आज प्रो.देसाई जरा खूष दिसले.त्यांच्या धाकट्या मुलीला मुलगी झाली होती. दोन एक महिने झाले असतील.मला ती बातमी त्यानी या पुर्वीच सांगीतली होती म्हणा. पण आज काही विषेश त्याना सांगायचं होतं असं त्यांच्या चेहऱ्यावरून मी अनमान काढलं.
"काय भाऊसाहेब आज विषेश काय?"
असे मी म्हटल्यावर ते जरा खूसखूसून हसले.
मला त्याना काही तरी सांगायचं होतं.मला ते म्हणाले,
"सामंत , काय हो तुम्हाला आठवतं का,
ज्यावेळेला तुम्हाला पहिलं मुल झालं तेव्हा तुम्ही कधी त्याला कौतूकाने घेऊन फिरवत असाल.पण त्याचे कपडे बदलणं त्याचे आपण पुर्वी लंगोट म्हणायचो- त्याला इकडे डायपर म्हणतात- तसं काही तुम्ही बदलायचा का त्याला कधी मांडीवर घेऊन झोपवलं आहेत का तुम्ही? बहूतेक नसणार कारण तुमच्यावर ती पाळीच कदाचीत आली नसणार.पण इकडे बघा आमचे जांवई हे सर्व करतात.
त्याना म्हणे इकडे ट्रेनींग देतात.ही मुलांची सर्व कामं इकडे आई बाबानां मूल होण्यापुर्वी शिकून घ्यावी लागतात. त्याना ही सर्व कामं करताना पाहून कौतुक वाटतं. मुलाच्या बाबाला दुधाची बाटली पण द्यायचं शिकवतात.
म्हणजे बघा बापाला जवळ जवळ आईची कामं शिकवतात.आणि हे बाबा पण ही सर्व कामं अगदी आनंदाने आणि अगत्याने करतात.
आता आजी आजोबा झाल्यावर नातवंडाची हीच कामं आपल्याला करायला किती आनंद होतो.
सामंत,तुमचं म्हणण काय आहे याच्यावर ते जरा विस्तारने मला सांगा बघू."
हे त्यांचं म्हणणं ऐकून,
"मी थोडा विचार करून मला काय म्हणायचं आहे ते मी तुम्हाला उद्या आपण भेटू तेव्हा चर्चा करूं."असं सांगितलं.
दुसऱ्या दिवशी जेव्हां आम्ही भेटलो तेव्हा ह्या विषयावर उहापोह केला.तो असा.
मी म्हणालो,
"भाऊसाहेब,ह्याला मुख्य कारण इकडची कुटुंब संस्था आणि इकडची-म्हणजे अमेरिकेतली- परिस्थीती मुख्यता कारण असावी.
अहो,त्यावेळी भारतात आपल्या एकत्र कुटुंब संस्थेमूळे किती माणसं जवळ असायची बघा. त्यामुळे मुलांची ही कामं करायची पाळी तरूण बापावर कशी येणार.आणि इतकं असून तसं करायला जरी जायचं तरी एक म्हणजे त्या वयात थोडी लाज वाटाची आणि बायको पण कामं करू द्यायची नाही कारण तिला पण नवऱ्याने असली कामं करावीत म्हणजे अप्रशस्त
वाटायचं आणि मोठी माणसं पण असली कामं तरूण बाबाने केल्यास आपली टिंगल करायची.त्यामुळे आपण त्यावेळी ह्या सर्व गोष्टी पासून परावृतच होतो.
उलट इथे आईबाबा आणि मूल ह्या शिवाय घरात कोणच नसतं. आणि ही कामं एकट्याची नसून दोघांची असतात हे इथं पटवलं जात असल्याने- विशेष करून पुरुष्याला- त्यामुळे असली दृश्य आपल्याला दिसतात.
आणि दुसरं म्हणजे मदतीला आजी आजोबा जरी भारतातून आले तरे त्यांचा सहा महिन्याचा व्हिसा असतो मग सहा महिन्यानी ते गेल्यावर ही कामं कुणी करायची सांगा?
आपण आजोबा म्हणून जेव्हां इकडे नातवंडाचे कौतुकाने लाड करत असतोना, त्याच पण अनेक कारणा पैकी एक कारण एका अनुभवी व्यक्तीने मला समजावून सांगीतलं. त्याच म्हणणं असं की आपण तरुण बाप असताना सुप्त राहिलेली आपली मुलांच्या असल्या गोड कौतुकाची इछ्या त्यावेळी जमत नसल्याने आता आपण अजोबा झाल्यावर वसूल करतो.
कारण आपली टिंगल करायला कुणी नसतं आणि आजीला पण वयोमनाप्रमाणे जमत नसल्याने आजोबाला काही असली कामं वाटून मिळतात.हे त्या अनुभवी माणसाचे तत्वज्ञान मला पटतं भाऊसाहेब, तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही मला उद्या विचार करून सांगा ह्यानंतर आम्ही हा विषय इथे संपवला."
श्रीकृष्ण सामंत
वाचने
6956
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्याही पुढची पीढी
तबल्याचे बोल
In reply to ह्याही पुढची पीढी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
विषय फार
विषय फार पटला नाही.
In reply to विषय फार by अमेयहसमनीस
अनेक वर्षांपूर्वी
आभार
In reply to अनेक वर्षांपूर्वी by रेवती
आणखी एक!
+१
In reply to आणखी एक! by पिवळा डांबिस
स्त्रीचा सन्मान
In reply to आणखी एक! by पिवळा डांबिस
माझे मत
In reply to आणखी एक! by पिवळा डांबिस
अगदी बरोबर!
In reply to आणखी एक! by पिवळा डांबिस
हल्ली भारतातही होतं म्हणतात, पण किती प्रमाणात याबद्दल शंकाच आहे!
In reply to आणखी एक! by पिवळा डांबिस
श्रीकृष्ण
"ग्यानबाची मेख"
In reply to श्रीकृष्ण by विसोबा खेचर
डांबीस
आभार
In reply to डांबीस by ऋचा
अगदी
>>पटलं
लेखाचा आशय छान आहे.