/2008 - 11:16 नवीन
रेवतीजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. हा आपला अनुभव आपण लिहित आहा,त्यामानाने आपण खूपच तरूण आहात.आणि आपले सासू सासरे सुद्धा त्यामानाने तरूण आहेत.ज्या मानाने मी त्या पिढी बद्दल लिहित आहे ज्याना खरोखरच आपल्या तरूण पत्नीशी सर्वांसमोर बोलायची "टाप" नसायची. कल्पना करा की आपल्या सासू सासर्‍यांच्या (फक्त उदाहरण म्हणून) आई वडिलांची या बाबतीत स्थिती काय झाली असावी. आणि अगदी तेच मी माझ्या लेखात लिहित आहे. माझे लेखन आपल्याला पटले हे वाचून आनंद झाला. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आणखी एक!

पिवळा डांबिस
Fri, 09/05/2008 - 08:25 नवीन
आणखी एक केलं पाहिजे, आपल्या भारतातल्या मुलांसाठी! इथे जसं नवर्‍याला आपल्या मुलांच्या जन्मवेळी हजर ठेवतात..... आपली लाडकी बायको ज्या वेदनातून आणि त्रासातून जाते ते सर्व या डोळ्यांनी पहायची सुविधा (?) या मुलांना ठेवली पाहिजे..... कुटुंबनियोजनाला दुसरा पर्याय नाही..... भारतात ठीक आहे...... बायकोला पेन्स सुरू झाल्या.... तिला हॉस्पिटलात ऍडमिट केली..... बाहेर उभा राहून दोन सिगरेटी ओढल्या.... मुलगा/ मुलगी बातमी बाहेर आल्यावर पेढे/ बर्फी आणायला धावले..... ते मूल या जगात आणण्यासाठी आपल्या प्रियतमेला काय त्रासातून जावं लागलंय हे त्या मुलांना कळलंच पाहिजे..... सगळे नाही पण जे सर्‍हुदय बाप असतील त्यांच्या साठी तरी एक उपाय..... आपला प्राऊड बाप, पिवळा डांबिस (अवांतरः ते छोटुकलं बंडल डॉक्टर किंवा नर्सने आपल्या हातात दिलेलं.... अजून त्याला नीट पुसलेलंही नाही... असं हातात मिळाल्यावर काय वाटतं हे शब्दांनी सांगता येण्याजोगं नाही, त्याला प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा...)
  • Log in or register to post comments

+१

सहज
Fri, 09/05/2008 - 09:41 नवीन
(अवांतरः ते छोटुकलं बंडल डॉक्टर किंवा नर्सने आपल्या हातात दिलेलं.... अजून त्याला नीट पुसलेलंही नाही... असं हातात मिळाल्यावर काय वाटतं हे शब्दांनी सांगता येण्याजोगं नाही, त्याला प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा...) सहमत. अवांतर- डायपर, लंगोट बद्दल बोलणे चालले आहे तर बाळाच्या "पॉटी ट्रेनिंग" बद्दलही लिहा सामंतआजोबा. आयुष्य बरेच सुखकर होते. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

स्त्रीचा सन्मान

श्रीकृष्ण सामंत
Fri, 09/05/2008 - 11:21 नवीन
डांबिसजी, "प्राऊड बाप" म्हणून घ्यायला आपण खरोखरच,लायक आहात. आपण लिहिलेली सत्य परिस्थिती आणि त्यावर सुचवलेले उपाय हे आपल्या आणि आपल्यासारख्या अनेक बापांच्या हृदयातून आलेले शब्द असावेत असं मला आपली प्रतिक्रिया वाचल्यावर वाटलं. मी नेहमीच म्हणतो, "जो स्त्रीला सन्मान देतो त्यालाच खरा सज्जन म्हणावं " www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

माझे मत

महेश हतोळकर
Fri, 09/05/2008 - 12:35 नवीन
(अवांतरः ते छोटुकलं बंडल डॉक्टर किंवा नर्सने आपल्या हातात दिलेलं.... अजून त्याला नीट पुसलेलंही नाही... असं हातात मिळाल्यावर काय वाटतं हे शब्दांनी सांगता येण्याजोगं नाही, त्याला प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा...) हा माझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण होता. एका हातात ते इवलस गाठोडं आणि दुसर्‍या हातात टेबलवर पडलेल्या बायकोचा हात. माझ्यासाठी त्याक्षणी जग तेवढच होतं.... पण ही पद्धत आपल्या कडे नको. मुलीच्या जन्मावेळेस आजुनही बर्‍याच वेळा बापाची प्रतीक्रिया अत्यंतीक टोकाची असते. आई आणि बाळाच्या सुरक्षीततेसाठी ते योग्य वाटत नाही. महेश हतोळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अगदी बरोबर!

रेवती
Fri, 09/05/2008 - 19:47 नवीन
पिडाकाका, मलाही असंच वाटतं. वेदनेनी विव्हळणार्‍या बायकोला पाहून काहीजण तर म्हणे लट्लट कापत असतात, पण म्हणून त्या बापांची सुटका होउ देऊ नये. तसेच सर्व रेटून नेण्यास भाग पाडले पाहीजे. बहूतेकवेळा माहेरी पहीले बाळंतपण असते त्यामुळे नवर्‍यांवर वेळही कमीच येते. पण माझा भाऊ मात्र भारतात वहीनीच्या बरोबर सर्व ठीकाणी होता, वहिनीच्या इतर नातेवाईकांना थोडे विचित्र वाटले पण त्यांच्याकडे लक्ष न देता त्याने बाळ होत असताना तेथे हजर राहण्याची परवानगी मागितली. सुदैवाने डॉक्टरही समजूतदार होते. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हल्ली भारतातही होतं म्हणतात, पण किती प्रमाणात याबद्दल शंकाच आहे!

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 09/09/2008 - 03:36 नवीन
इथे जसं नवर्‍याला आपल्या मुलांच्या जन्मवेळी हजर ठेवतात.....
हल्ली भारतातही तो विकल्प उपलब्ध आहे, असं ऐकिवात आहे. अर्थात तरीही आजमितीस भारतातले किती टक्के बाप मुलाच्या जन्माच्या वेळी हजर असतात याची कल्पना नाही, परंतु उदाहरणं माहितीतली आहेत. तीही तेराचौदा वर्षांपूर्वीची.
(अवांतरः ते छोटुकलं बंडल डॉक्टर किंवा नर्सने आपल्या हातात दिलेलं.... अजून त्याला नीट पुसलेलंही नाही... असं हातात मिळाल्यावर काय वाटतं हे शब्दांनी सांगता येण्याजोगं नाही, त्याला प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा...)
अगदी! मुळात भारतीय पुरुषांत सर्वसाधारणतः याबद्दल उदासीनता का, हे कळत नाही. म्हणजे जन्म देणे, बाळंतपण वगैरे हे बाईचे (/बायकांचे) काम वगैरे भावना. हे आपलं मूल आहे, त्याला या जगात आणताना आपलाही सहभाग असावा, त्याचं स्वागत करायला आपण तिथे असावं असं आपल्याकडच्या बापांना कसं वाटू शकत नाही हेच एक कोडं आहे. हे सगळं आपलं काम नाही, या सगळ्यापासून दूर राहावं असं वाटूच कसं शकतं? ("लाज? लेको, गर्भधारणेच्या [conceptionच्या] वेळी हजर होतात तेव्हा लाज वाटली नाही, मग आता डेलिव्हरीच्या वेळी हजर राहतानाच रे शिंच्यो नेमकी कसली लाज वाटते?" हे या बाबतीतलं कोण्या अनामिक भगिनीचं [वाचीव - म्हणजे इथल्याच कोण्या स्थानिक अमेरिकन वर्तमानपत्राच्या 'वाचकांच्या पत्रव्यवहारा'त वगैरे कधीकाळी वाचलेलं] मत चिंत्य आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

श्रीकृष्ण

विसोबा खेचर
Fri, 09/05/2008 - 08:27 नवीन
श्रीकृष्णराव, आपला लेखनाचा उत्साह अंमळ थक्क करणारा आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments

"ग्यानबाची मेख"

श्रीकृष्ण सामंत
Fri, 09/05/2008 - 11:25 नवीन
तात्याराव, आपण वेळात वेळ काढून माझ्या लेखनावर मनापासून दिलेली प्रतिक्रिया लाख मोलाची आहे.त्या बद्दल आभार. आपल्या मिसळपावा सारख्या संस्थाळावर-साईटवर-लेखनावर दिलेल्या प्रतिक्रिया-मलाच नव्हे तर इतरानाही- पोटतीडकीने दिलेल्या असतात असं मला वाटतं.मग त्या प्रशंसासहित असो अथवा प्रशंसाविरहित असो,त्या पाहून माझ्या सारख्याला तरी प्रेरणा मिळते.आणि "प्रेरणा ही उत्साहाची जननी आहे." तेव्हा आपण माझ्या लेखनाने अंमळ थक्क होता.आणि मी आपल्या सारख्यांच्या प्रेरणाने अंमळ थक्क होतो.हीच खरी "ग्यानबाची मेख " आहे असं मला वाटतं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

डांबीस

ऋचा
Fri, 09/05/2008 - 09:20 नवीन
डांबीस काकांशी सहमत!!! खरच सामंत काका खुप छान लिहीलय!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 09/05/2008 - 11:28 नवीन
ऋचाजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा

अगदी

पद्मश्री चित्रे
Fri, 09/05/2008 - 12:35 नवीन
पटलं तुमचं म्हणणं-सामंत काका . आणि पि डां शी तर १०१% सहमत..
  • Log in or register to post comments

>>पटलं

ईश्वरी
Sat, 09/06/2008 - 01:21 नवीन
>>पटलं तुमचं म्हणणं-सामंत काका . आणि पि डां शी तर १०१% सहमत.. हेच म्हणते ईश्वरी
  • Log in or register to post comments

लेखाचा आशय छान आहे.

शितल
Tue, 09/09/2008 - 07:55 नवीन
लेख आवडला, पिडाकाकांची प्रतिक्रीया तर प्रत्येक स्त्रीच्या मनाचा ठाव घेणारी आहे. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा